काय घडलं होत?
वसई पूर्वच्या सातिवाली याभागात राहणाऱ्या बाबुला जगईप्रसाद गौतम हे राहत होते. याच परिसरात नराधम नंदलाल उर्फ नंदू विश्वकर्मा हा देखील राहत होता. एके दिवशी बाबुला जगईप्रसाद गौतम यांच्या चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून अपहरण केले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला आणि तिची निर्दयी मारहाण करून तिचा गळा आवळून हत्या केली.
या घटनेची फिर्याद ०१/०४/२००७ रोजी माणिकपूर पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी भादवि कलम ३०२, ३६३, ३७६ गुन्हा दाखल केला. मात्र तेव्हापासून हा नराधम पोलिसांना गुंगारा देत फरार होता. मिरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांच्या अधिकार क्षेत्रात घडलेल्या आणि अशा उघडकीस न आलेल्या खुनाच्या गुन्हयाचा समांतर तपास करुन गुन्हयाची उकल करण्याबाबत पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी आदेश दिले होते.
कशी केली अटक?
त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वसई येथील घडलेल्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात आला. १८ वर्षानंतर वसई गुन्हे प्रकटीकरण कक्ष–२ च्या पथकाला मोठे यश मिळाले आहे. आरोपी नंदलाल उर्फ नंदू विश्वकर्मा हा उत्तरप्रदेशातील मूळ गावी लपून राहत असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली. त्यांनतर गुन्हे प्रकटीकरण कक्ष दोनच्या पथकाने अतिशय कौशल्यपूर्ण तपास करून उत्तरप्रदेशातील सिध्दार्थनगर जिल्ह्यातील खरदौरी गावातून दिनांक १० डिसेंबर २०२५ रोजी आरोपी नंदलाल उर्फ नंदू विश्वकर्मा याला अटक केली.
महिलांसह मुलींचे गायब होण्याचे वाढतंय प्रमाण; धक्कादायक आकडेवारी आली समोर…
Ans: 1 एप्रिल 2007 रोजी वसई पूर्व सातिवाली परिसरात.
Ans: तब्बल 18 वर्षांपासून फरार होता.
Ans: उत्तरप्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील खरदौरी गावातून.






