Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 4 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri Crime: रत्नागिरी हादरलं! धावत्या मांडवी एक्सप्रेसमधून लिव्ह-इन पार्टनर आणि दीड वर्षांच्या मुलासह उडी; महिलेचा मृत्यू

रत्नागिरीच्या खेड तालुक्यात मांडवी एक्सप्रेसमधून एका व्यक्तीने आपल्या लिव्ह-इन पार्टनर आणि दीड वर्षांच्या मुलासह उडी घेतल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला असून वडील आणि मुलगा गंभीर जखमी आहेत. या घटनेमागील कारणांचा खेड पोलीस सखोल तपास करत आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 04, 2026 | 04:03 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • खेड तालुक्यात मांडवी एक्सप्रेसमधून तिघांनी उडी घेतल्याची धक्कादायक घटना घडली.
  • या घटनेत शुभ्रा दिवेकर यांचा मृत्यू झाला, तर सचिन जुवळे आणि दीड वर्षांचा मुलगा गंभीर जखमी आहेत.
  • घटनेमागील कारणांचा शोध घेण्यासाठी खेड पोलीस आणि रेल्वे पोलीस सखोल तपास करत आहेत.
रत्नागिरी: कोकण रेल्वेवरील मांडवी एक्सप्रेस वेगाने मुंबईच्या दिशेने धावत होती. प्रवाशांचा प्रवास नेहमीप्रमाणे सुरू असतानाच काही क्षणांत असा थरार घडला, ज्याने सर्वांनाच हादरवून सोडलं. एका व्यक्तीने आपल्या लिव्ह-इन पार्टनर आणि अवघ्या दीड वर्षांच्या मुलासह चालत्या ट्रेनमधून उडी घेतल्याची धक्कादायक घटना खेड तालुक्यातील मेटे गावाजवळ घडली. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला असून वडील आणि चिमुकला मुलगा गंभीर जखमी अवस्थेत उपचार घेत आहेत. या टोकाच्या निर्णयामागील नेमकं कारण काय, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. घडलेली घटना खेड तालुक्यातील मेटे गावाजवळ कोकण रेल्वे मार्गावर सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही भयानक दुर्घटना घडली.

Beed News: Tata Brand Misuse? बीडमधील पत्रा उद्योग समूहावर टाटा अधिकाऱ्यांची धाड; पोलिसांचा तपास सुरू

काय घडलं नेमकं?

मेटे गावाच्या परिसरात काहीतरी पडल्याचा आवाज आल्यानंतर आणि रेल्वे प्रशासनाला संशय आल्यानंतर तातडीने खेड पोलीस आणि रेल्वे पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तिघांनाही तातडीने खेड येथील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच शुभ्रा दिवेकर यांचा मृत्यू झाला होता, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. सध्या शुभ्रा यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर गंभीर जखमी झालेल्या सचिन जुवळे आणि त्यांच्या दीड वर्षाच्या चिमुकल्या मुलावर उपचार सुरू आहेत.

चालत्या ट्रेनमधून, त्यातही दीड वर्षाच्या पोटच्या गोळ्याला सोबत घेऊन असा टोकाचा निर्णय या जोडप्याने का घेतला? याचे उत्तर अध्यापत स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. धावत्या एक्सप्रेसमधून उडी मारण्यापूर्वी ट्रेनमध्ये त्यांचे काही भांडण झाले होते का, यादृष्टीने सहप्रवाशांचेही जबाब नोंदवले जाण्याची शक्यता आहे.

तपास सुरु

शुभ्रा अतिश दिवेकर या महिलेचा रेल्वे ट्रॅकवर कोसळून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर चिन सत्यवान जुवळे आणि त्यांचा दीड वर्षांचा लहान मुलगा हे दोघेही गंभीर जखमी झाले आहे. ते सध्या मृत्यूशी झुंज देत आहेत. मुसळधार पाऊस आणि वेगाने धावणारी रेल्वे असल्याने उडी मारल्यानंतर तिघेही लोहमार्गाच्या बाजूला रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. प्राथमिक माहिती आणि उपलब्ध परिस्थितीवरून हा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.या घटनेमुळे कोकण रेल्वे प्रवाशांसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

Beed News: 38 वर्षीय तरुणाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; सुसाईड नोटमुळे तपासाला नवे वळण

💡

Frequently Asked Questions

  • Que: रत्नागिरीतील या घटनेत नेमके काय घडले?

    Ans: मांडवी एक्सप्रेसमधून एका व्यक्तीने आपल्या लिव्ह-इन पार्टनर आणि दीड वर्षांच्या मुलासह उडी घेतल्याची घटना घडली. यात महिलेचा मृत्यू झाला.

  • Que: या घटनेत कोण जखमी झाले आहेत?

    Ans: सचिन सत्यवान जुवळे आणि त्यांचा दीड वर्षांचा मुलगा गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • Que: पोलिसांचा तपास कोणत्या दिशेने सुरू आहे?

    Ans: घटनेमागील नेमके कारण, कौटुंबिक किंवा इतर कोणतेही कारण होते का, तसेच ट्रेनमधील घटनाक्रम काय होता याचा पोलीस सखोल तपास करत आहेत.

Web Title: Ratnagiri crime ratnagiri shaken woman jumps from moving mandvi express with live in partner and 18 month old son woman dies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 04:03 PM

Topics:  

  • Ratnagiri
  • ratnagiri news

संबंधित बातम्या

Chiplun ZP School : पावसाचे पाणी भरून वापरण्याची वेळ; चिपळूणमधील शाळेतील विद्यार्थिनींची दयनीय अवस्था
1

Chiplun ZP School : पावसाचे पाणी भरून वापरण्याची वेळ; चिपळूणमधील शाळेतील विद्यार्थिनींची दयनीय अवस्था

Ratnagiri Bus Accident : ब्रेक निकामी, चालकाचे नियंत्रण सुटले अन्…! रत्नागिरी जिल्ह्यात दोन एसटी बसची टक्कर, 15 विद्यार्थी जखमी
2

Ratnagiri Bus Accident : ब्रेक निकामी, चालकाचे नियंत्रण सुटले अन्…! रत्नागिरी जिल्ह्यात दोन एसटी बसची टक्कर, 15 विद्यार्थी जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.