
crime (फोटो सौजन्य: social media)
राजस्थान: IAS पत्नीने IAS पती विरोधात तक्रार दाखल केल्याचे समोर आले आहे. IAS दाम्पत्य राजस्थान सरकारमध्ये कार्यरत आहे. IAS पत्नीने आपल्या पतीवर गंभीर आरोप केले आहे.तिच्यावर शारीरिक मानसिक छळ आणि जबरदस्ती लग्न केल्याचे तिने आरोप केले आहे. नेमके प्रकरण काय आहे? जाणून घेऊया
धक्कादायक ! क्षुल्लक कारणावरून विवाहितेचा छळ; माहेरहून तीन लाखांची मागणी केली अन् नंतर…
नेमके प्रकरण काय?
जयपूरमध्ये एका महिला ias अधिकाऱ्याने त्यांचेias पती आशिष मोदी यांच्या विरोधात एस एम एस हॉस्पिटल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. राजस्थान केडर मिळवण्यासाठी भावनिक दबाव टाकून जबरदस्तीने लग्न केल्याचे त्यांनी आरोप केला आहे. शिवाय त्यानंतर शारीरिक मानसिक छळ केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २०१४ मध्ये त्यांचे वडील कर्करोगाने त्रस्त असताना मोदी यांनी त्यांच्या भावनिक दुर्बळतेचा फायदा घेतला. शिवाय लग्नासाठी भाग पाडले. एवढेच नाही तर स्वतःबद्दल खोटी माहिती देखील दिली. नंतर वारंवार शारीरिक तसेच मानसिक छळ केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
फिर्यादीनुसार, मोदी वारंवार दारू पिऊन आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांशी संपर्क ठेवतो. त्याला याविषयी प्रश्न विचारल्यास ते मारहाण करत होता. २०१८ मध्ये या दाम्पत्याला मुलगी झाली तेव्हा छळ अजून वाढला. ऑक्टोबरला २०२५ मध्ये मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना सरकारी गाडीतून अपहरण केले आणि त्यांना अनेक तास बंधक बनवून ठेवले होते. एवढेच नाही तर घटस्फोट न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली. असे आरोप ias महिला अधिकाऱ्यांनी आपल्या पती विरोधात केले आहे.
त्यांनी तक्रारीत असे म्हटले आहे की, मोदी यांनी त्यांच्या खोलीत गुप्त कॅमेरा लावला होता. सरकारी गोपनीय कागदपत्रे मिळवण्यासाठी त्यांचा मोबाईल फोन अन्य उपकरणांशी अवैधपणे जोडला होता. कार्यरत IAS अधिकारी असूनही मोदी खासगी आणि गुन्हेगारी कामांसाठी आपल्या पदाचा आणि सरकारी संसाधनांचा गैरवापर करत असल्याचा आरोपही दीक्षित यांनी केला. मोदी हे २०१४ च्या बॅचचे अधिकारी असून सध्या ते बिहारमध्ये निवडणूक ड्युटीवर आहेत. त्यांनी या आरोपांवर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
Ans: राजस्थान
Ans: भारती
Ans: बिहार