Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्नाला अवघे चार महिने अन् नवविवाहितेने संपवले जीवन; पतीने फसवल्याचा माहेरच्यांचा आरोप

लग्नाला अवघे चार महिने झाले होते... आदल्या रात्री आईला फोन करून संजनाने रडत आपल्या मनातील वेदना सांगितल्या. मात्र, दुसऱ्याच दिवशी घरातील वरच्या खोलीत ती बेशुद्धावस्थेत आढळली. रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. आता तिच्या माहेरच्यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे या घटनेचे गूढ वाढले आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 14, 2026 | 02:47 PM
लग्नाला अवघे चार महिने अन् नवविवाहितेने संपवले जीवन; पतीने फसवल्याचा माहेरच्यांचा आरोप

लग्नाला अवघे चार महिने अन् नवविवाहितेने संपवले जीवन; पतीने फसवल्याचा माहेरच्यांचा आरोप

Follow Us
Follow Us:
  • चार महिन्यांतच संजनाने गळफास घेत जीवन संपवले
  • पतीने सरकारी अधिकारी असल्याचे सांगून फसवल्याचा आरोप
  • आत्महत्येच्या आदल्या रात्री आईला फोन; सासरी छळाचा आरोप
 

छत्रपती संभाजीनगर : शहरातील हडको परिसरातील एन-१३ वानखेडेनगर येथे नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संजना नीलेश शेजवळ (२३) असे मृत विवाहितेचे नाव आहे. अवघ्या चार महिन्यांपूर्वी तिचे लग्न झाले होते. लग्नानंतर पतीने आपली फसवणूक केल्याचे समोर आले आणि सासरीही मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे. संजना ही जालना येथील रावसाहेब मगरे यांची धाकटी मुलगी होती. तिने कॉम्प्युटर डिप्लोमा पूर्ण केला होता. ४ जून २०२६ रोजी तिचे नीलेश शेजवळ याच्यासोबत लग्न झाले होते. लग्न जुळवताना नीलेशने आपण शासकीय अधिकारी असल्याचे सांगितल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. मुलीचे भविष्य सुरक्षित राहील, या विश्वासाने कुटुंबीयांनी थाटामाटात तिचे लग्न लावून दिले.

लग्नानंतर समोर आले वेगळेच सत्य

लग्नानंतर काही दिवसांतच नीलेश हा शासकीय अधिकारी नसून परदेशात विद्यार्थ्यांना पाठविणाऱ्या एका कन्सल्टन्सीमध्ये काम करत असल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले, असा आरोप आहे. लग्न करताना आपली फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतरही संजनाने संसार टिकवण्याचा प्रयत्न केला. मात्र, सासरी स्वयंपाक आणि राहणीमानावरून तिला वारंवार टोमणे मारले जात होते, असा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे. या प्रकारामुळे ती मानसिक तणावात होती, असेही नातेवाईकांनी सांगितले.

हेही वाचा: शाळेला निघाले अन् काळाने गाठले! विद्यार्थ्यांनी भरलेली रिक्षा उलटली, नववीतील मुलाचा मृत्यू

आईला रडत फोन; दुसऱ्याच दिवशी धक्कादायक घटना

घटनेच्या आदल्या रात्री संजनाने आईला फोन करून सासरी होत असलेल्या त्रासाबाबत रडत माहिती दिली होती. आईशी फोनवर बोलल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ती घरातील वरच्या मजल्यावरील खोलीत बेशुद्धावस्थेत आढळून आली.  कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. या घटनेनंतर संजनाच्या माहेरच्यांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. सासरच्या मंडळींनी घटनेची माहिती देण्यास उशीर केला तसेच रुग्णालयातून थेट निघून गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. संजनाच्या आत्महत्येमागे नेमकी कोणती कारणे होती, तसेच माहेरच्यांनी केलेल्या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

Web Title: Chhatrapati sambhajinagar newlywed sanjana shejwal suicide sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 02:47 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • Death
  • latest news
  • Suicide case

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar : शेतीत २ लाखांचा खर्च, हातात फक्त ५ हजार! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची सरकारकडे सरसकट मदतीची मागणी
1

Chhatrapati Sambhajinagar : शेतीत २ लाखांचा खर्च, हातात फक्त ५ हजार! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची सरकारकडे सरसकट मदतीची मागणी

Nana Patekar: नाना पाटेकरांच्या निधनानंतर ५ दिवसांनी ‘साळू’ची पोस्ट; सोशल मीडियावर पोस्ट लिहित व्यक्त केलं दुःख
2

Nana Patekar: नाना पाटेकरांच्या निधनानंतर ५ दिवसांनी ‘साळू’ची पोस्ट; सोशल मीडियावर पोस्ट लिहित व्यक्त केलं दुःख

Crime News: बस थांबली अन् वृद्ध महिलेची बॅग गायब; १.७८ लाखांची चोरी करणाऱ्या चार महिला जाळ्यात
3

Crime News: बस थांबली अन् वृद्ध महिलेची बॅग गायब; १.७८ लाखांची चोरी करणाऱ्या चार महिला जाळ्यात

पिंपळवंडीत पुलावर तरुणाला मारहाण, जीव वाचवण्याच्या प्रयत्नात मृत्यू; नेमकं काय घडलं?
4

पिंपळवंडीत पुलावर तरुणाला मारहाण, जीव वाचवण्याच्या प्रयत्नात मृत्यू; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.