crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
लातूर जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या आत्महत्यांनी जिल्हा हादरला होता. एकीकडे मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद सुरू असताना महादेव कोळी समाज आणि बंजारा समाजातील दोन जणांनी आतहमत्या केली होती. आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या कपड्यातून चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या होत्या. मात्र पोलिसांनी तपास केला आणि भलतच समोर आल. आर्थिक लाभासाठी समाजाला पण वेठीस धरल्याचं समोर आल आहे. तीन वेगवेगळ्या घटना एक निलंगा , दुसरी चाकूर तर तिसरी अहमदपूर तालुक्यात घडली होती. तीन प्रकरणात वेगवेगळ्या आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याचं स्पष्ट झालं होत. पण काय झाल नक्की वाचा
निलंगा तालुक्यातील दादगी इथ वाल्मिक मेळे यांनी महादेव कोळी समाजाला जातीचे प्रमाणपत्र मिळत नाही म्हणून १३ सप्टेंबरला आत्महत्या केली. मात्र प्रत्यक्षात त्यांचा मृत्यू झाला इलेक्ट्रिक गॅसच्या शेगडीचा धक्का लागून मृत्यू झाला होता. मात्र इतरानी चिठ्ठीमध्ये आरक्षणचा उल्लेख केला
हनमंतवाडी तांडा इथ बळीराम राठोड याचा घरावर पाणी मारत मारत असताना विद्युत पंपातून धक्का बसला आणि त्यात त्याचा मृत्य झाला . मात्र चिट्ठी लिहून बंजारा समाजाला आरक्षण मिळाव म्हणून आत्महत्या केली असल्याचा बनाव रचण्यात आला.
अहमदपूर तालुक्यात शिंदगी इथले बळीराम मुळे यांनी विषारी द्रव पिवून आत्महत्या केली .मात्र प्रत्यक्षात मराठा आरक्षणसाठी आत्महत्या केल्याच भासवण्यात आल.मात्र लिहिलेली सुसाईड नोट ही त्यांच नसल्याच पोलीस तपासात उघड झालं.
पोलिसांनी कसा केल उलगडा ?
या तिन्ही प्रकरणात पोलिसांनी सुसाईड नोट्स जप्त केल्या. त्याच हस्ताक्षर तज्ञांकडून तपासून पाहील तेव्हा हे अक्षर त्यांच नसल्याचं लक्षात आल. आर्थिक फायद्यासाठी कोणीतरी चिठ्ठी लिहून त्यांच्या कपड्यात ठेवली आणि त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आता आयपीसी सेक्शन प्रमाणे स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. तीन वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात हे गुन्हे दाखल झाले आहेत. मृत व्यक्तीच्या नंतर घडलेली घटना वेगळी आणि माथी मारायची बनाव वेगळा हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. समाजाची फसवणूक करून त्यांना वेठीस धरणे आणि तेढ निर्माण करणे हा गंभीर गुन्हा आहे अस सांगत पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत . लातूर जिल्ह्यात घडलेल्या तीन घटना मात्र बनाव रचून तयार करण्यात आल्या प्रत्यक्षात मृत्यू वेगळ्या कारणाने झालेले पाहायला मिळाले.