Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोथरुडमध्ये गुन्हेगारी वाढली, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पोलिसांना निवेदन; नेमकं मागणी काय?

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कोथरुड विधानसभा युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी पोलीस निरिक्षक (गुन्हे) अनिल माने यांना निवेदन देऊन गुन्हेगारीला आळा घालण्याची मागणी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 23, 2025 | 05:55 PM
कोथरुडमध्ये गुन्हेगारी वाढली, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पोलिसांना निवेदन; नेमकं मागणी काय?

कोथरुडमध्ये गुन्हेगारी वाढली, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पोलिसांना निवेदन; नेमकं मागणी काय?

Follow Us
Close
Follow Us:
  • पुण्यातील कोथरुडमध्ये गुन्हेगारी वाढली
  • शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पोलिसांना निवेदन
  • गुन्हेगारीला आळा घालण्याची केली मागणी
पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागातून खून, हाणामाऱ्या, धमक्या, लुटमार यासारख्या घटना उघडकीस येत असतात. गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. पुण्यातील कोथरुडमध्येही गेल्या काही महिन्यापासून गुन्हेगारी वाढली आहे. सोनसाखळी हिसकावणे, लुटमार, खुनाचा प्रयत्न अशा घटना घडल्या आहेत. वाढत्या गुन्हेगारीवरुन शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कोथरुड विधानसभा युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी पोलीस निरिक्षक (गुन्हे) अनिल माने यांना निवेदन देऊन गुन्हेगारीला आळा घालण्याची मागणी केली आहे.

पोलीस निरिक्षकांना दिलेल्या निवेदनात गुरनानी म्हणाले, सुसंस्कृत पुण्याचा केंद्रबिंदू आणि मानबिंदू म्हणजे कोथरूड हा परिसर. कोथरुडमध्ये राहण्यासाठी अनेक युवा तसेच अबालवृद्ध अवघ्या महाराष्ट्रातून येतात व आपापल्या परीने कष्ट करून जीवन जगण्यासाठी आणि समृद्ध करण्यासाठी धडपडत असतात. मागच्या काही वर्षात सुसंकृत कोथरूडमध्ये गुंडगिरी, गँगवॉर, हफ्ते वसुली, दुकानफोडी, घरफोडी, साखळी चोरी, महिलांवर अत्याचार, कोयता गँग प्रकरण अशा अनेक गुन्हेगारी कृत्यांचा जणू सुळसुळाटच अनुभवायला मिळत आहे. या कृत्यांमुळे सामान्य माणसाच्या मनात दहशत निर्माण होत चालली आहे. आणि हेच या समाजातील अराजक तत्त्वांचे लक्ष्य आहे. या जाचातून जर कोथरूडला कोणी मुक्त करू शकते तर ते आहे आपले कर्मवीर आणि कर्तव्यनिष्ठ महाराष्ट्र आणि पुणे पोलिस. या कोथरूडचे रक्षण करण्याची जबाबदारी कोथरूडचे पोलिस निरीक्षक या नात्याने परमेश्वराने आपल्या खांद्यावर टाकली आहे आणि याच कारणाने येथील जनता आपल्याकडे आस लावून बसली आहे.

या कोथरूडच्या असंख्य सामान्य जनतेच्या वतीने मी आपणास विनंती करतो की, कठोरातली कठोर कारवाई करून आणि कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता, गुन्हेगारांचे संबंध कुठल्याही राजकीय पक्षाशी, प्रतिष्ठित व्यक्तींशी किंवा धनाढ्य व्यक्तींशी असले तरीही त्याची कुठलीही गयावया न करता, कोथरूडला या त्रासातून एकदाचे मुक्त करा व कोथरूडला गत वैभव, समृद्धी व शांतता प्राप्त करून द्या. असे केल्यास येथील जनता व मी आपले सदैव ऋणी राहू, अशी मागणी गुरनानी यांनी निवेदनातून केली आहे.

Web Title: Sharad pawars ncp has given a statement to the police regarding the increasing crime in kothrud

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2025 | 05:55 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Kothrud
  • Kothrud News
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

वातावरण पाहून भाजपात घाऊक इन्कमिंग; सक्षम उमेदवार शोधताना विरोधकांची तारांबळ
1

वातावरण पाहून भाजपात घाऊक इन्कमिंग; सक्षम उमेदवार शोधताना विरोधकांची तारांबळ

नगरपालिका निवडणुकीतील सत्ताधारी पक्षांचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा आरोप
2

नगरपालिका निवडणुकीतील सत्ताधारी पक्षांचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा आरोप

Nagarpalika Election Results 2025: ‘हा भाजपचा सर्वात मोठा विजय’; फडणवीसांनी मांडली विजयाची ‘ब्लू प्रिंट’, जिथे अपयश आलं, तिथे…
3

Nagarpalika Election Results 2025: ‘हा भाजपचा सर्वात मोठा विजय’; फडणवीसांनी मांडली विजयाची ‘ब्लू प्रिंट’, जिथे अपयश आलं, तिथे…

सासवड नगरपालिकेत भाजपचा झेंडा; नगराध्यक्षपदी आनंदी काकी जगताप तिसऱ्यांदा विराजमान
4

सासवड नगरपालिकेत भाजपचा झेंडा; नगराध्यक्षपदी आनंदी काकी जगताप तिसऱ्यांदा विराजमान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.