
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
साताऱ्यातून एक धाकदायक घटना समोर आली आहे. या घटनेने सातारा हादरला आहे. एका अल्पवयीन मुलाने आपल्याच रूममेटची हत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली आहे. पण त्याने एवढे टोकाचे पाऊल का उचलले? हे ऐकून तुम्हाला ही धक्काच बसेल
Beed Crime: बीडमध्ये गुन्हेगारांची हाईट ! रात्रीत बँकच फोडली, लाखो रुपये केले लंपास
नेमकं काय घडलं?
आरोपी मुलाने मुलाचे डोके भिंतीवर आपटले. त्यानंतर त्याच्याच कमरेच्या पट्टयाने गळा आवळून त्याचा जीव घेतला. ही घटना सातारा जिल्ह्यातील लोणंद शहरामध्ये घडली आहे. हत्या झालेल्या तरुणाचे नाव गणेश संतोष गायकवाड असे आहे.
का केली हत्या?
गणेश याने आरोपी मुलाला अभ्यास तसेच मोबाईलच्या अतिवापरावरून रूममेटला समज दिली. याच कारणावरून त्यांच्यात भांडण झालं. अल्पवयीन मुलाला समज दिल्यानंतर गणेश हा थोड्यावेळाने झोपी गेला. हीच संधी त्याने साधत रागाच्या भरात हत्या केली.
खानावळीत जेवत असतांना झाली ओळख
22 वर्षीय गणेश हा लोणंद एमआयडीसी परिसरात काम करत होता. एकाच खानावळीत जेवत असताना त्याची अल्पवयीन मुलाशी ओळख झाली. आरोपी मुलगा शिक्षणासाठी लोणंद येथे भाड्याने राहत होता. दोघांची अर्धे-अर्धे भाडे देऊन एकत्र राहण्यास सुरुवात केली. सोमवारी (27 ऑक्टोबर) गणेश गायकवाड याने मोबाइलच्या अतिवापरावरून मुलाला समज दिली. यामुळेच त्यांच्यात वाद झाला आणि या वादाने टोक गाठलं. गणेश झोपेत असताना अल्पवयीन मुलाने त्याची हत्या केली.
फलटण डॉक्टर आत्महत्येची महिला आयोगाने गांभीर्याने घेतली दखल; चाकणकरांनी व्यक्त केला संताप
सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात तैनात असलेल्या महिला डॉक्टर संपदा मुंडे गेल्या काही महिन्यांपासून पोलीस आणि आरोग्य विभाग यांच्यात वादात अडकल्या होत्या. यानंतर तिने आत्महत्या केल्याने प्रकरणाची सर्वत्र चर्चा आहे. मृत डॉक्टरच्या हातावरील सुसाइड नोटमुळे या प्रकरणाला धक्कादायक वळण लागले. आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरच्या तक्रारीवर काय कारवाई केली? असा सवाल करत राज्य महिला आयोगाने सातारा एसपीकडून अहवाल मागविला आहे.
वैद्यकीय तपासणीच्या वादात अडकलेल्या या डॉक्टरवर गेल्या काही महिन्यांपासून दबाव होता, अशी माहिती समोर आली आहे. सुसाइड नोटमध्ये तिने फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने यांनी चार वेळा बलात्कार केल्याचा आणि प्रशांत बनकर याने मानसिक त्रास दिल्याचा उल्लेख केला आहे. या प्रकरणानंतर त्यांच्यावर अंतर्गत चौकशीदेखील सुरू होती. या तणावामुळेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यावेळी संपदा मुंडेने पोलीस अधिकाऱ्यावर थेट अत्याचार आणि छळाचे आरोप केले आहेत. त्यामुळे साताऱ्याच्या पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आता दोन्ही आरोपी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे.
Nilesh Ghaywal : गँगस्टर निलेश गायवळचा ‘जमीनखरेदी साम्राज्य’ उघड; अवघ्या तीन वर्षांत…