Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Crime: दहिवडी पोलिसांची मोठी कारवाई; कंपनीचे अॅल्युमिनियम तारा चोरणारे चार आरोपी गोंदियातून जेरबंद

साताऱ्यातील माण तालुक्यात एस.एस. इलेक्ट्रिकल कंपनीच्या सुपर प्लॅन्टमधून अॅल्युमिनियम तारा आणि लोखंडी पोल चोरी करणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील चार आरोपींना दहिवडी पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी ₹५८,५०० किमतीचा मुद्देमाल जप्त करत चोरीचा गुन्हा उघडकीस आणला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 15, 2026 | 04:10 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • सुपर प्लॅन्टमधून १२०० मीटर अॅल्युमिनियम तारा चोरी.
  • दहिवडी पोलिसांनी गोंदियातील चार आरोपींना अटक केली.
  • आरोपींकडून ₹५८,५०० किमतीचा मुद्देमाल जप्त.
सातारा: सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात घडलेल्या चोरीच्या घटनेचा दहिवडी पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत पर्दाफाश करत गोंदिया जिल्ह्यातील चार आरोपींना अटक केली आहे. एस.एस. इलेक्ट्रिकल कंपनीच्या सुपर प्लॅन्टमधून लाखो रुपयांच्या अॅल्युमिनियम तारा आणि लोखंडी पोल चोरी करणाऱ्या आरोपींकडून पोलिसांनी तब्बल ₹५८,५०० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून दहिवडी पोलिसांच्या तपासाचे कौतुक होत आहे.

काय घडलं नेमकं?

दि. २४ एप्रिल ते १ जून २०२६ दरम्यान माण तालुक्यातील आंधळी येथील शेतात उभारण्यात आलेल्या एस.एस. इलेक्ट्रिकल कंपनीच्या सुपर प्लॅन्टमधून १,२०० मीटर अॅल्युमिनियम तारा व दोन लोखंडी पोल असा एकूण ₹५८,५०० किमतीचा माल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला होता. याप्रकरणी दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Bengaluru Crime: मी तुझ्या मुलीला मारलं…; प्रियकराने प्रेयसीची केली हत्या; मृतदेहाशेजारीच बेशुद्ध अवस्थेत सापडला

तपासातून गोंदिया जिल्ह्यातील दीपक गोविंद मेष्राम, राहुल चरण अलामदेवे, दुर्गेश राधेलाल व संदीप वकाराम तुमसरे यांच्यावर संशय बळावला. दहिवडी पोलिसांनी उत्कृष्ट तपास करत चोरी करणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील चार आरोपींना अटक केली. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यानंतर आरोपींकडून चोरीस गेलेले १,२०० मीटर अॅल्युमिनियम तारा व दोन लोखंडी पोल असा ₹५८,५०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रकाश हांगे, पोलिस हवालदार संभाजी खाडे तसेच पोलिस कर्मचारी निलेश कुडकडे, अजिनाथ नरवट व इतर सहकाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

‘Good Bye All Of You…’ स्टेटस ठेवत महिला पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न; सहकाऱ्यांच्या सतर्कतेने वाचले प्राण

साताऱ्यातील वडूज पोलीस ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. समाजाला सुरक्षा देणाऱ्या खाकी वर्दीतील एका महिला पोलिसाने ‘Good Bye All Of You…’ असा व्हॉट्सॲप स्टेटस ठेवत आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. मात्र, सहकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वेळीच तिचे प्राण वाचवण्यात यश आले आहे.

Saswad gutkha Raid : सासवडमध्ये ‘एफडीए’ची मोठी कारवाई; गुटखा विक्रीचे दुकान सील

💡

Frequently Asked Questions

  • Que: चोरीची घटना कुठे घडली होती?

    Ans: माण तालुक्यातील आंधळी येथील एस.एस. इलेक्ट्रिकल कंपनीच्या सुपर प्लॅन्टमध्ये ही चोरी झाली होती.

  • Que: पोलिसांनी काय जप्त केले?

    Ans: १२०० मीटर अॅल्युमिनियम तारा आणि दोन लोखंडी पोल जप्त करण्यात आले.

  • Que: या प्रकरणात किती आरोपींना अटक करण्यात आली?

    Ans: गोंदिया जिल्ह्यातील चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Web Title: Satara crime major action by dahiwadi police four accused who stole aluminium wires from a company apprehended in gondia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 04:09 PM

Topics:  

  • crime
  • Satara
  • Satara Crime

संबंधित बातम्या

Bengaluru Crime: मी तुझ्या मुलीला मारलं…; प्रियकराने प्रेयसीची केली हत्या; मृतदेहाशेजारीच बेशुद्ध अवस्थेत सापडला
1

Bengaluru Crime: मी तुझ्या मुलीला मारलं…; प्रियकराने प्रेयसीची केली हत्या; मृतदेहाशेजारीच बेशुद्ध अवस्थेत सापडला

Thane Crime: संतापजनक! बाथरूमच्या खिडकीतून महिलांचे गुप्त व्हिडीओ केले शूट; आरोपी फरार
2

Thane Crime: संतापजनक! बाथरूमच्या खिडकीतून महिलांचे गुप्त व्हिडीओ केले शूट; आरोपी फरार

Nagpur Crime: धक्कादायक! काळी जादू, धर्मांतर अन् सक्तीचा निकाह; नागपुरात विवाहितेसोबत अत्याचार
3

Nagpur Crime: धक्कादायक! काळी जादू, धर्मांतर अन् सक्तीचा निकाह; नागपुरात विवाहितेसोबत अत्याचार

Telangana Crime: प्रियकरासोबत मिळून पत्नीने पतीचा काटा काढला; 15 वर्षांच्या संसाराचा थरारक शेवट
4

Telangana Crime: प्रियकरासोबत मिळून पत्नीने पतीचा काटा काढला; 15 वर्षांच्या संसाराचा थरारक शेवट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.