Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बांधकाम व्यावसायिकाच्या आत्महत्येप्रकरपणी मोठी अपडेट; रवींद्र धंगेकर अन् त्यांच्या पत्नीला अटकपूर्व जामीन मंजूर

बांधकाम व्यावसायिकाच्या आत्महत्या प्रकरणात माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीला अतिरिक्त सत्र न्यायालयाने प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर गुरुवारी अटी शर्तीवर अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 24, 2026 | 11:54 AM
बांधकाम व्यावसायिकाच्या आत्महत्येप्रकरपणी मोठी अपडेट; रवींद्र धंगेकर अन् त्यांच्या पत्नीला अटकपूर्व जामीन मंजूर

बांधकाम व्यावसायिकाच्या आत्महत्येप्रकरपणी मोठी अपडेट; रवींद्र धंगेकर अन् त्यांच्या पत्नीला अटकपूर्व जामीन मंजूर

Follow Us
Follow Us:

पुणे : बांधकाम व्यावसायिक खलील शेख (वय ६५) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्यापूर्वी शेख यांनी व्हिडिओ तयार करून आर्थिक व्यवहार, थकित रक्कम व कथित मानसिक छळाचे गंभीर आरोप केले होते. याबाबत त्यांच्या पत्नी सुलताना शेख यांनी स्वारगेट पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, माजी आमदार रवींद्र धंगेकर, त्यांची पत्नी, राजकीय पदाधिकारी बाळासाहेब शेडगे, रघुनाथ गौडा अशा १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशातच आता बांधकाम व्यावसायिकाच्या आत्महत्या प्रकरणात माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीला अतिरिक्त सत्र न्यायालयाने प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर गुरुवारी अटी शर्तीवर अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

 

धंगेकर दाम्पत्यासह अन्य आरोपींनी अंतरिम अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. गांधी यांच्या न्यायालयात बुधवारी आरोपींच्या वकिलांसह पोलिस आणि सरकारी वकिलांनी म्हणणे सादर केले होते. त्यांचा या आत्महत्या प्रकरणाशी संबंध नसून, द्वेषापोटी खोट्या गुन्ह्यात गुंतविण्यात आल्याचा युक्तिवाद अॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी केला होता.

या प्रकरणातील प्रमुख आरोपी बाळा शेंडगे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मात्र कोर्टाने फेटाळला आहे. रवींद्र धंगेकर यांनी माझी पत्नी या प्रकल्पातून कधीच बाहेर पडली आहे. तरीही आम्हाला याचा त्रास होतो आहे. त्रास होतो म्हणूनच आपण शिवसेनेत आलो , पण आता येथेही त्रास होत असल्याची खंत मांडली होती.

हे सुद्धा वाचा : ‘माझी आई मला समजून घेत नाही’, तरुणीने जीव संपवण्याआधी इंस्टाग्रामवर शेअर केला व्हिडिओ

आत्महत्या करण्याआधी खलील शेख व्हिडीओमध्ये म्हणाले की, विविध कारणामुळे मी कर्जबाजारी झालो असून, त्यामुळे मी आत्महत्येचा निर्णय घेतला आहे. तसेच या आर्थिक संकटाला काही व्यक्ती कारणीभूत असल्याचा आरोप करत त्यांनी उत्कर्षा कंपनीच्या पार्टनर रविंद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर, बाळासाहेब शेडगेंच्या पत्नी, सुनील आहेरांचा मुलगा, हमीद शेख यांचा मुलगा आणि रघु गावडे यांची नावे व्हिडिओत घेतली आहेत. खलील शेख यांनी आपल्याला ५० लाख रुपये भागिदारांकडून येणे असल्याचे व्हिडीओत म्हटले आहे. त्याचबरोबर आर्थिक अडचणींकडे रविंद्र धंगेकर दुर्लक्ष करत असल्याचं देखील खलील शेख व्हिडीओमध्ये म्हणाले आहेत.

Web Title: Ravindra dhangekar and his wife have been granted anticipatory bail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 11:54 AM

Topics:  

  • pune news
  • Pune Police
  • Ravindra Dhangekar

संबंधित बातम्या

Santosh Pandit Judicial Custody Pune: संतोष पंडितला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी!
1

Santosh Pandit Judicial Custody Pune: संतोष पंडितला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी!

Pune Dry Day in Ganesh Utsav 2026: गणेशोत्सवात पुणे प्रशासनचा मोठा निर्णय; १४ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ भागांत मद्यविक्रीवर बंदी
2

Pune Dry Day in Ganesh Utsav 2026: गणेशोत्सवात पुणे प्रशासनचा मोठा निर्णय; १४ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ भागांत मद्यविक्रीवर बंदी

सणांपूर्वीच स्वयंपाकघराचे कोलमडले बजेट; साखर, कांदा आणि खाद्यतेलाच्या दरांत मोठी वाढ
3

सणांपूर्वीच स्वयंपाकघराचे कोलमडले बजेट; साखर, कांदा आणि खाद्यतेलाच्या दरांत मोठी वाढ

Pune Ring Road Project: ४३ किलोमीटर, १६ गावे, ५१.७३ हेक्टर; पुणे HCMTR अन् इनर रिंग रोडच्या भूसंपादनाला वेग
4

Pune Ring Road Project: ४३ किलोमीटर, १६ गावे, ५१.७३ हेक्टर; पुणे HCMTR अन् इनर रिंग रोडच्या भूसंपादनाला वेग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.