Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli Crime: रेल्वे तिकिटाने उघड झाला हत्येचा कट, उसाच्या शेतात सापडला कुजलेला मृतदेह; पती-सासराच निघाले आरोपी

सांगलीच्या मिरज तालुक्यात उसाच्या शेतात सापडलेल्या कुजलेल्या महिलेच्या मृतदेहाचा उलगडा झाला. घटनास्थळी मिळालेल्या रेल्वे तिकिटामुळे पती व सासऱ्याने पूर्वनियोजित कट रचून खून केल्याचे स्पष्ट झाले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 05, 2026 | 11:34 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • उसाच्या शेतात कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला
  • घटनास्थळी सापडलेल्या रेल्वे तिकिटामुळे तपासाला दिशा मिळाली
  • चारित्र्याच्या संशयातून पती व सासऱ्यानेच खून केल्याचा उलगडा
सांगली: सांगली जिल्ह्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका उसाच्या शेतात कुजलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी या हत्येचा उलगडा केला आहे. महिलेची हत्या करणारे दुसरे तिसरे कोणी नसून तिचा पती आणि सासरा आहे. चारित्र्याचा संशय आणि पोलिसांत दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरून पती आणि सासऱ्यानेच या महिलेचा निर्घृण खून केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. घटनास्थळी सापडलेल्या एका रेल्वे तिकीटाने या हत्येचा उलगडा केला आहे. ही घटना मिरज तालुक्यातील बोलवाड येथे घडली आहे.

Chhatrapati Sambhajinagar: घरात मोबाईल, बाहेर मृतदेह! वैजापूरातील पोलिस नाईकाची हत्या; संभाजीनगर हादरलं!

कसा केला उलगडा?

२३ डिसेंबर रोजी बोलवाड (ता. मिरज) येथील उसाच्या शेतात एका महिलेचा कुजलेलया अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची ओळख पटवणे कठीण असल्याने मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपास हाती घेतल्यानंतर घटनास्थळी पुणे ते मीराज दरम्यानचे रेल्वे तिकीट आढळून आले. हे तिकीट १६ डिसेंबर रोजी पुणे रेल्वे स्थानकावर काढण्यात आल्याचे निष्पन्न झाले. या तिकिटाच्या आधारे पोलिसांनी पुणे आणि मिरज रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजमध्ये मृतकाचा पती आणि सासरे हे दोघे प्रवास करतांना दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी दोघांचा शोध घेऊन सखोल चौकशी केली असता खुनाचा संपूर्ण कट उघड झाला.

कशी केली हत्या?

मृत महिलेचा सासरा याने यापूर्वी यापूर्वी मिरज तालुक्यातील मालगाव परिसरात म्हशीच्या गोठ्यात काम केले होते. त्यामुळे त्याला परिसराची सखोल माहिती होती. त्याने हत्येचा कट रचला. उत्तर प्रदेशात खून केल्यास तात्काळ संशय येईल, त्यामुळे महाराष्ट्रात आणून खून केल्यास प्रकरण उशिरा उघडकीस येईल, असा आरोपींचा अंदाज होता. त्यानुसार पीडित महिलेला पुण्याच्या मार्गे मिरज परिसरात आणण्यात आले आणि बोलवाड येथील उसाच्या शेतात तिचा खून करण्यात आला. मात्र, घटनास्थळी सापडलेल्या रेल्वे तिकिटामुळे आरोपींचा कट फसला. आरोपींना अटक करण्यात आली आहे.

का केली हत्या?

मृत महिला हिचे आरोपी पतीशी दुसरे लग्न झाले होते. मात्र, तिने आपले पहिले लग्न लपवून ठेवल्याची बाब त्याला नंतर समजली. यावरून दोघांमध्ये सतत वाद होत होते. याच काळात तिने पती आणि सासरच्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमुळे तिचा पती आणि सासरा यांच्यात मनात प्रचंड चीड निर्माण झाली होती. यातूनच पीडितेच्या काटा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

पोलीस तपास सुरु?

मृत महिलेचे नाव नितू ऊर्फ शालिनी आकाश यादव (वय 35) असून ती मूळची उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील रहिवासी होती. आरोपी पाटीच नाव
आकाश ऊर्फ विशाल दीनदयाळ यादव (वय 24) आणि आरोपी सासरा दीनदयाळ रामबाली यादव (वय 55, रा. खुज्झी, ठाणा चंदवक, जि. जौनपूर, उत्तर प्रदेश) असे आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. सध्या दोन्ही आरोपी पोलिस कोठडीत असून पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा करीत आहे.या घटनेमुळे सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Nanded Crime: नांदेडमध्ये गुरुद्वाराजवळ गोळीबाराचा थरार; 24 तासांत पोलिसांची मोठी कारवाई, दोन्ही गटांतील 10 आरोपी अटकेत

💡

Frequently Asked Questions

  • Que: महिलेचा मृतदेह कुठे सापडला?

    Ans: मिरज तालुक्यातील बोलवाड येथील उसाच्या शेतात.

  • Que: हत्येचा उलगडा कसा झाला?

    Ans: घटनास्थळी सापडलेल्या पुणे–मिरज रेल्वे तिकिटामुळे.

  • Que: आरोपी कोण आहेत?

    Ans: मृत महिलेचा पती आणि सासरा.

Web Title: Sangli crime the murder plot was uncovered by a train ticket a decomposed body was found in a sugarcane field

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2026 | 11:34 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
1

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
2

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक
3

Assam Crime: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर चेहरा ठेचून प्राईव्हट पार्टमध्ये रॉड…; अल्पवयीन आरोपीसह पाच जणांना अटक

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
4

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.