
Murder Case News: कोयता आणि चाकुने वार करत तरुणाचा संपवला जीवनप्रवास; ईश्वरपूरमधील हत्येने परिसरात खळबळ!
पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सूरज महादेव कांबळे (वय ३१, रा. आंबेडकरनगर, ईश्वरपूर) असे खून झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी साहिल अनिल कांबळे (वय २७) आणि अंकित मुकुंद कांबळे (वय ३०, दोघेही रा. आंबेडकरनगर, ईश्वरपूर) यांच्याविरोधात ईश्वरपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आप्पासो सिद्धनाथ कांबळे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास एका कपड्याच्या दुकानात आरोपी आणि सूरज यांच्यात काही कारणावरून वाद झाला होता. या दुकानातील वादासह पूर्वी लग्न मोडल्याच्या जुन्या कारणावरून संशयित आरोपींच्या मनात राग होता.
रविवार आणि रात्रीची वेळ असल्याने परिसरात वर्दळ कमी होती. रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास कामेरी नाका येथील बालाजी प्लायवुड अँड हार्डवेअरसमोर आरोपींनी सूरज कांबळे याला गाठले. पूर्ववैर आणि रागाच्या भरात आरोपींनी सूरजवर चाकूसारख्या धारदार शस्त्राने आणि कोयत्याने बेछूट वार केले. सूरजच्या डोक्यात व छातीवर गंभीर वार झाल्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला. या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यामुळे उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ईश्वरपूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून तपास सुरू केला. या गंभीर गुन्ह्याचा पुढील तपास ईश्वरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील करीत आहेत.
Ans: ही घटना ईश्वरपूरमधील कामेरी नाका परिसरात रविवारी (ता. १) रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.
Ans: मृताचे नाव सूरज महादेव कांबळे असून, साहिल अनिल कांबळे आणि अंकित मुकुंद कांबळे अशी आरोपींची नावे आहेत.
Ans: कपड्याच्या दुकानात झालेला वाद आणि पूर्वी लग्न मोडल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून हा खून करण्यात आला.