
Sheetal Tejwani arrested by Pune Police in Mundhwa land scam case
शीतल तेजवानी हिने महार वतनाची जागा पॉवर ऑफ अॅटर्नीकरून घेतलेले कागदपत्रे तसेच अमेडिया कंपनीसोबत केलेल्या व्यवहाराच्या अनुषंगाने ही चौकशी झाल्यानंतर ही अटक झाली. या प्रकरणामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अडचणी वाढल्या होत्या. पार्थ पवार संचालक असलेल्या अमेडिया कंपनीवर बोपोडी व मुंढवा अशा दोन जमीन प्रकरणात पुण्यातील खडक पोलिसांत एकच गुन्हा नोंद झाला. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे.
दरम्यान, बोपोडी जमीनप्रकरणात अमेडिया कंपनीचे संचालक दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवाणी यांचा संबंध नसल्याचे देखील पोलिसांनी नंतर स्पष्ट केले.
हे देखील वाचा : अजित पवारांच्या घरी लगीनगाई! परदेशात पार पडणार विवाहसोहळा, राष्ट्रवादीच्या केवळ दोन नेत्यांनाच आमंत्रण
मुंढवा जमीन महार वतनाची आहे. परंतु, २००६ मध्ये शीतल तेजवाणी हिने २७५ व्यक्तींकडून ही जमीन पॉवर ऑफ अॅटर्नीकरून घेतली. नंतर २०२५ मध्ये ही जमीन शीतल तेजवाणी हिने अमेडिया कंपनीसोबत करारकरून ती जमीन त्यांना दिली. या जमीनप्रकरणात जूनमध्ये ताबा घेण्याचा देखील प्रयत्न झाला होता.
हे देखील वाचा : देवेंद्र फडणवीस अन् संजय राऊत यांची खास भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
दरम्यान, पुणे पोलिस आता जमीनप्रकरणात नेमका व्यवहार काय झाला या अनुषंगाने तपास करत आहेत. सुर्यकांत येवले, दिग्विजय पाटील, शीतल तेजवाणी आणि हेमंत गवंडे यांना नोटीस देऊन चौकशीला बोलावले होते, हेमंत गवंडेची चौकशी झाली. आता बुधवारपासून शीतल तेजवाणी हिची याप्रकरणात पोलिसांकडून चौकशी केली आहे. पोलिसांनी सलग दोन दिवस शीतल तेजवाणीकडे चौकशी केली. चौकशीत पोलिसांनी नेमक संबंधित व्यक्तींकडून पॉवर ऑफ अॅटर्नीकरून घेताना त्यांना काय मोबदला दिला, कशाच्या आधारावर पॉवर ऑफ अॅटर्नी केली, अमेडिया कंपनीसोबत झालेला व्यवहार कशा पद्धतीने झाला, या अनुषंगाने ही चौकशी केली होती. यासंदंर्भातील सर्व कागदपत्रे पोलिसांनी जप्त केलयांतर तिचा यात सहभाग दिसल्यानंतर आज तिला अटक करण्यात आली