
डोके मुंडवले, निर्वस्त्र करून फिरवले; राजस्थानमध्ये आदिवासी महिला अत्याचार प्रकरणी पतीसह ७ आरोपींना अटक
मिडिया रिपोर्ट्सनुसार, ३ सप्टेंबर रोजी समोर आलेल्या या घटनेत व्हायरल झालेल्या व्हिडिओत काही महिला पिडित महिलेला मारहाण करताना दिसून आल्या. त्यांनी महिलेचे कपडे काढले आणि यादरम्यान आजूबाजूला उभे असलेले लोक या घटनेवर हसू लागले. लोकांनी हे दृष्य आपल्या फोनच्या कॅमेरात कैद करुन घटनेचा व्हिडिओ देखील शूट केला. रिपोर्ट्सनुसार, महिलेला तिचा पती आणि अन्य लोकांकडून गावकऱ्यांच्या समक्ष निर्वस्त्र करण्यात आलं. यानंतर काही लोकांनी तिच्या डोक्यावरील केस कापले आणि मग महिलेला मारहाण करण्यात आली.
चारित्र्याच्या संशय होता
व्हिडिओ ३ सप्टेंबरला व्हायरल झाला असला तरी घटनेची एफआयआर मात्र १ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आली होती. महिलेने आपल्या तक्रारीत पोलिसांना सांगितले की, पती आणि तिच्यात आधीपासून वाद सुरु होता. ती मजुरी करण्यासाठी शेजारच्या राज्यात जाते. “दहा दिवसांपूर्वी ती संबंधित कंत्राटदाराकडेही गेली होती, परंतु तिच्या चारित्र्यावर संशय आल्याने पतीने तिला परत आणले. यानंतर १ सप्टेंबर रोजी काही लोकांसोबत मिळून त्याने भररस्त्यात महिलेचा मानसिक आणि शारिरीक छळ केला.
Chandrapur Crime : राखी बांधून बहिणी निघाल्या अन् भावानेच केला भावाचा घात; मटण करीवरून झाला होता वाद
पोलिसांनी आरोपींना केली अटक
पिडित महिलेच्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी पती आणि आरोपात सामील असलेल्या ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी महिलेची मेडिकल तपासणी केली असून लवकरच तक्रार आणि पुराव्यांच्या आधारावर आरोपींवर भारतीय दंड संंहितेच्या संबंधित कलमांनुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.