Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाळेतील शिक्षिकेचा विद्यार्थ्याशी अश्लील प्रकार; इंस्टाग्रामवर करायची अर्धनग्न व्हिडीओ कॉल….

नुकताच काही दिवसाआधी मुंबईतून एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. एका नामांकित शाळेतील इंग्रजी शिक्षकाला अल्पवयीन विद्यार्थ्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचं समोर आलं होत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 30, 2025 | 09:29 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:

नवी मुंबई: नुकताच काही दिवसाआधी मुंबईतून एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. एका नामांकित शाळेतील इंग्रजी शिक्षकाला अल्पवयीन विद्यार्थ्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचं समोर आलं होत. त्या शिक्षिकेला अटक करण्यात आली होती. ती कारमधून त्या विद्यार्थ्याला फाईव्हस्टार हॉटेलमध्ये नेऊन, दारू पाजून शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पडायची, अशी घटना समोर आली होती. आता नवी मुंबईतून अशी एक घटना समोर आली आहे. एका शिक्षिकेने शाळेतील अल्पवयीन विद्यार्थ्यांसोबत अश्लील चाळे केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी, संबंधित शिक्षिकेविरुद्ध नवी मुंबईतील कोपर खैराणे पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धक्कादायक ! घरात घुसून तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न; कुटुंबियांनी विरोध करताच मारहाण, पण शेजारी धावून आले अन्…

नेमकं काय प्रकार?

नवी मुंबई येथील एका शिक्षेकेने तिच्याच शाळेतील एका अल्पवयीन विद्यार्थ्यांसोबत अश्लील व्हिडीओ कॉल केलं असल्याचं समोर आलं आहे. सादर शिक्षिका इंस्टाग्रामवर अर्धनग्न अवस्थेत व्हिडीओ कॉल करत होती. याबाबतची माहिती विदयार्थ्याने त्याच्या पालकांना सांगितली. पालकांनी कोपरखैरणे पोलीस ठाणे गाठून शिक्षिकेवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी शिक्षिकेला अटक केली असता न्यायालयाने तिला एक दिवसीय पोलीस कोठडी सुनावली आहे. या शिक्षिकेने शाळेतील इतर विद्यार्थ्यांसोबत, आणखी कोणासोबत हे कृत्य केले का याचा तपास पोलीस करत आहे. या घटनेने शाळेत आणि पालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

‘तू दहशतवादी आहेस’ म्हणत अफगाण व्यापाऱ्याला मारहाण; नागपूरमधील घटना

दरम्यान, नागपूर मधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. अफगाणिस्तानच्या एका व्यापाऱ्यावर दहशतवादी असल्याच्या आरोप करत जीवघेण मारहाण केल्याचं समोर आलं आहे. ही घटना यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत यादव नगर भागात घडली आहे. मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव फहीम खान मामातुर मर्जक ( वय 46 वर्ष) असं आहे.

नेमकं काय प्रकरण?

२७ जुलै, रविवारी रात्री एका ओळखीच्या व्यक्तीसोबत एका कारमधून एका ग्राहकाकडे फ्रिज बघायला गेले होते. रात्री पावणेबाराच्या दरम्यान ते कारने परत जायला निघताना पार्किंगजवळ एका तरुणाने त्यांना गाठले. त्या तरुणाने फहीम यांना ‘तू दहशतवादी आहेस आणि इथे यायचे नाही,’ असे म्हटले. फहीम यांनी त्यावर ते कपडा व्यापारी असल्याचे सांगितले. मात्र, तरुणाने त्यांना धमकावले. त्यानंतर काही न बोलताच फहीम यांना मारायला सुरुवात केली. फहीम यांच्या साथीदारांनी त्या तरुणाला थांबवण्याचे प्रयत्न केले. मात्र अन्य दोन आरोपी दुचाकीने तेथे पोहोचले. त्यांनी देखील फहीम यांना मारहाण सुरू केली.

गुन्हा दाखल
पहिल्या आरोपीने सिमेंटच्या पेव्हर ब्लॉकने फहीम यांच्या डोक्यावर प्रहार केले. यात फहीम गंभीर जखमी झाले. त्यानंतर फहीम यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यांच्या तक्रारीवरून हल्ला करणाऱ्या अजय चव्हाण (30), ऋषी (20) व मयंक (19) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांचा सुळसुळाट, चार फ्लॅट फोडले; लाखोंचा ऐवज चोरला

Web Title: School teachers obscene behavior with student half naked video call on instagram

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2025 | 09:29 AM

Topics:  

  • crime
  • Navi Mumbai
  • Navi Mumbai Crime

संबंधित बातम्या

Akola Crime : ‘रक्षकच भक्षक?’ महामार्गावर तरुणीचा पाठलाग; अश्लील बोलणे व हातवारे, पोलीस अधिकारी अटक
1

Akola Crime : ‘रक्षकच भक्षक?’ महामार्गावर तरुणीचा पाठलाग; अश्लील बोलणे व हातवारे, पोलीस अधिकारी अटक

Raigad News: ८ महिन्यांच्या लढ्यानंतर अखेर न्याय मिळालाच! शाळकरी मुलाच्या मृत्यू प्रकरणी २ वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
2

Raigad News: ८ महिन्यांच्या लढ्यानंतर अखेर न्याय मिळालाच! शाळकरी मुलाच्या मृत्यू प्रकरणी २ वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

सायबर फसवणूक प्रकरणात खळबळ! मिरा-भाईंदरमधील भाजप पदाधिकाऱ्यांला अटक, प्रताप सरनाईक यांची चौकशी करायची मागणी
3

सायबर फसवणूक प्रकरणात खळबळ! मिरा-भाईंदरमधील भाजप पदाधिकाऱ्यांला अटक, प्रताप सरनाईक यांची चौकशी करायची मागणी

‘प्रायव्हेट पार्ट दाखवला, लैंगिक संबंध ठेवण्यास सांगितले’, मुख्याध्यापकांची महिलेकडे अश्लील मागणी, सरकारी शाळेत लज्जास्पद प्रकार
4

‘प्रायव्हेट पार्ट दाखवला, लैंगिक संबंध ठेवण्यास सांगितले’, मुख्याध्यापकांची महिलेकडे अश्लील मागणी, सरकारी शाळेत लज्जास्पद प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.