
Satara Doctor Suicide Case: सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. संपदा मुंडे यांनी गळफाळ घेत आयुष्य संपवलं. पण आत्महत्येपूर्वी त्यांनी आपल्या तळहातावर काही जणांवर गंभीर आरोप केले होते. ज्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.
डॉ. मुंडे यांनी आत्महत्येपूर्वी पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांची थेट नावे लिहित गंभीर खुलासे केले. डॉ. मुंडे यांनी पीएसआय बदने याने चार वेळा लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. या धक्कादायक घटनेनंतर पोलिस दलात आणि आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
Chhath Puja 2025: छठ पूजेची सुरुवात कशी झाली? जाणून घ्या या सणांमागील इतिहास
या प्रकरणात प्रशांत बनकर याला पोलिसांनी अटक केली असून, त्याला २८ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दुसरीकडे, आत्महत्येनंतर फरार झालेल्या पीएसआय गोपाळ बदनेलाही पोलिसांनी अखेर अटक केली आहे. त्यानंतर आज सकाळी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने यालादेखील अटक करण्यात आली. गोपाळ बदने याने स्वत:हून पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले.
पोलिसांना सरेंडर झाल्यानंतर गोपळ बदने म्हणाला, मी प्रमाणिक आहे आणि माझा पोलिस प्रशासनावर आणि न्यायालयावर विश्वास आहे. न्यायालय जो निर्णय देईल त्यावर माझा विश्वास आहे. दरम्यान, महिला डॉक्टरने आत्महत्या केल्यानंतर प्रशांत बनकर आणि गोपाळ बदने दोघेही फरार होते. पण पोलिसांनी शनिवारी (25 ऑक्टोबर) पुण्यातून प्रशांत बनकर याला अटक केली. पण गोपाळ बदने पोलिसांच्या फसवून सतत ठिकाणे बदल होता. फलटण पोलिसांनी दोन पथके त्याच्या शोधासाठी रवाना केली होती. पोलिसांनी त्याचे शेवटचे लोकेशन देखील ट्रेस केले होते. पण शनिवारी रात्री तो स्व:त फलटण पोलिस ठाण्यात सरेंडर झाला.
महिला डॉक्टर सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत होती. तिच्या तळहातावर लिहिलेल्या चिठ्ठीत तिने म्हटले आहे की, उपनिरीक्षक गोपाळ बदाणे यांनी तिच्यावर चार वेळा बलात्कार केला आणि पाच महिन्यांहून अधिक काळ तिला मानसिक आणि शारीरिक छळ केला. मूळ बीड जिल्ह्यातील रहिवासी असलेली ही डॉक्टर २३ महिन्यांपासून रुग्णालयात सेवा देत होती. ग्रामीण सेवेसाठीचा जामीन पूर्ण होण्यास फक्त एक महिना बाकी असताना तिने हे टोकाचे पाऊल उचलले.
तिच्या सुसाईड नोटमध्ये तिने लिहिले आहे की, आरोपींसाठी बनावट फिटनेस प्रमाणपत्रे देण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी तिच्यावर दबाव आणला. कधीकधी आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठीही आणले जात नव्हते. तिने नकार दिल्यावर, उपनिरीक्षक गोपाळ बदाणे आणि इतरांनी तिला त्रास दिला. तिने चिठ्ठीत म्हटले आहे की, तिच्या मृत्यूचे कारण तिच्यावर बलात्कार करणारे उपनिरीक्षक गोपाळ बदाणे आणि चार महिने मानसिक आणि शारीरिक छळ करणारे प्रशांत बनकर आहेत. गोपाळ बदाणे हा एक पोलीस अधिकारी आहे, तर प्रशांत बनकर हा महिला डॉक्टर राहत असलेल्या घराच्या मालकाचा मुलगा आहे.