Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Crime: अनैतिक संबंधांत अडथळा ठरलेल्या तरुणाची निर्घृण हत्या; आधी दगडाने ठेचले, नंतर मृतदेहाचे तुकडे करून…

साताऱ्यातील फलटण तालुक्यात अनैतिक संबंधांत अडथळा ठरलेल्या 27 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. आधी दगडाने ठेचून खून, नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे तुकडे करून नदी व शेततळ्यात फेकले. तिघे आरोपी अटकेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 24, 2026 | 11:17 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • अनैतिक संबंधांच्या वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या
  • मृतदेहाचे तुकडे करून नदी व शेततळ्यात फेकून पुरावा नष्ट
  • महिला, तिचा पती व प्रियकर अशा तिघांना अटक; गुन्हा उघडकीस
सातारा: सातारा येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका २७ वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. एवढेच नाही तर हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेहाचे तुकडे करून नदीत आणि शेततळ्यात फेकून दिले. हत्या झालेल्या तरुणाचे नाव सतीश उर्फ आप्पा दादासो दडस (२७) असे आहे. ही घटना सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सोमंथळी गावात घडली आहे. या घटनेने नागरिकांनाच नाही तर पोलिसांनाही धक्का बसला आहे.

गुपचूप सुरु होता बालविवाह; पोलिसांना माहिती मिळताच टाकली धाड, अन् नंतर…

हरवल्याची तक्रार

सुरुवातीला मृतक सतीश हा हरवल्याची तक्रार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. तेव्हा त्यांना या हत्येचा छडा लागला. अवघ्या चार तासात त्यांनी या हत्येचा गुन्हा उघडकीस आणला.

कशी केली हत्या?

मृत सतीशच एका विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध होते. याच महिलेचे संबंध आणखी एका तरुणाशी होते. सतीश संबंधीत महिलेला ब्लॅकमेल करत होता. त्यामुळे ती वैतागली होती. 14 जानेवारी अनैतिक संबंधातून मृत तरुणाचा आरोपी महिला, तिचा पती आणि प्रियकरासोबत वाद झाला. यावेळी सतीश दडस याला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याला दवाखान्यात नेण्याचा बनाव करण्यात आला आणि त्याला विडणीच्या मांगोबा माळ परिसरात नेले. तिथे त्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. एवढेच नाही तर पुरावे नष्ट करण्यासाठी लाकूड कापण्याच्या कटरने त्याच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले.
त्यानंतर हे तुकडे पोत्यात भरुन शेततळ्यात टाकण्यात आले तसेच काही तुकडे नीरा नदीत फेकून देण्यात आले.

सतीश दडस घरी न आल्यामुळे त्याच्या भावाने तो बेपत्ता असल्याची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तिन्ही आरोपींना अटक केली आहे. या घटनेची महिलेने कबुली दिली आहे. अवघ्या चार तासात पोलिसांनी या घटनेचा छडा लावला. या क्रूर हत्याकांडाने संपूर्ण सातारा जिल्हा हादरून गेला आहे.

पाय बांधून दगडाने ठेचलं! ऊसतोड मजुराची हत्या, आरोपीने विष पिऊन संपवण्याचा प्रयत्न

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ऊसतोड मजुराची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. हत्या केल्यानंतर आरोपी तरुणाने स्वतः विष पियुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मृतकाचे नाव मच्छिंद्र अंबादास भोसे (वय 42) असे आहे.

Nagpur Crime : OYO हॉटेलमध्ये वाद आणि निर्घृण हत्या; प्रेयसीची हत्या करून प्रियकर फरार

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सोमंथळी परिसरात.

  • Que: हत्या का करण्यात आली?

    Ans: अनैतिक संबंधांत अडथळा आणि ब्लॅकमेलच्या वादातून.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: बेपत्ता तक्रारीनंतर तपास करून अवघ्या चार तासांत गुन्हा उघडकीस आणत तिघा आरोपींना अटक केली.

Web Title: Satara crime a young man who became an obstacle in an illicit relationship was brutally murdered

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2026 | 11:17 AM

Topics:  

  • crime
  • Satara
  • Satara Crime

संबंधित बातम्या

Nagpur Crime : OYO हॉटेलमध्ये वाद आणि निर्घृण हत्या; प्रेयसीची हत्या करून प्रियकर फरार
1

Nagpur Crime : OYO हॉटेलमध्ये वाद आणि निर्घृण हत्या; प्रेयसीची हत्या करून प्रियकर फरार

Buldhana Crime: धक्कादायक! गणित चुकल्याने चौथीतल्या विद्यार्थ्याला शिक्षकाकडून अमानुष मारहाण, रुग्णालयात उपचार सुरू
2

Buldhana Crime: धक्कादायक! गणित चुकल्याने चौथीतल्या विद्यार्थ्याला शिक्षकाकडून अमानुष मारहाण, रुग्णालयात उपचार सुरू

Nagpur Crime: नागपुरात पोलीस कोठडीत आरोपीची आत्महत्या; पोलीस उपनिरीक्षकासह 3 कर्मचाऱ्यांचे निलंबन
3

Nagpur Crime: नागपुरात पोलीस कोठडीत आरोपीची आत्महत्या; पोलीस उपनिरीक्षकासह 3 कर्मचाऱ्यांचे निलंबन

Jalna Crime: जालना हादरलं! गोळीबारात २७ वर्षीय तरुणाची हत्या, अज्ञातांविरुधात गुन्हा दाखल
4

Jalna Crime: जालना हादरलं! गोळीबारात २७ वर्षीय तरुणाची हत्या, अज्ञातांविरुधात गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.