Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Crime : सातारा पोलिसांची मोठी कारवाई, सराईत चोरट्याला ठोकल्या बेड्या

राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता सातारा शहरामधील रविवार पेठेतील हॉटेलचे शटर उचकटून चोरी केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी सराईत आरोपीला अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 26, 2025 | 03:01 PM
Satara Crime : सातारा पोलिसांची मोठी कारवाई, सराईत चोरट्याला ठोकल्या बेड्या

Satara Crime : सातारा पोलिसांची मोठी कारवाई, सराईत चोरट्याला ठोकल्या बेड्या

Follow Us
Close
Follow Us:

सातारा : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता सातारा शहरामधील रविवार पेठेतील हॉटेलचे शटर उचकटून चोरी केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी सराईत आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने आणखी ७ घरफोड्या केल्याची कबुली देवून ७५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांना दिला. संतोष रामचंद्र गावडे (वय ३८, रा. बेंडवाडी पो. आसनगाव ता. सातारा) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलमधून मोबाईल, रोख रक्कमची चोरी झाल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण विभाग (डीबी) तपास करत होते. पोलीस माहिती घेत असताना रात्रीचे दुकाने फोडून चोरी करणाऱ्या संशयित आरोपींची रेकॉर्डवरील गुन्हेगारांची पडताळणी केली. यामध्ये संशयिताला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्याच्याकडे प्राथमिक चौकशी केली असता त्याने घरफोडी केल्याची कबुली दिली. अन्य ६ ठिकाणी देखील दुकानामध्ये चोरी केली असल्याचे सांगितले.

पोलिसांनी चोरट्याकडे अधिक माहिती घेतली असता त्याने यापूर्वी सातारा शहर, शाहुपूरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाच प्रकारे चोरी केल्याचे सांगितले. त्याच्यावर आतापर्यंत घरफोडीचे १७ गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी संशयिताकडून चोरीचे २ मोबाईल फोन, रोख रक्कम ४०००, गुन्हयामध्ये वापरण्यात आलेली दुचाकी असा एकूण ७५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शामराव काळे, फौजदार सुधीर मोरे, पोलीस निलेश यादव, सुनिल मोहिते, सुजीत भोसले, निलेश जाधव, विक्रम माने, पंकज मोहिते, सचिन रिटे, इरफान मुलाणी, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम, तुषार भोसले, सुहास कदम यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

कारची काच फोडून चोरी

राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून चोरीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता विमाननगर परिसरात रस्त्याच्या कडेला लावलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी तब्बल दहा लाख ५१ हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. व्यावसायिकाने याबाबत तक्रार दिली असून, या चोरट्यांनी पाळत ठेवून चोरी केल्याचा संशय आहे. याप्रकरणी नितेशकुमार राजकुमार शहा (वय ३४, रा. चारकोप, कांदिवली, मुंबई) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शहा व्यावसायिक आहेत. ते कामानिमित्त मुंबईहून विमाननगर येथे आले होते. तेव्हा विमाननगर भागातील वाटिका सोसायटीसमोर त्यांनी रविवारी रात्री कार लावली. नंतर ते कामाच्या ठिकाणी गेले. त्यावेळी चोरट्यांनी कारची काच फोडली. कारमधील पिशवीत ठेवलेली साडेदहा लाखांची रोकड चोरुन पोबारा केला. घटना लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली.

Web Title: Satara police has arrested the thief and taken action nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2025 | 03:01 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • crime news
  • maharashtra
  • Satara Crime

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Vasai News : खानावळीच्या पैशासाठी सहकाऱ्याचा खून;आरोपीला गुजरातमधून केली अटक
2

Vasai News : खानावळीच्या पैशासाठी सहकाऱ्याचा खून;आरोपीला गुजरातमधून केली अटक

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
3

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्…
4

पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.