संग्रहित फोटो
पुणे : राज्यासह देशभरात महिलांवरील बलात्कार, अत्याचाराच्या घटना वाढल्या आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून बलात्काराच्या घटना उघडकीस येत असतात. यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. जीवनसाथी मेट्रोमिनी साईटवरून झालेल्या ओळखीतून महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. तर, फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेकडूनच दोन लाख रुपये उकळल्याचाही प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित गंगाधर शेंडगे (रा. पारगाव, जि. सोलापूर) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत ३३ वर्षीय महिलेने खराडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित महिला व शेंडगे या दोघांनीही जीवनसाथी मेट्रोमिनी या साईटवर नाव नोंदणी केलेली होती. त्यातून त्या दोघांची गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ओळख झाली होती. शेंडगेने महिलेला विवाहाचे आमिष दाखवून तिला जाळ्यात ओढले. नंतर तो महिलेला भेटण्यासाठी पुण्यात आला. एका हॉटेलमध्ये तो महिलेला घेऊन गेला. त्याने तिच्यावर बलात्कार केला, तसेच तिचे फोटो मोबाइलवर काढले. नंतर शेंडगेने महिलेला धमकावण्यास सुरुवात केली. हॉटेलमध्ये काढलेले फोटो महिलेचे नातेवाईक आणि गावाकडील व्यक्तींना पाठवून ते व्हायरल करण्याची धमकी दिली.
त्यासाठी पैशांची मागणी केली. त्याने वेळोवेळी महिलेकडून दोन लाख रुपये उकळले. महिलेने विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने विवाहाबाबत विचारणा केल्यास विषारी ओैषध पिऊन आत्महत्या करण्याची धमकी दिली. तसेच, सुसाईड नोटमध्ये तुझे आणि तुझ्या कुटूंबाचे नाव लिहून ठेवण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक मोनाली भदे करत आहेत.
आणखी एक संतापजनक प्रकार उघडकीस
विवाहित महिलेला घरी एकटेच पाहून तिच्या घराबाहेर जात तिच्याशी लगट करत विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एकाला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. मुबारक मोळम्मद शेख (२५, रा. घोरपडेवस्त, लोणी काळभोर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका २८ वर्षीय तरूणीने तक्रार दिली आहे. (दि. २२ ऑगस्ट) दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. घटनेच्या दिवशी तक्रारदार महिला घरात एकटीच होत्या. तेव्हा मुबारक तिच्या घरी गेला. त्याने लगट साधण्याच्या हेतुन त्याने तिला मी तुला पहील्यांदा पाहिले तेव्हापासून तु मला खूप आवडत आहे, असे बोलुन लगट करण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरोपीच्या सर्व प्रकाराला नकार दिल्यानंतर आरोपीने तिला तु फक्त सांग मी, तुझ्यासाठी काय करू, तुझ्या नवर्याला घरात घुसुन मारतो व तुला उचलुन घेऊन जातो, अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपी घरामध्ये शिरला आणि तिचा विनयभंग केला.