
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
उत्तर प्रदेशातील अमित चव्हाण नावाच्या संशयिताने फेसबुकवर रिल्स बनवून ‘5 रुपयांच्या नोटेवर ट्रॅक्टरचे चित्र असल्यास 15 लाख रुपये मिळतील’ अशी जाहिरात केली होती. हे रिल्स पाहून शिवलकर यांनी आरोपीशी संपर्क साधला आणि आपल्याकडे अशी नोट असल्याचे सांगितले. १५ लाख रुपये मिळवून देण्यासाठी काही शासकीय शुल्क किंवा प्रोसेसिंग फी भरावी लागेल, अशी बतावणी आरोपीने केली.
Accident News: भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने दुचाकीला थेट…; रत्नागिरीत घडला भीषण अपघात
एकूण ९ लाख २१ हजारांची फसवणूक
ही फसवणूक सलग ५ महिने चालली. ऑगस्ट २०२५ पासून जानेवारी २०२६ या दरम्यान ही फसवणूक झाली. आरोपीने विविध खात्यांमध्ये शिवलकर यांनी गुगल पे द्वारे पैसे पाठवले. 15 लाख रुपये मिळतील या आशेने आजींनी थोडे-थोडे करत एकूण 9 लाख 21 हजार रुपये आरोपीला पाठवले. वारंवार पैसे भरूनही १५ लाख रुपये मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे शिवलकर यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने रत्नागिरी शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे उत्तर प्रदेशमधील अमित चव्हाणयाच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
रत्नागिरीत चोरट्यांनी ज्वेलर्सचे दुकान फोडले; शटर उचकटून तब्बल ‘इतक्या’ लाखांचा मुद्देमाल लंपास
राज्यासह देशभरात चोरट्यांनी धुमाकूळ घाचतला असून, दररोज चोरटे नागरिकांच्या लाखो रुपयांवर डल्ला मारत आहेत. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता एक मोठी चोरीची घटना उघडकीस आली आहे. रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर परिसरातील सुमित्रा ज्वेलर्स दुकान चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. दुकानाचे बंद शटर उचकटून चोरट्यांनी १ लाख ७५ हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने आणि पुराव्यासाठी महत्त्वाचा असलेला डीव्हीआर चोरून नेला आहे. या घटनेमुळे शहरातील व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.
Ans: फेसबुक रिल्सद्वारे 5 रुपयांच्या नोटेसाठी 15 लाख मिळतील असे सांगून पैसे घेतले.
Ans: एकूण 9 लाख 21 हजार रुपये फसवले गेले.
Ans: आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून तांत्रिक तपास सुरू आहे.