Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाळू माफियांचे थेट प्रशासनाला आव्हान! पोलीस पाटलांच्या ताब्यातून जप्त केलेली वाहने पळवली; तालुक्यात खळबळ

वाळू माफियांनी पोलीस पाटलांच्या ताब्यातून जप्त केलेली ३ वाहने दमदाटी करून पळवून नेली. या घटनेमुळे खळबळ उडाली असून उपविभागीय अधिकारी अरुण जव्हाड यांनी कडक कारवाईचे आणि परवाने रद्द करण्याचे आदेश दिले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 18, 2026 | 04:36 PM
वाळू माफियांचे थेट प्रशासनाला आव्हान! पोलीस पाटलांच्या ताब्यातून जप्त केलेली वाहने पळवली (Photo Credit- X)

वाळू माफियांचे थेट प्रशासनाला आव्हान! पोलीस पाटलांच्या ताब्यातून जप्त केलेली वाहने पळवली (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • वाळू माफियांचे थेट प्रशासनाला आव्हान!
  • पोलीस पाटलांच्या ताब्यातून जप्त केलेली वाहने पळवली
  • तालुक्यात खळबळ
वाळूमाफियांनी आता थेट प्रशासनालाच आव्हान दिल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. पोलिस पाटलांच्या रखवालीत असलेली तीन वाहने दमदाटी करीत माफियांनी पळवून नेल्याचा खळबळ घटना घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोदावरी आणि शिवना नदी पात्रात वाळू माफियांचा वाढता बेकायदेशीर कारभार आता थेट प्रशासनालाच आव्हान देऊ लागला आहे. महसूल पथकाने पकडलेली अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने पोलीस पाटलांच्या ताब्यात देण्यात आली; मात्र माफियांनी धाडसी पाऊल उचलत दमदाटी करून हीच वाहने पळवून नेली. या थरारक प्रकारामुळे तालुक्यात खळबळ उडाली असून, माफियांच्या या डेअरिंगमुळे प्रशासनाला तातडीने ‘अॅक्शन मोड’वर यावे लागले, उपविभागीय अधिकाऱ्यांनी कडक कारवाईचे आदेश देत गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिल्याने वाळू माफियांच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील लाखणी येथे १५ फेब्रुवारी रोजी पहाटे १.४० वाजता जप्त करण्यात आलेले एमएच २० जीसी ५२६६ हे वाहन बादल सुभाष राजपूत (रा. झोलेगाव) यांचे असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र अधिकृत ताब्यात असलेले हे वाहन पहाटे ३ ते ४ दरम्यान दमदाटी करून स्वतःच पळवून नेल्याची नोंद आहे. लासूरगाव परिसरात १४ फेब्रुवारी रोजी पकडलेले एमएच २० जीझेड ५२१३ हे वाहन दिनेश शिंदे (रा. रोटेगाव) यांचे असल्याचे निष्पन्न झाले, तर विनाक्रमांक वाहन गणेश गायकवाड (रा. जळगाव) यांचे असल्याचे पुढे आले. ही दोन्ही वाहनेही पोलीस पाटलांच्या ताब्यातून जबरदस्तीने काढून नेण्यात आल्याची माहिती आहे. शासकीय ताब्यातील वाहने स्वतःच्या बळावर पळवणे हे वाळू माफियांच्या वाढत्या डेअरिंगचे उदाहरण मानले जात असून प्रशासनाने संबंधितांविरुद्ध कड़क कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.

Nagpur Accident: भरधाव वेगात बुलेटवर स्टंट ठरला जीवघेणा; भीषण अपघातात 19 वर्षीय दोन मित्रांचा मृत्यू

दरम्यान उपविभागीय अधिकारी अरुण जव्हाड यांनी संबंधित वाहन मालकांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३५१, ३०३ व १३२ अंतर्गत तसेच महाराष्ट्र गौण खनिज कायद्यानुसार तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. शासकीय कामात अडथळा आणणे आणि सार्वजनिक मालमत्तेची चोरी केल्याबद्दल कठोर कारवाई करण्याबरोबरच मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम ८६ नुसार संबंधित वाहनांचे परवाने निलंबित करून वाहने जप्त ठेवण्याबाबत आरटीओला स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

८ प्रकरणाची सविस्तर माहिती

वैजापूरचे उपविभागीय अधिकारी, अरुण जन्हाड जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आली असून, २ दिवसांच्या आत अनुपालन अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वाळू माफियांच्या वाढत्या दादागिरीला लगाम चालण्यासाठी महसूल, पोलीस आणि परिवहन विभाग यांच्यात समन्वय वाढवण्यात आला आहे. संबंधित माफियांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Amravati Crime: अमरावतीत भीषण अपघात! इलेक्ट्रिक बस-रिक्षा धडकेत शाळकरी मुलासह ५ जणांचा जागीच मृत्यू

Web Title: Sand mafia steals vehicles seized from police custody

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 04:36 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • crime news

संबंधित बातम्या

उन्हाळ्यात पाणीटंचाई रोखण्यासाठी महापौरांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; २५ फेब्रुवारीपर्यंत दिले कडक आदेश
1

उन्हाळ्यात पाणीटंचाई रोखण्यासाठी महापौरांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; २५ फेब्रुवारीपर्यंत दिले कडक आदेश

Chhatrapati Sambhajinagar : पोलीस होण्याचं स्वप्न अधुरंच! सरावासाठी गेलेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर
2

Chhatrapati Sambhajinagar : पोलीस होण्याचं स्वप्न अधुरंच! सरावासाठी गेलेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

बारावी परीक्षेचा ताण असहाय्य झाल्याने विद्यार्थिनीचे टोकाचे पाऊल; गळफास घेऊन संपवलं जीवन
3

बारावी परीक्षेचा ताण असहाय्य झाल्याने विद्यार्थिनीचे टोकाचे पाऊल; गळफास घेऊन संपवलं जीवन

छत्रपती संभाजीनगरच्या सिन्नरमध्ये भंगार दुकानाला भीषण आग; तब्बल सहा तासांच्या प्रयत्नानंतर…
4

छत्रपती संभाजीनगरच्या सिन्नरमध्ये भंगार दुकानाला भीषण आग; तब्बल सहा तासांच्या प्रयत्नानंतर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.