BMC Mayoral Election: मुंबईच्या महापौर पदाची निवडणूक लांबणीवर; महायुतीमधील 'हॉटेल डिप्लोमसी'
मुंबई महानगरपालिका महापौर निवडणुकीबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. मुंबई महापौर पदाची निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेसोबत सत्तेच्या समीकरणावर एकमत न झाल्यामुळे मुंबई महापौर पदाची निवडणूक लाबंणीवर पडण्याची चिन्हे आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत ८९ जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी सत्तास्थापनेसाठी लागणारा ११४ चा जादुई आकडा गाठण्यासाठी त्यांना मित्रपक्षांची मदत आवश्यक आहे. पण एकनाथ शिंदे यांच्यासोबत सत्तावाटपाचे समीकरण न जुळल्यामुळे महापौर पदाची निवडणूक लांबणीवर पडू शकते.
मुंबई महानगरपालिकेत भाजपचे 89 आणि शिंदे सेनेला २९ जागा मिळाल्या. दोन्ही पक्षंकडे ११८ इतके बहुमताचे संख्याबळ आहे. याशिवाय महापौर पदाच्या आरक्षण सोडतीत मुंबईचे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. येत्या ३१ जानेवारीला दुपारी १२ वाजता महापौरपदाची निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी त्यासंदर्भात सुचनाही दिल्या होत्या. पण भाजप आणि शिंदे सेनेच्या नगरसेवकांची गट नोंदणी झालेली नाही. तसेच, भाजप आणि शिवसेनेतील महापौर पदाच्या नावाबाबतही दोन्ही पक्षांमध्ये एकमत झालेले नाहीत. त्यातच भर म्हणजे भाजप आणि शिंदे गटात स्थायी समिती आणि इतर पदांच्याही वाटाघाटी संपलेल्या नाहीत. शुक्रवारी रात्री दोन्ही पक्षांमधील वरिष्ठ नेत्यांमध्ये पदाबांबत बैठक झाली. पण कोणताही निष्कर्ष न निघाल्यामुळे महापौरपदाची निवडणूक 31 जानेवारीला न घेण्याचा निर्णय झाल्याचे समजते.
दरम्यान, भाजप आणि शिवसेने शिंदे गटाच्या नगरसेवकांची विभागीय आयुक्तांकडे अधिकृत गटनोंदणी न झालेली नाही. पक्षादेश लागू करण्यासाठी गटनोंदणी ही आवश्यक प्रक्रिया असते. त्यातच नगरसेवकांच्या फोडाफोडीची शक्यता असल्याने दोन्ही पक्षांकूडन खबरदारी घेतली जात आहे. मुंबई महापौरपदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गातील आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाकडून या प्रवर्गातील महिला उमेदवाराचा शोध सुरू आहे.
मुंबई महानगरपालिकेत भाजप (८९ जागा) सर्वात मोठा पक्ष असला, तरी सत्तास्थापनेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची (२९ जागा) साथ अनिवार्य आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने महापौरपदावर दावा केला असून, यासाठी आमदारांची आणि नगरसेवकांची ‘हॉटेल डिप्लोमसी’ सुरू असल्याची चर्चा आहे. शिंदे गट अडीच-अडीच वर्षांच्या महापौरपदाच्या सूत्रासाठी (Formula) आग्रही असल्याचे समजते.
आरक्षण सोडतीनंतर यापूर्वी ३१ जानेवारी ही मतदानासाठी संभाव्य तारीख मानली जात होती. मात्र, प्रशासकीय अडचणी आणि राजकीय पेच पाहता आता ही प्रक्रिया फेब्रुवारी २०२६ पर्यंत लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. तोपर्यंत सध्याच्या राजकीय हालचालींवरून मुंबईवर नेमके कोणाचे ‘राज’ असेल, हे स्पष्ट होईल.






