Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यात पाणीटंचाई रोखण्यासाठी महापौरांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; २५ फेब्रुवारीपर्यंत दिले कडक आदेश

महापौर समीर राजूरकर यांनी पदभार सांभाळताच दुसऱ्या दिवशी चिकलठाणा ते सिडको दरम्यान पाणी वितरणातील अडीअडचणी समजून घेतल्या. पाणी वितरणात असलेल्या त्रुटींची माहिती घेतली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 18, 2026 | 03:28 PM
उन्हाळ्यात पाणीटंचाई रोखण्यासाठी महापौरांचा 'अ‍ॅक्शन प्लॅन' (Photo Credit- X)

उन्हाळ्यात पाणीटंचाई रोखण्यासाठी महापौरांचा 'अ‍ॅक्शन प्लॅन' (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • उन्हाळ्यात पाणीटंचाई रोखण्यासाठी महापौरांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’
  • २५ फेब्रुवारीपर्यंत दिले कडक आदेश
  • नो-नेटवर्क भागाला पाणी देण्यासाठी आग्रह धरू नका
Chhatrapati Sambhajinagar Water Supply: छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाळ्यात पाणीटंचाई भासू नये, नागरिकांना मुबलक पाणी मिळावे, वितरण व्यवस्थेतील गॅप कमी व्हावा यासाठी मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांनी २५ फेब्रुवारीपर्यंत सविस्तर आराखडा तयार करून सादर करावा, असे आदेश महापौर समीर राजूरकर यांनी दिले. वितरणामधील अडचणी मांडण्यापेक्षा उपाययोजना सूचवत त्याची अंमलबजावणी कराव्यात अशी कानउघडणी महापौरांनी केली.

महापौर समीर राजूरकर यांनी पदभार सांभाळताच दुसऱ्या दिवशी चिकलठाणा ते सिडको दरम्यान पाणी वितरणातील अडीअडचणी समजून घेतल्या. पाणी वितरणात असलेल्या त्रुटींची माहिती घेतली. त्यानंतर शहरातील पाण्याचा गॅप करण्यासाठी बैठक बोलावण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार मंगळवारी महापौर यांच्या दालनात पाण्याचा गॅप करण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीस महापौर समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, आयुक्त जी. श्रीकांत, पाणी पुरवठा विभागाचे समन्वयक ए. बी. देशमुख, के. एम. फालक, कार्यकारी अभियंता वसंत भोये, अनिल तनपूरे, किरण धांडे आदींसह अधिकारी उपस्थित होते.

महापौर समीर राजूरकर यांनी उन्हाळा तोंडावर आलेला आहे. शहरातील पाणी वितरण अद्यापही सुरळीत झालेले नाही. अनेक भागाला आठ दिवसाआड तर काही भागाला दहा ते बारा दिवसाआड पाणी मिळत आहे. पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी आतापासूनच नियोजन करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

Chhatrapati Sambhajinagar : पोलीस होण्याचं स्वप्न अधुरंच! सरावासाठी गेलेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

नऊशेच्या पाइपलाइनमधून ७५ एमएलडी कधी मिळेल?

शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी ९०० मिमी व्यासाची पाइपलाइन टाकण्यात आली. या पाइपलाइनमधून ७५ एमएलडी पाणी मिळणार आहे. परंतु, या पाइपलाइनमधून २५ एमएलडी पाणी येत आहे. ७५ एमएलडी पाणी कधी मिळणार? असा प्रश्न विचारला. त्यावर आयुक्त जी. श्रीकांत म्हणाले की, ९०० च्या पाइपलाइनमधून ७५ एमएलडी पाणी मिळण्यासाठी फारोळा येथे त्या क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले नाही. नवीन जलशुद्धीकरण केंद्रातून २५ एमएलडी आणले जात आहे.

दबाव टाकून वेळापत्रक बदलू नये : जी. श्रीकांत

शहराला पाणी पुरवठा करताना अनेक अडचणी येत आहे. पाणी पुरवठा सुरळीत करताना नगरसेवकानी दबाव टाकून आधी या भागाला पाणी सोडा, असे म्हणत पाण्याचे वेळापत्रक बदलू नये, अशी विनंती आयुक्त जी. श्रीकांत यांनी केली. अनधिकृत नळ कनेक्शन शोधण्यासाठी नगरसेवकांनी मदत करावी. २५ फेब्रुवारीपर्यंत पाण्याचा गॅप कमी करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या सविस्तर आराखड्यामध्ये गळती, ट्रान्सफार्मर जळण्याची शक्यता गृहीत धरूनच आराखडा तयार करावा अशा सूचना आयुक्त जी. श्रीकांत यांनी केल्या.

नो-नेटवर्क भागाला पाणी देण्यासाठी आग्रह धरू नका

शहरातील पाण्याचा गॅप कमी करण्यासाठी सविस्तर आराखडा तयार केला जात आहे. शहराचा गैप कमी करून पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. परंतु, अनेक नगरसेवक नो-नेटवर्क भागाला पाइपलाइनद्वारे पाणी देण्याचा आग्रह करीत आहे. जोपर्यंत नवीन पाणी पुरवठा योजना पूर्ण होत नाही, तोपर्यंत नो-नेटवर्क भागाला पाणी मिळणार नाही. त्यामुळे नगरसेवकांनी नो-नेटवर्क भागाला पाणी देण्याचा आग्रह धरू नये, या भागाला टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू असल्याचे आयुक्तांनी बैठकीत स्पष्ट केले.

Z.P. School Ganori: जि.प. गणोरी शाळेची राष्ट्रीय स्तरावर झेप; पर्यावरणपूरक कुंड्या प्रकल्पाचा नागपुरात सन्मान

Web Title: Mayors action plan to prevent water shortage in summer strict orders issued till february 25

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 03:28 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Water Issue

संबंधित बातम्या

अकोल्यात जलजन्य आजारांनी वाढवली चिंता; उपाययोजनेच्या नावाखाली केवळ ब्लिचिंग पावडरचा वापर
1

अकोल्यात जलजन्य आजारांनी वाढवली चिंता; उपाययोजनेच्या नावाखाली केवळ ब्लिचिंग पावडरचा वापर

माण तालुक्यातील मुरुमशेंडा वस्तीत विहिरी-बोअरवेलचे पाणी दूषित; लहान मुले, महिला-पुरुषांच्या अंगावर जखमा
2

माण तालुक्यातील मुरुमशेंडा वस्तीत विहिरी-बोअरवेलचे पाणी दूषित; लहान मुले, महिला-पुरुषांच्या अंगावर जखमा

Chhatrapati Sambhajinagar Asian Hospital Fire: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग; ९ नवजात बालकांना वाचवण्यात यश
3

Chhatrapati Sambhajinagar Asian Hospital Fire: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग; ९ नवजात बालकांना वाचवण्यात यश

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा
4

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.