
crime (फोटो सौजन्य: social media)
राजस्थान : राजस्थानमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. भाजपच्या युवा नेत्याच्या पत्नीचा गूढ मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर तिचा मृत्यू झाल्यानंतर गुपचूप अंत्यसंस्कार करण्याच्या तयारीत सासरचे होते. महिलेच्या माहेरच्यांनी सासरच्यांवर थेट हत्येचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत मृतदेह ताब्यात घेतला. ही घटना राजस्थानच्या भरतपूर येथील आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून भाजप नेत्याच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे.
काय नेमकं प्रकरण?
भाजप युवा नेत्याच्या पत्नीचा गूढ मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर तिच्या सासरचे लोक तातडीने अंत्यसंस्कार करण्याच्या तयारीत होते. महिलेच्या माहेरच्यांना त्यांच्या घाई गडबडीने संशय आला. त्यांनी थेट तिच्या सासरच्यांवर आरोप करत पोलिसात धाव घेतली. या प्रकरणात पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. प्रियंकाच्या शरीरावर अनेक ठिकाणी मारहाणीचे निशाण आणि गळ्यावर निळे डाग आढळले आहेत. यामुळे हत्येचा संशय बळावला आहे. ही हत्या असल्याचं प्रियंकाच्या कुटुंबियांनी आरोप केला आहे.
अनेकवेळा केली तक्रार
२०१८ मध्ये छळलुहासा गावचे रहिवासी ओमप्रकाश यांची मुलगी प्रियंका हिचा विवाह बयाना येथील पिदावली गावचा रहिवासी आकाश याच्याशी झाला होता. आकाश भाजप युवा मोर्चाचे माजी महामंत्री आहे. लग्नानंतर आकाश आणि त्याच्या कुटुंबियांकडून प्रियंकाला सातत्याने हुंड्यासाठी त्रास दिला जात होता. प्रियंकाने अनेकदा याबाबत तक्रार केली होती, मात्र त्यांची मागणी वाढतच गेली.
शरीरावर मारहाणीचे निशाण
शनिवारी पिदावली गावातील नातेवाईकांनी ओमप्रकाश यांना प्रियंकाच्या मृत्यूची आणि सासरचे लोक अंत्यसंस्कार करत असल्याची माहिती दिली. ओमप्रकाश यांनी त्वरित पोलीस नियंत्रण कक्षाला सूचना दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. प्रियंकाच्या शरीरावर अनेक ठिकाणी मारहाणीचे निशाण आणि गळ्यावर निळे डाग आढळले आहेत. यामुळे हत्येचा संशय बळावला आहे. ही हत्या असल्याचं प्रियंकाच्या कुटुंबियांनी आरोप केला आहे.
हे प्रकरण हुंडाबळीचे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एफएसएल (FSL) पथकाने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत. तसेच सर्व बाजूने तपास सुरू आहे. आकाश आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रियंका आणि आकाशला युवराज वय 7 आणि काव्य 5 अशी दोन लहान मुले आहेत. या घटनेनं सर्वच जण हादरून गेले आहे. हे प्रकरण हुंडाबळीचे असल्याचं बोललं जात आहे. वेळीच प्रियंकाने केलेल्या तक्रारीवर कारवाई झाली असती तर तिचा जीव गेला नसता असं तिच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे.
Ans: होय
Ans: होय
Ans: होय