
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
पीडित तरुणी ही मुंबईतील रहिवासी आहे. हिरणमगरी परिसरातील करण सिंह याने पीडित तरुणीला एका इव्हेंटच्या कामासाठी महाराष्ट्रातून उदयपूरला बोलावले. सुरुवातीला तिने नकार दिला मात्र अधिक मोबदल्याची आमिष दाखवून तिला उदयपूरला आणण्यात आले.
Pune Crime News : मित्राच्या घरी जेवायला गेला, अन्…; पुण्यातील खळबळजनक घटना
उदयपूरला आल्यानंतर आरोपीने तिला सुखेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका फार्महाऊसवर नेले. तेथे करण सिंह व त्याच्या साथीदारांनी दारू पार्टी केली. आरोपीने स्वतः दारू पिली आणि तरुणीलाही जबरदस्तीने दारू पाजली. त्यांनतर नशेच्या अवस्थेत आरोपी व त्याच्या एका साथीदारांनी तरुणीवर अत्याचार केले असा आरोप तरुणीने केला आहे.
साथीदारांच्या भूमिकेवर संशय
जेव्हा अत्याचार करण्यात आला तेव्हा आरोपीचे आणखी तीन साथीदार उपस्थित होते. त्यांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. तपासादरम्यान त्यांची चौकशी करण्यात येणार आहे.
थेट एसपी कार्यालयात तक्रार
पीडित तरुणीने या प्रकरणाची तक्रार थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात केली आहे. त्यानुसार सुखेर पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. तर उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरु आहे. प्रकरणाचा तपास वेगाने सुरु असून, दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा विश्वास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
२३ दिवसांत दुसरी घटना
याआधीही सामूहिक अत्याचाराची घटना उदयपूरमध्ये घडली. एका आयटी कंपनीतील अधिकाऱ्याशी संबंधित प्रकरण समोर आले होते, ज्यामध्ये एका महिलेलाही सहभाग असल्याचे आरोप होते. आता या घटनेच्या २३ दिवसानंतर पुन्हा अशी घटना घडल्याने महिलेच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Ans: राजस्थानमधील उदयपूर शहरात, सुखेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फार्महाऊसवर.
Ans: ती महाराष्ट्रातील असून मुंबईची रहिवासी आहे.
Ans: एक आरोपी ताब्यात घेतला असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.