
अल्पवयीन मुली सुरक्षित नाहीत? पुन्हा 7 वर्षीय चिमुरडीवर ५५ वर्षाच्या नराधमांकडून बलात्कार
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्व येथील कोळशेवाडी भागातील रहिवासी असलेला आरोपी जुमे अली शेख (५५) याने पीडितेला टोमॅटोचे आमिष दाखवून तिला दूर नेले. त्यानंतर त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. घरी परतल्यानंतर पीडितेने आपल्या कुटुंबीयांना घडलेली घटना सांगितली. संतप्त कुटुंबीयांनी तात्काळ पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. या घटनेची माहिती मिळताच कोळशेवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि प्राथमिक तपासानंतर आरोपीला ताब्यात घेतले.
परीक्षा केंद्रावर सापडला मोबाईल; विद्यार्थिनीचा उडी मारून पळण्याचा प्रयत्न
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, पोलिसांनी आरोपीविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेची बातमी पसरताच परिसरात संतापाची लाट उसळली. महिला आणि मुलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. कल्याण पूर्व परिसरात अलीकडेच अशाच प्रकारच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने स्थानिक रहिवाशांनी चिंता व्यक्त केली आहे.
या घटनेचे राजकीय पडसादही उमटले आहेत. भाजप, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), मनसे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) यांचे अधिकारी आणि कार्यकर्ते कोळशेवाडी पोलीस ठाण्यात पोहोचले आणि त्यांनी आरोपींना कठोरतम शिक्षा देण्याची मागणी केली. अशा घृणास्पद गुन्ह्यांसाठी दोषी असलेल्यांना कोणतीही सवलत देऊ नये आणि जलदगती न्यायालयामार्फत त्यांना लवकरात लवकर शिक्षा द्यावी, अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे.सध्या या घटनेनंतर संपूर्ण परिसरात संताप पसरला आहे.
Jaipur Crime News: आत्या बेपत्ता अन् भाचा शोध घेत होता… पण सत्य समोर आलं तेव्हा सर्वांनाच धक्का बसला