Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli Crime: धक्कादायक! संशयाच्या भरात पतीने पत्नीचा जीव घेतला; नातेवाईकांसमोरच मारहाण

आटपाडी तालुक्यातील निंबवडे येथे चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीची लाकडाने मारहाण करून हत्या केली. भांडणादरम्यान नातेवाईकांसमोरच हा प्रकार घडला. आरोपीला अटक करून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 21, 2026 | 02:54 PM
Tuljapur News: तुळजापूरमध्ये अवैध धंदे वाढले; नगराध्यक्षांचा पोलिसांना इशारा (फोटो सौजन्य: social media)

Tuljapur News: तुळजापूरमध्ये अवैध धंदे वाढले; नगराध्यक्षांचा पोलिसांना इशारा (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • आधीपासून कौटुंबिक वाद
  • रात्री जोरदार भांडण
  • लाकडाने बेदम मारहाण करून हत्या
सांगली: सांगली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीनेच पत्नीची हत्या केल्याचे समोर आले आहे. चारित्र्यावर संशय घेत लाकडाने मारहाण करत ही हत्या करण्यात आली. मंगल अंकुश वाघमारे (वय ३२) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना निंबवडे (ता. आटपाडी) येथे घडली.

काय घडलं नेमकं?

या प्रकरणातील आरोपीचे नाव अंकुश बाळू वाघमारे (वय ३७, मूळ रा. गायमळा आदिवासी पाडा, ता. सुधागड, जिल्हा रायगड) असे नाव आहे. पोलिसांनी अंकुशला अटक केली आहे. मंगल वाघमारे या पती अंकुश बाळू वाघमारे यांच्यासह निंबवडे गावाबाहेरील ओढ्यालगत रामचंद्र मोटे यांच्या शेतात खोपटे बांधून वास्तव्यास होत्या. हे कुटुंब कोळसा तयार करून विक्री करण्याचा व्यवसाय करत होते. त्यांच्यामागे काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरु होते. अंकुश वाघमारे हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत वारंवार पत्नीशी भांडण करत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

योनी शुद्धीकरण, २०० हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण ; अशोक खरातबाबत दत्तात्रय खेमनार यांचे खळबळजनक दावे

कशी केली हत्या?

१९ मार्च रोजी सकाळी दोघांमध्ये वाद झाला होता. मात्र नातेवाईकांनी हस्तक्षेप करून तो वाद मिटवला होता. रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास पुन्हा दोघांमध्ये जोरदार भांडण सुरु झाले. यावेळी मंगल वाघमारे हिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून तिचा भाऊ, वहिनी तसेच इतर नातेवाईक धावत घटनास्थळी गेले. अंधार असल्याने त्यांनी मोबाइलच्या उजेडात ओपाहिले तेव्हा अंकुश हा मंगल हिला लाकडाने मारहाण करत होता. नातेवाइकांना पाहताच तो घटनास्थळावरून पसार झाला.

या मारहाणीत मंगल हि गंभीर जखमी झाली होती. मंगल हिल निंबवडे गावात आणण्यात आले. रुग्णवाहिकेमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर मंगल वाघमारे हिला मृत घोषित केले. त्यानंतर आटपाडी पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह आटपाडी येथील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील कारवाई करत आहे.

UttarPradesh Crime: पतीनेच रचला पत्नीच्या हत्येचा कट! आधी शेतात भेटायला बोलावले नंतर निर्घृण हत्या; कारण काय?

💡

Frequently Asked Questions

  • Que: घटना कुठे घडली?

    Ans: सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील निंबवडे येथे.

  • Que: मृत महिलेचे नाव काय?

    Ans: मंगल अंकुश वाघमारे.

  • Que: हत्या कशी करण्यात आली?

    Ans: पतीने लाकडाने मारहाण करून.

Web Title: Sangli crime shocking driven by suspicion husband kills wife assault takes place right in front of relatives

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 02:54 PM

Topics:  

  • crime
  • Sangli
  • Sangli Crime

संबंधित बातम्या

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी
1

Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरले! मातोश्री वृद्धाश्रमात रक्ताचा पाऊस! २ जणांची निघृण हत्या, ६ जण जखमी

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त
2

Lawrence Bishnoi Gang: लॉरेन्स बिश्नोई गँगच्या ‘बिल्ला-कट्टा’वर AGTFची मोठी कारवाई; जमिनीत पुरलेली शस्त्रे जप्त

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
3

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Sangli News : शिक्षक बँकेच्या कारभाराची न्यायालयीन चौकशी करा; जागा खरेदी, इमारत बांधकामासह 10 कोटींच्या खर्चावर प्रश्न
4

Sangli News : शिक्षक बँकेच्या कारभाराची न्यायालयीन चौकशी करा; जागा खरेदी, इमारत बांधकामासह 10 कोटींच्या खर्चावर प्रश्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.