
वळसंगमधील खून प्रकरणात मोठी अपडेट, मुख्य आरोपीसह १५ जणांना अटक, हत्यारे आणि वाहनेही जप्त
९ सप्टेंबर २०२६ रोजी वळसंग गावात दोन गटांत वाद झाला होता. या वादातून सद्दाम आमलीचुंगे यांना मारहाण करण्यात आली. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी वळसंग पोलिस ठाण्यात खुनासह अन्य कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली एक इनोव्हा कार, एक महिंद्रा स्कॉर्पिओ आणि एक रिक्षा जप्त केली. तसेच लोखंडी रॉड, पाईप व इतर हत्यारे हस्तगत केली आहेत. उर्वरित आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची तीन स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली आहेत. यामुळे इतरांनाही अटक होईल.
पोलिसांची मोठी कामगिरी
पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे, अक्कलकोटचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र टाकणे आणि राहुल डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रविराज कांबळे तपास करीत आहेत. या कारवाईत कोळी, हवालदार देवकर, रामदास मालचे, मियाँवाले तसेच प्रसाद मांढरे आणि गजानन गायकवाड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
पंढरपूर तालुक्यात तरुणाचा खून
अनैतिक संबंधाच्या संशयातून पीकअप गाडी अंगावर घालून आणि त्यानंतर दगडाने ठेचून एका तरुणाचा निघृण खून केल्याची घटना पंढरपूर तालुक्यातील सरकोली परिसरात घडली आहे. विष्णू ज्ञानेश्वर जाधव असे मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणी कैलास रामा बाबर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
Ans: ९ सप्टेंबर २०२६ रोजी सोलापूर जिल्ह्यातील वळसंग गावात दोन गटांत वाद झाला. या वादातून सद्दाम आमलीचुंगे यांना जबर मारहाण करण्यात आली. उपचारादरम्यान ११ सप्टेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला.
Ans: वळसंग पोलिसांनी मुख्य आरोपी यासीन अब्बास कटरे, मोहसीन वजीर तांबोळी, बुडन कटरे यांच्यासह एकूण १५ आरोपींना अटक केली आहे.
Ans: पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली एक इनोव्हा कार, एक महिंद्रा स्कॉर्पिओ, एक रिक्षा तसेच लोखंडी रॉड, पाइप आणि इतर हत्यारे जप्त केली आहेत. उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली आहेत.