Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Khalil Shaikh Suicide Case : अटकपूर्व जामिनासाठी धंगेकर दाम्पत्य न्यायालयात; दिलासा मिळणार का?

गुलटेकडी येथील डायस प्लॉट परिसरात राहणारे बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्या आधी शेख यांनी व्हिडिओ तयार करून आर्थिक व्यवहार, थकित रक्कम आणि कथित मानसिक छळाचे गंभीर आरोप केले होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 18, 2026 | 01:11 PM
Khalil Shaikh Suicide Case : अटकपूर्व जामिनासाठी धंगेकर दाम्पत्य न्यायालयात; दिलासा मिळणार का?

Khalil Shaikh Suicide Case : अटकपूर्व जामिनासाठी धंगेकर दाम्पत्य न्यायालयात; दिलासा मिळणार का?

Follow Us
Follow Us:

पुणे : बांधकाम व्यावसायिक खलील शेख आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल झाला. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर या गुन्ह्यात अंतरिम अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि त्यांची पत्नी प्रतिभा यांनी शुक्रवारी न्यायालयात धाव घेतली. त्यांच्या अर्जावर तपास अधिकारी आणि स्वारगेट पोलिस म्हणणे मांडणार आहेत.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. गांधी यांच्या न्यायालयात धंगेकर दाम्पत्याने अॅड. विजयसिंह ठोंबरे यांच्यामार्फत अंतरिम अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे. गुलटेकडी येथील डायस प्लॉट परिसरात राहणारे बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्या आधी शेख यांनी व्हिडिओ तयार करून आर्थिक व्यवहार, थकित रक्कम आणि कथित मानसिक छळाचे गंभीर आरोप केले होते. याबाबत, त्यांच्या पत्नी सुलताना शेख यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Pune Sucide : बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांची गळफास घेऊन आत्महत्या; व्हिडीओत रविंद्र धंगेकरांचं घेतलं नाव

या तक्रारीच्या आधारे माजी आमदार रवींद्र धंगेकर, त्यांची पत्नी, राजकीय पदाधिकारी बाळासाहेब शेडगे, रघुनाथ गौडा अशा बारा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आत्महत्येपूर्वीच्या चिठ्ठीमध्ये कोठेही रवींद्र धंगेकर यांचा उल्लेख नाही; तसेच त्यांच्या पत्नी वर्षभरापूर्वीच संबंधित भागीदारी संस्थेतून बाहेर पडल्या आहेत. त्यामुळे त्यांचा या आत्महत्या प्रकरणाशी संबंध नसून, द्वेषापोटी खोट्या गुन्ह्यात गुंतविण्यात आल्याचा युक्तिवाद अॅड. ठोंबरे यांनी न्यायालयात केला.

खलील शेख यांची गळफास घेऊन आत्महत्या

पुण्यात एका बांधकाम व्यावसायिकाने गळफास घेऊन नुकतीच आत्महत्या केली. माजी आमदार रविंद्र धंगेकर यांच्या पत्नीसोबत या व्यावसायिकाची भागिदारी होती. खलील शेख असं या बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदार असलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी तयार केलेल्या व्हिडिओमध्ये खलील शेख यांनी माजी आमदार रविंद्र धंगेकर यांचं नाव घेतलं आहे.

काय आहे प्रकरण?

पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील वक्फ बोर्डाच्या जमिनीवर बांधकाम प्रकल्प उभारण्यासाठी रविंद्र धंगेकरांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांच्यासह आणखी चार भागिदारांनी मिळून उत्कर्ष असोसिएट नावाची कंपनी स्थापन केली होती. या कंपनीत मनसेचे माजी नगरसेवक बाळा शेडगे यांच्यासह खलील या बांधकाम व्यावसायिकाचा देखील समावेश होता. वक्फ बोर्डाची जागा विकत घेऊन त्या जागेवर बांधकाम सुरू करण्यात आले होते. त्यासाठी बँकांकडून कर्जे घेण्यात आली होती.

Web Title: Ravindra dhangekar and his wife in court seeking anticipatory bail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 01:11 PM

Topics:  

  • Ravindra Dhangekar
  • Suicide case

संबंधित बातम्या

‘मी माझ्या मुलांसह आत्महत्या करतोय…’; वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या, स्टेटस ठेवलं अन्…
1

‘मी माझ्या मुलांसह आत्महत्या करतोय…’; वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या, स्टेटस ठेवलं अन्…

कुटुंबियांनी प्रेमाला विरोध केल्याने प्रेमीयुगुलाने घेतला टोकाचा निर्णय; विष प्राशन केले अन्…
2

कुटुंबियांनी प्रेमाला विरोध केल्याने प्रेमीयुगुलाने घेतला टोकाचा निर्णय; विष प्राशन केले अन्…

Pune Sucide : बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांची गळफास घेऊन आत्महत्या; व्हिडीओत रविंद्र धंगेकरांचं घेतलं नाव
3

Pune Sucide : बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांची गळफास घेऊन आत्महत्या; व्हिडीओत रविंद्र धंगेकरांचं घेतलं नाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.