Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Prafull Patel meets Sharad Pawar : ब्रीच कँडीमध्ये शरद पवार आणि प्रफुल्ल पटेलांची भेट; राजकीय चर्चेत नेमकं काय घडलं?

Prafull Patel meets Sharad Pawar : शरद पवार यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू असताना प्रफुल्ल पटेल यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीत अमित शाहांसोबत झालेल्या बैठकीबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

  • By विवेक
Updated On: Nov 05, 2026 | 10:33 PM
Sharad Pawar Prafull patel meet

Sharad Pawar Prafull patel meet

Follow Us
Follow Us:
  • ब्रीच कँडी रुग्णालयात प्रफुल्ल पटेल शरद पवारांच्या भेटीला
  • अमित शाहांसोबतच्या बैठकीबाबत पवारांची विचारणा
  • छगन भुजबळ आणि विश्वजीत कदम यांनीही घेतली भेट
 

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात भेट झाली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना सुरुवात झाली आहे. (Prafull Patel meets Sharad Pawar)

शरद पवार यांच्यावर सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुरुवारी (5 नोव्हेंबर) प्रफुल्ल पटेल यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मात्र, या भेटीची चर्चा केवळ प्रकृतीपुरती मर्यादित राहिली नाही.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांनी यावेळी प्रफुल्ल पटेल यांच्याकडे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीबाबत विचारणा केली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, कोणते विषय मांडण्यात आले, याची माहिती त्यांनी घेतल्याचं सांगितलं जात आहे.

Hasan Mushrif : हसन मुश्रीफांना मोठा दिलासा! ED चा क्लोजर रिपोर्ट मंजूर, मनी लाँड्रिंग प्रकरणाला पूर्णविराम

अमित शाहांच्या बैठकीबाबत नेमकी काय चर्चा?

दरम्यान, 2 नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील सहा प्रमुख नेत्यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली होती. या शिष्टमंडळात प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील यांचा समावेश होता.

या बैठकीनंतर राष्ट्रवादीतील अंतर्गत घडामोडी आणि दोन्ही गटांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीबाबत चर्चा सुरू झाली होती.

‘राजकीय भूमिका वेगळी, पण वैयक्तिक प्रेम कायम’

शरद पवारांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, साहेबांची तब्येत चांगली आहे. ते हसत होते आणि राज्यासह देशात काय सुरू आहे, याची विचारपूस करत होते.

आमची राजकीय भूमिका वेगळी असली तरी वैयक्तिक प्रेम आणि पारिवारिक संबंध कायम आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. रुग्णालयात इतर राजकीय चर्चा करणं योग्य नसल्याचं सांगत त्यांनी अधिक भाष्य करणं टाळलं. दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांच्या आधी मंत्री छगन भुजबळ आणि काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनीही शरद पवारांची भेट घेतली होती.

आता या भेटीमुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमधील राजकीय संवादाबाबत नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, या भेटीत नेमकी कोणती राजकीय चर्चा झाली, याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

Kolhapur Gokul Politics : गोकुळच्या वादात रोहित पवारांची उडी! ‘फडणवीसांचा इगो दुखावला म्हणून संविधानाशी छेडछाड?’

💡

Frequently Asked Questions

  • Que: प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची भेट कधी आणि कुठे घेतली?

    Ans: गुरुवारी, 5 नोव्हेंबर 2026 रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतली.

  • Que: शरद पवारांनी प्रफुल्ल पटेल यांच्याकडे कोणती विचारणा केली?

    Ans: सूत्रांच्या माहितीनुसार, शरद पवार यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीबाबत विचारणा केली. मात्र, या चर्चेचा अधिकृत तपशील समोर आलेला नाही.

  • Que: प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांच्या प्रकृतीबाबत काय सांगितलं?

    Ans: शरद पवार यांची तब्येत चांगली असून ते हसत होते आणि राजकीय घडामोडींची विचारपूस करत होते, असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं. रुग्णालयातील डॉक्टरांनीही त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली आहे.

Web Title: Prafull patel meets sharad pawar breach candy hospital vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 10:30 PM

Topics:  

  • NCP Party
  • NCP Sharad Pawar
  • Prafull Patel
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

Rohit Pawar : भाजपकडून कुटुंबात वाद लावण्याचा प्रयत्न? पार्थ आणि सुनेत्रा पवारांना एकटं पाडलं जातंय? रोहित पवारांचा गौप्यस्फोट
1

Rohit Pawar : भाजपकडून कुटुंबात वाद लावण्याचा प्रयत्न? पार्थ आणि सुनेत्रा पवारांना एकटं पाडलं जातंय? रोहित पवारांचा गौप्यस्फोट

Parth-Sunetra Pawar यांना बाजूला ठेवून राष्ट्रवादीचे नेते शहांच्या भेटीला! नेमकं काय शिजतंय?
2

Parth-Sunetra Pawar यांना बाजूला ठेवून राष्ट्रवादीचे नेते शहांच्या भेटीला! नेमकं काय शिजतंय?

Sharad Pawar Health Update: शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; डिस्चार्ज कधी मिळणार? डॉक्टरांना दिली महत्त्वाची माहिती
3

Sharad Pawar Health Update: शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; डिस्चार्ज कधी मिळणार? डॉक्टरांना दिली महत्त्वाची माहिती

Sharad Pawar Health Update:  शरद पवारांची प्रकृती पुन्हा बिघडली, श्वास घेताना छातीत वेदना, डॉक्टरांकडून अधिकृत निवेदन जारी
4

Sharad Pawar Health Update: शरद पवारांची प्रकृती पुन्हा बिघडली, श्वास घेताना छातीत वेदना, डॉक्टरांकडून अधिकृत निवेदन जारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.