Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NCP Merger : अजितदादा असते तर राष्ट्रवादी एकत्र आली असती! सुनील तटकरेंचा मोठा गौप्यस्फोट, 12 फेब्रुवारीला काय घडणार होतं?

NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सुनील तटकरे यांनी अजित पवार हयात असते तर दोन्ही पक्ष एकत्र आले असते, असं मोठं विधान केलं. तसंच 12 फेब्रुवारी ही तारीखही निश्चित झाली असती, असा दावा त्यांनी केला आहे.

  • By विवेक
Updated On: Nov 06, 2026 | 04:01 PM
Sunil Tatkare

Sunil Tatkare

Follow Us
Follow Us:
  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर सुनील तटकरे यांचं मोठं विधान
  • प्रफुल पटेल यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण
  • शशिकांत शिंदेंनी तटकरेंच्या विधानाला दिला दुजोरा
 

राज्याच्या राजकारणात सध्या घडामोडीना वेग आला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध कारणांवरून संघर्ष होताना दिसत आहे. अश्यातच आता राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चाना जोर आला आहे. कारण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत मोठे विधान केले आहे. त्यामुळे, राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. (NCP Merger)

सुनील तटकरे यांनी याबाबत केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. ‘अजित पवार हयात असते तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आज एकत्र दिसल्या असत्या,’ असं तटकरे यांनी म्हटलं आहे.

अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या!

सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं की, सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत कोणतीही चर्चा सुरू नाही. मात्र, अजित पवार असते तर चित्र वेगळं असतं. त्यांच्या निधनामुळे विलिनीकरणाची चर्चा मागे पडली. अजितदादा असते तर दोन्ही पक्ष एकत्र आलेले पाहायला मिळाले असते, असं तटकरे म्हणाले.

Raj Thackeray: ‘…स्वतःच लोकशाहीचा गळा आवळतील’, गोकुळवरून राज ठाकरेंची खोचक टीका; भाजपला सुनावले

एवढंच नाही तर 12 फेब्रुवारी ही तारीखही निश्चित झाली असती, असा महत्त्वाचा दावा त्यांनी केला. अजित पवारांचे आपण जवळचे सहकारी असल्याने त्यांनी याबाबत आपल्याला सांगितलं होतं, असंही तटकरेंनी नमूद केलं.

प्रफुल पटेल यांच्या भेटीनंतर चर्चांना वेग

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी शरद पवार यांची काल (गुरुवार, 5 नोव्हेंबर) रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. या भेटीनंतर पटेल यांनी राजकीयदृष्ट्या आम्ही दूर असलो तरी मनाने दूर नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का, असा प्रश्न उपस्थित झाला होता.

शशिकांत शिंदेंनीही दिला दुजोरा

दरम्यान, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही तटकरेंच्या विधानावर प्रतिक्रिया दिली. अजित पवार असताना दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू होती. आम्ही याबाबत आधीपासून बोलत होतो, मात्र त्यावेळी आमच्या विधानांना फारसं महत्त्व दिलं जात नव्हतं. आता तटकरे यांनीच याबाबत सांगितल्यामुळे वस्तुस्थिती स्पष्ट झाली आहे, असं शिंदे म्हणाले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या तर जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांचं राजकीय चित्र वेगळं दिसलं असतं, असंही त्यांनी सांगितलं.

एकंदरीत, अजित पवारांच्या निधनानंतर रखडलेला विलिनीकरणाचा मुद्दा आता पुन्हा ऐरणीवर आला आहे. मात्र, सध्या तरी दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत कोणताही अधिकृत निर्णय किंवा चर्चा सुरू असल्याचं स्पष्ट झालेलं नाही.

Praful Patel Meets Sharad Pawar: १० तारखेनंतर बसून चर्चा करू…; शरद पवार प्रफुल्ल पटेलांना असं का म्हणाले?

💡

Frequently Asked Questions

  • Que: सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत काय विधान केलं?

    Ans: अजित पवार हयात असते तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण झालं असतं आणि दोन्ही पक्ष आज एकत्र दिसले असते, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं.

  • Que: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासाठी 12 फेब्रुवारी ही तारीख निश्चित झाली होती का?

    Ans: सुनील तटकरे यांच्या दाव्यानुसार, अजित पवार हयात असते तर 12 फेब्रुवारी ही तारीख निश्चित झाली असती.

  • Que: शशिकांत शिंदे यांनी सुनील तटकरेंच्या विधानावर काय प्रतिक्रिया दिली?

    Ans: अजित पवारांच्या काळात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू होती आणि दोन्ही पक्षांनी एकत्र यावं, अशी अपेक्षा होती, असं शशिकांत शिंदे यांनी म्हटलं.

Web Title: Sunil tatkare ncp merger ajit pawar 12 february statement vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 03:58 PM

Topics:  

  • NCP Party
  • NCP Sharad Pawar
  • Sharad Pawar
  • sunil tatkare

संबंधित बातम्या

Praful Patel Meets Sharad Pawar: १० तारखेनंतर बसून चर्चा करू…; शरद पवार प्रफुल्ल पटेलांना असं का म्हणाले?
1

Praful Patel Meets Sharad Pawar: १० तारखेनंतर बसून चर्चा करू…; शरद पवार प्रफुल्ल पटेलांना असं का म्हणाले?

Prafull Patel meets Sharad Pawar : ब्रीच कँडीमध्ये शरद पवार आणि प्रफुल्ल पटेलांची भेट; राजकीय चर्चेत नेमकं काय घडलं?
2

Prafull Patel meets Sharad Pawar : ब्रीच कँडीमध्ये शरद पवार आणि प्रफुल्ल पटेलांची भेट; राजकीय चर्चेत नेमकं काय घडलं?

Rohit Pawar : भाजपकडून कुटुंबात वाद लावण्याचा प्रयत्न? पार्थ आणि सुनेत्रा पवारांना एकटं पाडलं जातंय? रोहित पवारांचा गौप्यस्फोट
3

Rohit Pawar : भाजपकडून कुटुंबात वाद लावण्याचा प्रयत्न? पार्थ आणि सुनेत्रा पवारांना एकटं पाडलं जातंय? रोहित पवारांचा गौप्यस्फोट

Parth-Sunetra Pawar यांना बाजूला ठेवून राष्ट्रवादीचे नेते शहांच्या भेटीला! नेमकं काय शिजतंय?
4

Parth-Sunetra Pawar यांना बाजूला ठेवून राष्ट्रवादीचे नेते शहांच्या भेटीला! नेमकं काय शिजतंय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.