Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Father-in-Law Suicide Case: सांगलीत सुनेचा थरार! २० लाखांची मागणी अन् बलात्काराच्या धमकीने त्रासलेल्या सासऱ्याची आत्महत्या!

Father-in-Law Suicide Case: सांगली जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. सुनेच्या सततच्या त्रासाला, २० लाखांच्या खंडणीला आणि बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या धमकीला कंटाळून एका ६३ वर्षीय सासऱ्याने शेतात विष पिऊन आपले आयुष्य संपवले आहे. या भयानक विश्वासघाताने संपूर्ण सांगली हादरली आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 02, 2026 | 05:27 PM
Father-in-Law Suicide Case: सांगलीत सुनेचा थरार! २० लाखांची मागणी अन् बलात्काराच्या धमकीने त्रासलेल्या सासऱ्याची आत्महत्या!

Father-in-Law Suicide Case: सांगलीत सुनेचा थरार! २० लाखांची मागणी अन् बलात्काराच्या धमकीने त्रासलेल्या सासऱ्याची आत्महत्या!

Follow Us
Follow Us:
  • सुनेच्या छळाला कंटाळून ६३ वर्षीय सासऱ्याने विष प्राशन केले
  • २० लाखांसाठी सासऱ्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी
  • ईश्वरपूर पोलिसांत सून, तिचे वडील व मावशीवर गुन्हा नोंद
Father-in-Law Suicide Case: बदलत्या जमान्यात नात्यांमधील विश्वास कसा रसातळाला गेला आहे, याचे एक अत्यंत धक्कादायक उदाहरण सांगली जिल्ह्यातून समोर आले आहे. लग्नासाठी मुली मिळत नाहीत म्हणून जास्त तपास न करता लग्न ठरवणे किती महागात पडू शकते, हे एका शिक्षक कुटुंबाच्या बाबतीत घडलेल्या थरारक घटनेवरून स्पष्ट झाले आहे. सुनेच्या आणि तिच्या माहेरच्यांच्या सततच्या छळाला, आर्थिक मागणीला आणि बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या धमकीला कंटाळून ६३ वर्षीय सासऱ्याने अखेर मृत्यूला कवटाळले आहे.

हेही वाचा: Auto Rickshaw Theft: चोरीची रिक्षा अन्‌ चोरांचा धागादोरा नव्हता, मात्र ‘तांत्रिक विश्लेषणाने’ कुळगाव पोलिसांनी केले जेरबंद!

नेमकी काय घडली घटना?

वाळवा तालुक्यातील मसुचीवाडी येथील विश्वास फाटक (वय ६३ वर्षे) यांनी २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी त्यांच्या स्वतःच्या शेतात जाऊन तणनाशक प्यायले. विषारी औषध प्राशन केल्याचे लक्षात येताच त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात सून संजना अविनाश पवार, तिचे वडील अविनाश ज्ञानदेव पवार आणि मावशी स्नेहल प्रवीण गलांडे या तिघांविरुद्ध विश्वास फाटक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या लग्नाचा ‘भारी’ पडलेला निर्णय

मृत विश्वास फाटक यांचा मुलगा ऋषिकेश हे शिक्षक आहेत. त्यांच्या पहिल्या पत्नीचे २०२४ मध्ये कर्करोगाने निधन झाले होते. त्यांना ७ वर्षांचा एक मुलगा आहे. मुलाच्या आणि घराच्या भवितव्याचा विचार करून ऋषिकेश यांनी संजना पवारसोबत दुसरे लग्न केले. मात्र, काही दिवसांतच हे लग्न त्यांना भारी पडू लागले. 

लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच संजनाचे वडील अविनाश हे ऋषिकेश यांच्या घरी गेले. “मुलीला व्यवस्थित नांदवायचे असेल तर १५ लाख रुपये द्यावे लागतील,” अशी मागणी करत त्यांनी शिवीगाळ केली आणि मुलीला घेऊन गेले. संजना निघून गेल्यानंतर फाटक कुटुंबाला आणखी एक मोठा धक्का बसला. संजनाचा हा दुसरा विवाह असून तिचा पहिला विवाह झाल्याची बाब त्यांनी लपवून ठेवली होती, हे ऋषिकेश यांच्या निदर्शनास आले.

हेही वाचा: Minor Girl Suicide Case: पहाटे १:५३ वाजता उघडकीस आला थरार; कांदिवलीत उच्चभ्रू इमारतीत अल्पवयीन मुलीची आत्महत्या!

बलात्काराची धमकी अन् सासऱ्यांचा अंत

संजना माहेरी गेल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी पैशांसाठी फाटक कुटुंबावर तगादा लावला. लग्नाचा खर्च, पोटगी आणि पुढील पालनपोषणासाठी आता १५ लाखांऐवजी २० लाख रुपये द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. पैसे दिले नाहीत तर संजनाकडून सासऱ्यांविरुद्ध (विश्वास फाटक) बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करू, अशी भयानक धमकी संजनाच्या कुटुंबीयांकडून सतत दिली जात होती. या भयानक धमकीमुळे विश्वास फाटक हे प्रचंड मानसिक दडपणाखाली होते. समाजमनात होणारी बदनामी आणि खोट्या गुन्ह्यात अडकवले जाण्याच्या भीतीने ६३ वर्षीय सासऱ्याने विष पिऊन आपले आयुष्य संपवले. या दुर्दैवी घटनेनंतर ईश्वरपूर पोलीस पुढील तपास करत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: विश्वास फाटक यांनी आत्महत्या का केली?

    Ans: सुनेने घटस्फोटापोटी २० लाख रुपयांची मागणी केली होती आणि पैसे न दिल्यास त्यांच्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती, या मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली.

  • Que: या प्रकरणी किती जणांवर गुन्हा दाखल झाला आहे?

    Ans: ईश्वरपूर पोलीस ठाण्यात सून संजना पवार, तिचे वडील अविनाश पवार आणि मावशी स्नेहल गलांडे या तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

  • Que: ही घटना कुठे आणि कधी घडली?

    Ans: ही घटना सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील मसुचीवाडी येथे २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली.

Web Title: Sangli walva islampur police father in law suicide sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 05:27 PM

Topics:  

  • Crime . Crime News
  • Crime in Sangli
  • father in law
  • Mharashtra

संबंधित बातम्या

Auto Rickshaw Theft: चोरीची रिक्षा अन्‌ चोरांचा धागादोरा नव्हता, मात्र ‘तांत्रिक विश्लेषणाने’ कुळगाव पोलिसांनी केले जेरबंद!
1

Auto Rickshaw Theft: चोरीची रिक्षा अन्‌ चोरांचा धागादोरा नव्हता, मात्र ‘तांत्रिक विश्लेषणाने’ कुळगाव पोलिसांनी केले जेरबंद!

Sangli Murder News: कोयता आणि चाकुने वार करत तरुणाचा संपवला जीवनप्रवास; ईश्वरपूरमधील हत्येने परिसरात खळबळ!
2

Sangli Murder News: कोयता आणि चाकुने वार करत तरुणाचा संपवला जीवनप्रवास; ईश्वरपूरमधील हत्येने परिसरात खळबळ!

Mother Son Suicide News: सीसीटीव्ही फुटेजने उघडले गुपित! मातेने चिमुरड्याला १८ व्या मजल्यावर नेऊन संपवले आयुष्य; वाकडमधील थरार!
3

Mother Son Suicide News: सीसीटीव्ही फुटेजने उघडले गुपित! मातेने चिमुरड्याला १८ व्या मजल्यावर नेऊन संपवले आयुष्य; वाकडमधील थरार!

Bhayander Viral Video News: भाईंदरमध्ये शिवसेनेच्या कंटेनरचा गैरवापर? भाजप नगरसेवाकाचा गंभीर आरोप अन् व्हिडिओ व्हायरल!
4

Bhayander Viral Video News: भाईंदरमध्ये शिवसेनेच्या कंटेनरचा गैरवापर? भाजप नगरसेवाकाचा गंभीर आरोप अन् व्हिडिओ व्हायरल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.