Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SBI ग्राहक व्हा सावधान! पेन्शनच्या नावे एक कॉल आणि बँक खात्यातून सर्व पूंजी गायब, लक्षात घ्या ‘या’ गोष्टी

SBI ने ग्राहकांना एका नवीन फसवणुकीपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. सायबर गुन्हेगार ग्राहकांच्या बँक खात्याशी जोडलेला मोबाइल बदलून नंबर स्वॅप फ्रॉड करत आहेत

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 01, 2025 | 08:28 PM
SBI ने ग्राहकांना दिला इशारा (फोटो सौजन्य - iStock)

SBI ने ग्राहकांना दिला इशारा (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:

आजकाल ऑनलाईन फसवणूक जास्त प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. दर १० व्यक्तींमधून एकाची फसणवूक ऐकू येते आणि त्यात नक्की काय करायचं हे सामान्य माणसांना माहीतही नसते. पण हल्ली हे प्रकार जास्त वाढताना दिसून येत आहेत आणि सायबर गुन्हे अन्वेषण विभागात अशा केस अधिक दिसून येत आहे. 

सध्या बाजारात एक नवीन प्रकारची फसवणूक दिसून येत आहे. म्हणूनच स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने ग्राहकांना या नवीन प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. बँकेने जनहितार्थ इशारा जारी केला आहे की सायबर गुंड आता ग्राहकांच्या बँक खात्याशी जोडलेले मोबाईल नंबर बदलून फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही घाबरून न जाता हा लेख पूर्ण वाचा आणि माहिती घ्या 

चोरट्यांची अजब शक्कल, महिलांचा वेश परिधान केला अन्…; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

गुन्हेगार लोकांना कसे अडकवत आहेत?

सायबर क्राईम करणाऱ्या व्यक्ती कॉल किंवा SMS द्वारे सदर व्यक्तींना सांगतात की, “तुमच्या पेन्शन ऑर्डर (PPO) ची प्रक्रिया जलद करण्यासाठी लिंकवर क्लिक करा” किंवा धमकी देतात की “पेन्शनची पडताळणी प्रलंबित आहे, तात्काळ कारवाई न केल्यास पेन्शन थांबवले जाईल”. 

अशा प्रकारे, ते खाजगी माहिती किंवा लिंकवर क्लिक करून ग्राहकांच्या खात्यात प्रवेश मिळवतात आणि तुम्ही लिंकवर क्लिक केल्यास तुमच्या खात्यातील पैसे अचानक गायब होऊन त्यांच्या खात्यात जमा होऊ शकतात. तुम्ही आयुष्यभर कमावलेली कमाई एका क्षणात होत्याचं नव्हतं करून टाकू शकते. त्यामुळे SBI ने स्पष्टपणे सांगितले आहे की बँक कधीही फोन, एसएमएस, लिंक किंवा एटीएम भेटीद्वारे PPO पडताळणी करत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा आणि कोणत्याही अज्ञात व्यक्तींचा फोन उचलू नका अथवा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. 

‘तो’ महिलेला भेटण्यासाठी पुण्यात आला, हॉटेलमध्ये घेऊन गेला अन्…; पुण्यातील संतापजनक प्रकार

सुरक्षित कसे राहायचे?

  • तुमचे युजर नाव, पासवर्ड, एटीएम पिन किंवा OTP कोणाशीही शेअर करू नका.
  • फक्त गुगल प्ले स्टोअर किंवा App स्टोअरवरून बँकिंग App डाउनलोड/अपडेट करा. उगाच कोणीतरी काहीतरी सल्ला देत असेल तर तसं करू नका 
  • काही शंका असल्यास, तुमच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा किंवा बँकेच्या ग्राहक सेवा क्रमांक १८००१२३४ / १८००२१०० वर कॉल करा
  • सायबर गुन्ह्याची तक्रार करण्यासाठी, १९३० वर कॉल करा किंवा cybercrime.gov.in वर तक्रार दाखल करा
  • कोणत्याही संशयास्पद SMS/What’s App लिंकवर क्लिक करू नका आणि ईमेल अलर्ट काळजीपूर्वक वाचा.
SBI ने ग्राहकांना आठवण करून दिली आहे की “तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर तुमच्या बँक खात्याची गुरुकिल्ली आहे. तो सुरक्षित ठेवा आणि फसवणूक टाळा.” बँकेने असेही स्पष्ट केले आहे की १६०० वरून येणारे कॉल खरे आणि सुरक्षित आहेत.

Web Title: Sbi fraud alert how to protect bank account personal finance from mobile number scam news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2025 | 08:28 PM

Topics:  

  • cyber scam
  • SBI
  • scam

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.