
crime (फोटो सौजन्य: social media)
प्राथमिक माहितीनुसार, मृतदेह सापडलेल्या बिबट्याचा मृत्यू अंदाजे तीन ते चार दिवसांपूर्वी झाला असावा अशी शक्यता आहे. या बिबट्याचे चारही पंजे कापण्यात आले आहे. एकूण १८ नखे गायब असल्याचे स्पष्ट झाले आहे. बिबट्याचे दात आणि मिशा हे व्यवस्थित असल्याने या घटनेभोवतीचे गूढ अधिकच वाढले आहे.
Crime News: आंबा घाट परिसरात मानवी हाडे अन्…; राकेश खून प्रकरणात मोठा उलगडा
या घटनेने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा केला आहे. बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे गावांमध्ये भितीचे वातारण आहे. चारही पाय बिबट्याचे कापण्यात आल्याने हा प्रकार शिकारीच्या उद्देशाने करण्यात आल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. बिबट्याची नखे तस्करीसाठी किंवा अंधश्रदेच्या हेतुने कापण्यात आली का? असा देखील संशय व्यक्त केला जात आहे. आता या प्रकरणात नेमकं काय समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
भर चौकात भाच्याने केला मामावर चाकू हल्ला, उपचारादरम्यान मामाचा मृत्यू; कारण काय?
कराड तालुक्यातील ओगलेवाडी या गावातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. भाच्याने मामावर चाकूने वार करत संपवल्याची घटना समोर आली आहे. यात जखमी झालेल्या मामाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृतकाचे नाव शेखर उर्फ बाळू प्रकाश सुर्यवंशी (वय 31) असे आहे. हल्ल्या पूर्वी मामा- भाच्यात मोठा वाद झाला होता. याच वादातून भाच्याने आपल्या मामाचा खून केल्याचे समोर आले आहे.
काय घडलं नेमकं?
शेखर आणि त्याचा भाचा दोघांचा गुरुवारी दुपारी ओगलेवाडी येथील भर चौकात मोठा वाद झाला. याच वादात भाच्याने मामावर चाकूने सपासप वार केले. या हल्यात शेखर सूर्यवंशी हा गंभीररीत्या जखमी झाल्याचे दिसून आला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटना स्थळी दाखल झाले. त्यानंतर जखमी मामा शेखरला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शेखर हा यात गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक होती. त्याला सांयकाळी सहा वाजता एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होत. शेखर सूर्यवंशींवर रुग्णालयात उपचार सुरु असतांना त्याचा मृत्यू झाला. कराड शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Vasai Crime: चॉकलेटचं आमिष, अपहरण, बलात्कार अन् हत्या, १८ वर्षांनी उत्तरप्रदेशमधून आरोपी ताब्यात
Ans: मृत्यू नैसर्गिक की मानवनिर्मित हे अद्याप स्पष्ट नाही; तपास सुरू आहे.
Ans: नखांची तस्करी किंवा अंधश्रद्धेच्या हेतूने हत्या झाल्याचा संशय आहे.
Ans: वनविभाग तपास करत असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.