Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आत्महत्या करतो’ असा मेसेज, फोन बंद अन् पोलीस अंमलदार बेपत्ता; तांत्रिक तपासातून बारमध्ये सापडला…

‘आत्महत्या करतो’ असा मेसेज पाठवून पोलीस अंमलदार बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली. काही तासांनी नारायणगावातील बारमध्ये तो मद्यधुंद अवस्थेत सापडला.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 15, 2026 | 05:08 PM
‘आत्महत्या करतो’ असा मेसेज, फोन बंद अन् पोलीस अंमलदार बेपत्ता; तांत्रिक तपासातून बारमध्ये सापडला अन्...

‘आत्महत्या करतो’ असा मेसेज, फोन बंद अन् पोलीस अंमलदार बेपत्ता; तांत्रिक तपासातून बारमध्ये सापडला अन्...

Follow Us
Follow Us:
  • आत्महत्येचा मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता
  • नारायणगावातील बारमध्ये मद्यधुंद अवस्थेत सापडला
  • वरिष्ठांवरील आरोपांची पोलीस प्रशासनाकडून चौकशी
पिंपरी : कामावर गैरहजर राहिल्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी जाब विचारल्यानंतर एका पोलीस अंमलदाराने आत्महत्या करणार असल्याचा संदेश पाठवून अचानक बेपत्ता झाल्याने पोलीस यंत्रणेची धावपळ उडाली. काही तासांच्या शोधमोहिमेनंतर संबंधित अंमलदार नारायणगाव परिसरातील एका बारमध्ये मद्यधुंद अवस्थेत आढळून आला. त्यामुळे चिंतेत असलेल्या पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

नेमकी घटना काय?

संबंधित पोलीस अंमलदार कामावर गैरहजर राहिल्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी त्याला याबाबत विचारणा केली होती. यावरून सकाळी दोघांमध्ये वाद झाला. वरिष्ठांकडून आपल्याला त्रास होत असल्याचा आरोप करत अंमलदाराने मोबाईलवर आपण आत्महत्या करणार असल्याचा संदेश पाठवला. त्यानंतर त्याचा मोबाईल बंद झाला आणि त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. आत्महत्येचा संदेश आणि त्यानंतर संपर्क तुटल्याने पोलीस यंत्रणा तातडीने सतर्क झाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत अंमलदाराचा शोध सुरू केला.

हेही वाचा: MPSCच्या अभ्यासात जुळले सूर, PSI होण्यासाठी दिले 2.20 लाख, त्याच पतीने मागितले 40 लाख; प्रेमविवाहाची धक्कादायक कहाणी!

आधीच्या घटनेमुळे पोलिसांची चिंता वाढली

काही दिवसांपूर्वीच एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या आरटीपीसीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर पोलीस अंमलदाराने आत्महत्या करणार असल्याचा संदेश पाठवल्याने पोलिसांनी ही बाब अत्यंत गांभीर्याने घेतली. अंमलदाराचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू करण्यात आले. त्याच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून त्याचे लोकेशन शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला.

हेही वाचा: झुरळे, उंदरांनी कुरतडलेले अन्न; डॉमिनोजच्या मुंबईतील ३ आउटलेट्सचे परवाने FDAने केले निलंबित

तांत्रिक विश्लेषणातून नारायणगावात शोध

तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संबंधित अंमलदार नारायणगाव परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस पथकाने तातडीने त्या परिसरातील एका बारमध्ये धाव घेतली. तेथे संबंधित अंमलदार मद्यधुंद अवस्थेत बसलेला आढळून आला. त्यामुळे काही तासांपासून त्याच्या सुरक्षिततेबाबत चिंतेत असलेल्या पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला. दरम्यान, संबंधित अंमलदाराने वरिष्ठ अधिकाऱ्यांवर मानसिक छळाचे गंभीर आरोप केल्याचे समोर आले आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत सत्यता अद्याप स्पष्ट झालेली नाही. या संपूर्ण प्रकरणाची पोलीस प्रशासनाकडून चौकशी केली जात आहे.

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: . पोलीस अंमलदाराने आत्महत्येचा मेसेज का पाठवला?

    Ans: कामावर गैरहजर राहिल्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी जाब विचारल्यानंतर वाद झाला. वरिष्ठांकडून त्रास होत असल्याचा आरोप करत त्याने आत्महत्येचा मेसेज पाठवला.

  • Que: वरिष्ठ अधिकाऱ्यांवर काय आरोप करण्यात आले आहेत?

    Ans: अंमलदाराने वरिष्ठांकडून मानसिक छळ होत असल्याचा आरोप केला आहे. या आरोपांची सत्यता अद्याप स्पष्ट झालेली नाही

  • Que: या प्रकरणात पुढे काय होणार?

    Ans: पोलीस प्रशासनाकडून संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात आहे.

Web Title: Pimpri police constable missing suicide message found bar narayangaon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 05:07 PM

Topics:  

  • Missing Case
  • Pimpri Police
  • pune news update
  • Pune Police Action
  • Suicide case

संबंधित बातम्या

प्रशिक्षणार्थी PSI पतीकडून विवाहितेचा छळ, पिस्तूल दाखवून धमकावल्याचा आरोप; नेमकं प्रकरण काय?
1

प्रशिक्षणार्थी PSI पतीकडून विवाहितेचा छळ, पिस्तूल दाखवून धमकावल्याचा आरोप; नेमकं प्रकरण काय?

‘मी आणखी किती सहन करू?’ पोस्टनंतर यूट्यूबर बेपत्ता; १.७५ कोटींच्या खंडणीप्रकरणी गुन्हा
2

‘मी आणखी किती सहन करू?’ पोस्टनंतर यूट्यूबर बेपत्ता; १.७५ कोटींच्या खंडणीप्रकरणी गुन्हा

लग्नाला अवघे चार महिने अन् नवविवाहितेने संपवले जीवन; पतीने फसवल्याचा माहेरच्यांचा आरोप
3

लग्नाला अवघे चार महिने अन् नवविवाहितेने संपवले जीवन; पतीने फसवल्याचा माहेरच्यांचा आरोप

पोलिस ठाण्यात बोलावून दुकानदाराला दिला त्रास, गुन्ह्याची धमकी देत उकळली खंडणी; पुण्यात खळबळ
4

पोलिस ठाण्यात बोलावून दुकानदाराला दिला त्रास, गुन्ह्याची धमकी देत उकळली खंडणी; पुण्यात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.