Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fake Marriage Beed: अडीच लाख रुपये उकळले अन् दोनच दिवसांत मोडला संसार; बनावट कागदपत्रांच्या आधारे अल्पवयीन मुलीचा विवाह

Fake marriage Beed: मनात भीती अन् डोळ्यात अश्रू; लग्नाचे आमिष दाखवून अडीच लाख रुपये उकळले अन् अवघ्या ४८ तासांत मोडला संसार! पोलिसांत तक्रार होताच उघड झाले ते धक्कादायक अन् संतापजनक सत्य. बनावट कागदपत्रे आणि त्या अल्पवयीन मुलीमागे दडलेले मुख्य सूत्रधार नेमके कोण? पहा या 'बनावट विवाहा'चा अंगावर काटा आणणारा संपूर्ण घटनाक्रम...

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 23, 2026 | 10:35 AM
अडीच लाख उकळून दोन दिवसात संसाराची राखरांगोळी (फोटो सौजन्य - iStock)

अडीच लाख उकळून दोन दिवसात संसाराची राखरांगोळी (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Follow Us:
  • लग्न जुळत नसलेल्या तरुणाकडून अडीच लाख रुपये उकळले
  • हतबल कुटुंबाने ऊसतोडणी मुकादमाकडून आगामी हंगामाची ॲडव्हान्स घेऊन लग्नाचा सर्व खर्च उभा केला
  • लग्नानंतर अवघ्या ४८ तासांत नववधूने माहेरी जाण्याचा हट्ट धरला
Fake marriage Beed: सध्याच्या काळात ग्रामीण भागातील तरुणांचे लग्न जुळवणे हे अत्यंत कठीण काम बनले आहे. विशेषतः शेतीकाम किंवा ऊसतोडीवर जगणाऱ्या कुटुंबातील मुलांच्या लग्नाचा प्रश्न गंभीर झाला आहे. याच हतबलतेचा गैरफायदा घेत निष्पाप कुटुंबांना जाळ्यात ओढणाऱ्या एका भामट्यांच्या टोळीचा भांडाफोड बीड जिल्ह्यातील गेवराई येथे झाला आहे. लग्न लावून देण्याच्या नावाखाली लाखो रुपये आणि सोन्या-चांदीचे दागिने लाटण्यासाठी एका अल्पवयीन मुलीचे बनावट आधार कार्ड तयार करून तिचे बनावट लग्न लावून दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

व्हॉट्सॲपवरून संपर्क अन् अडीच लाखांची अट

गेवराईतील एका तरुणाचे वय वाढत चालल्याने घरातील मंडळी लग्नासाठी मुलगी शोधत होती. मुलाच्या घरच्यांची चिंता पाहून जालन्यातील जाफ्राबाद येथील काही संशयित मध्यस्थांनी (दलालांनी) त्यांच्याशी संपर्क साधला. व्हॉट्सॲपवर मुलीचा बायोडाटा व फोटो पाठवून त्यांनी १ ऑक्टोबर रोजी मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम पार पाडला.

त्यानंतर “मुलीच्या डोक्यावर वडिलांचे छत्र नाही, त्यामुळे लग्नाचा सर्व खर्च अडीच लाख रुपये तुम्हालाच करावा लागेल,” अशी अट मध्यस्थांनी घातली. मुलाच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती बिकट असतानाही, त्यांनी ऊसतोडणी मुकादमाकडून येत्या २०२६-२७ च्या हंगामाची उचल (ॲडव्हान्स) घेऊन पैशांची कशीतरी सोय केली.

हेही वाचा: तिबेटमध्ये महाविनाश! ७.० रिश्टर तीव्रतेच्या भूकंपाने हादरली धरणी; रात्रीच्या वेळेत ३०० घरे उद्ध्वस्त, १६ ठार तर ३२ जखमी

फोन-पे अन् रोख रकमेचा व्यवहार; दोन दिवसांत संसाराचा अंत

५ ऑक्टोबर रोजी दलालांची टोळी कारने गेवराईत दाखल झाली. ठरल्यानुसार दोन वेगवेगळ्या फोन-पे खात्यांवर ५० हजार रुपये आणि उर्वरित २ लाख रुपये नगद स्वरूपात स्वीकारण्यात आले. एका स्थानिक ब्राह्मणाला बोलावून वैदिक पद्धतीने विवाह सोहळा पार पडला. आपल्या मुलाचे घर वसले या आनंदात कुटुंब होते; मात्र हा आनंद अवघे दोन दिवसच टिकला. लग्नानंतर अवघ्या दोनच दिवसांत नववधूने माहेरी जाण्याचा तगादा लावला. संशय आल्यावर कुटुंबाने दलालांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी टाळाटाळ सुरू केली. हा सगळा प्रकार केवळ पैसे उकळण्यासाठी रचलेला बनाव असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांत मुलीचा धक्कादायक खुलासा; अल्पवयीन मुलगी बालसुधारगृहात

१९ ऑक्टोबर रोजी त्या मुलीने स्वतः पोलिसांत हजर राहून धक्कादायक माहिती दिली. तिचे वय २० वर्षे दाखवणारे बनावट आधार कार्ड दलालांनी तयार केले होते, मात्र प्रत्यक्षात ती अजून अल्पवयीन आहे. “मला धाक दाखवून जबरदस्तीने गेवराईत आणले आणि माझे लग्न लावून दिले,” अशी कबुली तिने दिली.

याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीच्या आदेशाने बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. या फसवणूक रॅकेटमधील मुख्य सूत्रधारांना गजाआड करण्यासाठी पोलीस सध्या वेगाने तपास करत आहेत.

दीड वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारे सख्खे भाऊ अखेर जाळ्यात! गुन्हे शाखेची मोठी कारवाई

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही फसवणुकीची घटना कुठे घडली?

    Ans: बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात ही घटना घडली असून मध्यस्थ दलाल जालन्यातील जाफ्राबाद येथील होते.

  • Que: दलालांनी लग्नासाठी किती पैसे घेतले?

    Ans: दलालांनी ५० हजार रुपये ऑनलाईन (फोन-पे) आणि २ लाख रुपये रोख, असे एकूण अडीच लाख रुपये उकळले.

  • Que: या प्रकरणात पोलिसांची काय कारवाई झाली आहे?

    Ans: गेवराई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अल्पवयीन मुलीला बालसुधारगृहात पाठवून मुख्य आरोपी दलालांचा शोध सुरू केला आहे.

Web Title: Beed georai fake marriage racket minor girl fraud news sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 10:01 AM

Topics:  

  • Beed Crime
  • crime news
  • Fake Marriage Promise
  • Minor Girl

संबंधित बातम्या

दीड वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारे सख्खे भाऊ अखेर जाळ्यात! गुन्हे शाखेची मोठी कारवाई
1

दीड वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारे सख्खे भाऊ अखेर जाळ्यात! गुन्हे शाखेची मोठी कारवाई

पाच वर्षे पोलिसांना गुंगारा; अखेर फरार आरोपीला गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या
2

पाच वर्षे पोलिसांना गुंगारा; अखेर फरार आरोपीला गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

PACL Scam ED Action: PACL घोटाळ्यात ‘ईडी’चा दणका!; पुणे, मुंबई अन् रायगडातील ५६७ कोटींच्या ४८ मालमत्तांवर टांच
3

PACL Scam ED Action: PACL घोटाळ्यात ‘ईडी’चा दणका!; पुणे, मुंबई अन् रायगडातील ५६७ कोटींच्या ४८ मालमत्तांवर टांच

धावत्या कारमधील भयानक नृशंसता! अल्पवयीन गर्भवती मुलीवर सामूहिक अत्याचार अन् गाडीतच झाली प्रसूती
4

धावत्या कारमधील भयानक नृशंसता! अल्पवयीन गर्भवती मुलीवर सामूहिक अत्याचार अन् गाडीतच झाली प्रसूती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.