
जुलै2025 मध्ये अंधेरी येथे अमलीपदार्थ विरोधी पथकाने केलेल्या छाप्यात अधिका-यांनी दिडोशी येथील रहिवासी प्रदीप उपाध्याय याच्याकडून सुमारे 2.22 कोटींच्या ट्रॅमाडोल या नियंत्रित ओपिओइडच्या 1.1 लाखांहून अधिक गोळ्या जप्त केल्याचा दावा केला होता. त्यानंतर भावेश शाह, सुकांत डोळे, रोहन अवसरे, राजेश पवार, साईकृष्ण लगिशेट्टी आणि मोहम्मद मोमीन यांच्यासह अनेक आरोपीना वाइडिंग मशीन आणि कुरिअर सेवांचा वापर करून अमली पदार्थाच्या तस्करीच्या आरोपाखाली अटक केली. इत्तर आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, काश्मीर सदर उर्फ दहिया नावाच्या हरियाणाच्या आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली. 30 डिसेंबर2025 रोजी मिळालेल्या कलिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालात जप्त केलेल्या नमुन्यांमध्ये ट्रॅमाडोलचे कोणतेही अंश आढळले नाहीत.
केवल निकाल अनुकूल नाही, या कारणास्तव नमुने पुन्हा तपासणीसाठी पाठवता येणार नाहीत. याउलट इतर सर्व प्रकरणामध्ये अभियोग पक्ष कलिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेने सादर केलेल्या अहवालांवर अवलंबून असतो, अभियोग पक्षाने आपला दावा सिद्ध करण्यासाठी कलिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेविरुद्ध कोणतेही आरोप किंवा प्रतिकूल युक्तिवाद केलेले नाहीत, नकारात्मक अहवाल मिळाल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत पुन्हा तपासणीसाठी विनंती केली जाऊ शकते, परंतु अभियोग पक्षाने कोणत्याही अपवादात्मक परिस्थितीचा उल्लेख केला नव्हता.
– न्या. अरविंद एम भंडारवार, विशेष न्यायाधीश