राजस्थान: राजस्थान येथील श्रीगंगानगर येथून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका ४५ वर्षीय युवकाने कारमध्ये पेट्रोल टाकून स्वतःला पेटवून घेतले आहे. त्यावेळी गाडीतून मोठा आवाज आला. तो ऐकून आजूबाजूचे लोक धावले, परंतु युवकाचा मृत्यू झाला होता. मृतक युवकाचा नाव सुरजित असे आहे. युवक हरियाणातील असल्याचा समोर आले आहे. त्याचे लिव्ह इन पार्टनरसोबत मोठा वाद झाला होता आणि त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
Sangli Crime: सांगलीत मुळशी पॅटर्न! वाढदिवसाच्या दिवशीच दलित महासंघाच्या अध्यक्षांची निर्घृण हत्या
नेमकं काय घडलं?
शेजारच्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी अमन कुमार यांनी सांगितले की, सुरजीत आणि त्याची लिव्ह इन पार्टनर दोघेही पावन धाम परिसरात राहात होते. हे दोघेही पाच महिन्यांपूर्वी येथे राहायला आले होते. चार दिवसांपूर्वी दोघांमध्ये मोठे भांडण झाले होते. सोमवारी सकाळी 11:15 वाजता सुरजीत कार घेऊन आला. त्याच्या गाडीत सामान भरलेलं होते. त्याने घरासमोरच गाडीत पेट्रोल टाकून स्वतःला पेटवून घेतले. आग लागताच मोठा धमाका झाला. शेजारी आग विझवण्याचा प्रयत्न केला,पण सुरजित गाडीतच होता आणि गंभीररीत्या भाजल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला होता. त्याचे वारंवार वाद होत असत, अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली.
पोलीस सध्या सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची तपासणी करत आहेत. मृतक सुरजितच्या कागदपत्रांमध्ये लुधियाना, हरियाणा आणि भिवाडीचे पत्ते आढळले आहेत, ज्याची तपासणी सुरू आहे. ही घटना कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतील सद्भावना नगर येथील पावन धामजवळ घडली.
शेतात बोलावलं आणि गळा दाबून निर्घृण हत्या केली, पैसे परत मागितल्याचा कारणाने रचला कट
राजस्थानच्या प्रतापगड जिल्ह्यात एका महिलेचा मृतदेह आढळला होता. मत महिलेच्या गळ्याला रुमाल बांधलेला होत आणि गळा आवळून तिची हत्या करण्यात आल्याचे समोर आले होते. मृत महिलेचं नाव सपना मीना आहे. सपनाच्या वडिलांनी याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून यासंदर्भात तपास सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान पोलिसांनी याच प्रकरणातील आरोपीचा शोध ८ दिवसात घेतल्याचं सांगितलं जात आहे.
Pune Crime: पार्थ पवार यांच्या मामे भावाला अटक होणार ? पुण्यातील जागेचं प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग
Ans: सुरजीत
Ans: श्रीगंगानगर
Ans: वाद






