Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Crime News: खळबळजनक! ४०० कोटींच्या कॅश कंटेनरवरून तरुणाचे अपहरण; कोणाची होती एवढी मोठी रोकड

या कटात काही बडे व्यावसायिक आणि पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हात असून ही प्रचंड रोख रक्कम मुंबई-ठाणे परिसरातील एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाची (Builder) असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 24, 2026 | 10:43 AM
Nashik Crime News

Nashik Crime News

Follow Us
Close
Follow Us:
  •   ४०० कोटी रुपयांची रोख रक्कम असलेला एक कंटेनर चोरीला
  • तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण
  • ही प्रचंड रोख रक्कम मुंबई-ठाणे परिसरातील एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाची असल्याचा अंदाज
Nashik Crime News: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या धामधुमीत कर्नाटकातील चोरली घाट परिसरातून तब्बल ४०० कोटी रुपयांची रोख रक्कम असलेला एक कंटेनर चोरीला गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या संशयातून नाशिकमधील इगतपुरी येथील संदीप पाटील या तरुणाचे अपहरण करण्यात आले. याप्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी आतापर्यंत पाच संशयितांना अटक केली आहे. (Nashik Crime News)

तक्रारदाराचे गंभीर आरोप

नाशिकमधील इगतपुरी येथील रहिवासी असलेले पीडित संदीप पाटील यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत धक्कादायक खुलासे केले आहेत. संदीप पाटील यांनी ४०० कोटींचा कंटेनर गायब केल्याचा आरोप करत आपले अपहर करण्यात आले. तसेच अज्ञात ठिकाणी नेऊन आपल्याला बेदम मारहाण करण्यात आली, इतकेच नव्हे तर कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली,असा गंभीर आरोप पाटील यांनी केला आहे. या कटात काही बडे व्यावसायिक आणि पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हात असून ही प्रचंड रोख रक्कम मुंबई-ठाणे परिसरातील एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाची (Builder) असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २७ जानेवारीपासून ‘या’ भागांत १० टक्के पाणीकपात; पाहा संपूर्ण यादी

पोलीस तपासात धक्कादायक ‘बनाव’ उघड

दरम्यान, अपहरणाची तक्रार दिल्यांतर नाशिक ग्रामीण पोलिसांनी आतापर्यंत पाच संशयितांना बेड्या ठोकल्या आहेत. तपासाचे गांभीर्य लक्षात घेऊन अतिरिक्त पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी या प्रकरणासाठी विशेष तपास पथकाची (SIT) नियुक्ती केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत १. जयेश कदम (रा. रामगड) २. विशाल नायडू (रा. कल्याण), ३. सुनील धुमाळ (रा. टिटवाळा), ४. विराट गांधी (रा. गुजरात) याला जयपूरमधून अटक करण्यात आली असून तो एका बिल्डरचा मॅनेजर असल्याची माहिती आहे. तर ५. जनार्दन धायगुडे (रा. मुंबई) या पाच तरूणांना अटक करण्यात आली आहे.

तर या प्रकरणातील मुख्य संशयित मानले जाणारे ठाण्यातील बिल्डर किशोर सावला आणि इतर दोन आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

BMC Mayoral Election: मुंबईच्या महापौर पदाची निवडणूक लांबणीवर; महायुतीमधील ‘हॉटेल डिप्लोमसी’

नेमका काय होता ४०० कोटींचा ‘बनाव’?

हा संपूर्ण प्रकार एका सुनियोजित कारस्थानाचा भाग असल्याचे तपासातून आढळून आले. ही घटना सुमारे दीड ते दोन महिन्यांपूर्वी (ऑक्टोबर २०२५ मध्ये) कर्नाटकातील चोरली घाटात घडली होती. दोन हजार रुपयांच्या चलनातून बाद झालेल्या (Demonetised) नोटांनी भरलेले दोन कंटेनर गोव्याहून एका देवस्थानासाठी (काही सूत्रांनुसार तिरुपती बालाजी ट्रस्टकडे) जात असल्याचा बनाव रचण्यात आला होता.

या कंटेनरमध्ये सुमारे ४०० कोटींची रोकड होती आणि ती लुटण्यात आल्याचा दावा तक्रारदार तरुणाने केला . मात्र, या नोटा नेमक्या कोणाच्या होत्या आणि त्या कुठे जात होत्या, हे गूढ अद्याप कायम आहे.

आंतरराज्यीय तपास आणि राजकीय कनेक्शन

या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात पोलीस संयुक्तपणे तपास करत आहेत.ही प्रचंड रक्कम निवडणुकीच्या काळात वापरली जाणार होती का? आणि यात कोणत्या राजकीय नेत्याचा वरदहस्त आहे का? या दिशेने ‘एसआयटी’ तपास करत आहे. तसेच, जुन्या नोटा बदलून देण्यासाठी गुजरातच्या एका आश्रमासोबत ६०:४० या प्रमाणात व्यवहार ठरल्याचीही चर्चा आहे.

Web Title: Sensational a young man was kidnapped from a cash container worth 400 crore rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2026 | 10:19 AM

Topics:  

  • Nashik Crime
  • Nashik News

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! इलेक्शन ड्युटीला दांडी पडणार महागात; तब्बल 200 जणांची नोकरी संकटात
1

मोठी बातमी ! इलेक्शन ड्युटीला दांडी पडणार महागात; तब्बल 200 जणांची नोकरी संकटात

Nashik Crime: वडिलांच्या निधनानंतर १५ दिवसांतच २१ वर्षीय मुलाने विहिरीत उडी मारून संपवलं जीवन; कुटुंबावर दुःखाचा डोंगर
2

Nashik Crime: वडिलांच्या निधनानंतर १५ दिवसांतच २१ वर्षीय मुलाने विहिरीत उडी मारून संपवलं जीवन; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.