Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी मोठी अपडेट; तपासातून धक्कादायक माहिती उघड

न्यायालयाने शशांक, लता आणि करिष्मा हगवणे यांच्या पोलीस कोठडीत एक दिवस तर राजेंद्र आणि सुशील यांच्या पोलीस कोठडीत ३१ मेपर्यंत वाढ केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 29, 2025 | 11:01 AM
वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी मोठी अपडेट; तपासातून धक्कादायक माहिती उघड

वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी मोठी अपडेट; तपासातून धक्कादायक माहिती उघड

Follow Us
Follow Us:

पुणे : बावधनमधील वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणात पती शशांक व दीर सुशील या हगवणे बंधूनी त्यांची आई लता आणि बहिण करिष्मा यांचे मोबाईल या गुन्‍ह्यातील फरार आरोपी नीलेश चव्हाण याच्या मदतीने लंपास केले. मोबाईलमध्ये शशांक याने पत्नी वैष्णवी यांना मारहाण केल्याचे आणि आरोपींमधील संभाषणाचे पुरावे असू शकतात, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयास दिली. दोन्ही बाजूचा युक्तीवाद झाल्यानंतर न्यायालयाने शशांक, लता आणि करिष्मा हगवणे यांच्या पोलीस कोठडीत एक दिवस तर राजेंद्र आणि सुशील यांच्या पोलीस कोठडीत ३१ मेपर्यंत वाढ केली आहे.

वैष्णवी हगवणे हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेला पती शशांक राजेंद्र हगवणे (वय २७), सासू लता राजेंद्र हगवणे (वय ५४), नणंद करिष्मा राजेंद्र हगवणे (वय ३१), सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे (वय ६३), दिर सुशील राजेंद्र हगवणे (वय २७) यांच्या पोलीस कोठडीची मुदत बुधवारी संपली. त्यामुळे पाचही आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते.

नीलेश चव्हाणचा राजेंद्र आणि सुशील यांच्या मदतीने शोध घेतला जात आहे. तर लता, करिष्मा व सुशिल हगवणे यांच्या मोबाईलचाही शोध सुरू आहे. चव्हाण व सुशिल हगवणे यांच्यामधील गुन्ह्याच्या अनुषंगाने झालेले चॅट, मेसेजस हे पुराव्यासाठी जप्त केले जात आहेत. वैष्णवी यांचा मृत्यू होण्यापूर्वी शशांकने त्यांना पाच आणि तीन दिवस आधी वेगवेगळ्या हत्याराने मारहाण केली. त्याने आणखी कोणत्या हत्याराने मारहाण केली याचा शशांककडे तपास करून ते हत्यार जप्त करायचे आहे. त्यामुळे शशांक, लता आणि करिष्मा हगवणे यांच्या पोलीस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून एक दिवसांची तर राजेंद्र आणि सुशील यांच्या पोलीस कोठडीत सात दिवसांची वाढ करण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील नितीन अडागळे यांनी केला. आरोपींच्या वतीने ॲड. विपुल दुशिंग यांनी युक्तिवाद केला.

सोन्याबाबतची माहिती स्वतः पोलिसांना दिली – बचाव पक्ष

पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी करताना जुनीच कारणे दिली आहेत. सोन्याबाबतची सर्व माहिती यापूर्वी आरोपींनी स्वतःहून पोलिसांना दिली आहे. व्यवसाय करण्यासाठी कुटुंबातील सर्वांचे सोने गहाण ठेवण्यात आले होते. आपले सोने काढून घेतल्याची तक्रार वैष्णवी यांनी केलेली नाही. त्यांचे एका तरुणासोबतचे चॅटिंग शशांक यांना मिळाले होते. त्यातून त्यांच्यात वाद झाले होते, याबाबत तपास पोलिसांनी केलेला नाही, असा युक्तिवाद ॲड. दुशिंग यांनी केला.

हगवणे कुटुंबीयांच्या पोलीस कोठडीत वाढ

दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. पी. खंदारे यांनी आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ केली आहे. शशांक, लता आणि करिष्मा हगवणे यांच्या पोलिस कोठडीत एक दिवस तर राजेंद्र आणि सुशील यांच्या पोलिस कोठडीत ३१ मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल विभूते या गुन्ह्याचा तपास करत आहे. आत्तापर्यंत केलेल्या तपासाची माहिती त्यांनी न्यायालयास दिली.

यांना मिळाला जामीन 

फरार झालेला दीर आणि सासरा यांना आश्रय दिल्याप्रकरणी अटक केलेल्या प्रीतम वीरकुमार पाटील (वय ४७, रा. कोगनोळी, ता. चिकोडी, जि. बेळगाव, कर्नाटक), मोहन ऊर्फ बंडू उत्तम भेगडे (वय ६०, रा. वडगाव मावळ), बंडू लक्ष्मण फाटक (वय ५५, रा. लोणावळा), अमोल विजय जाधव (वय ३५, रा. पुसेगाव, ता. खटाव, जि. सातारा), राहुल दशरथ जाधव (वय ४५, रा. पुसेगाव, ता. खटाव, जि. सातारा) यांना जामीन मंजूर झाला आहे. तर वैष्णवी यांच्या मुलाचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या कस्पटे कुटुंबीयांना पिस्तुलाचा धाक दाखवत धमकी दिल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपी नीलेश चव्हाण हा अद्याप फरार आहे.

Web Title: Shocking information has been revealed from the investigation into vaishnavi hagavanes death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2025 | 11:01 AM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Cmomaharasahtra
  • Rajendra Hagavane
  • Vaishnavi Hagavane
  • Vaishnavi hagavane Case

संबंधित बातम्या

माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रकल्पाविरोधात गाढव मोर्चा; अदाणी हटाओ, सह्याद्री बचाओच्या घोषणांनी परिसर दणाणला
1

माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रकल्पाविरोधात गाढव मोर्चा; अदाणी हटाओ, सह्याद्री बचाओच्या घोषणांनी परिसर दणाणला

चाकण एमआयडीसीसाठी तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी द्या; आदित्य ठाकरेंची मागणी
2

चाकण एमआयडीसीसाठी तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी द्या; आदित्य ठाकरेंची मागणी

चिखलोली न्यायालय परिसरात अपहरणाचा प्रयत्न भोवला! तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
3

चिखलोली न्यायालय परिसरात अपहरणाचा प्रयत्न भोवला! तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

8 वर्षांची प्रतीक्षा संपली; पिंपरी-चिंचवड पोलिसांना मुख्यालयासाठी मिळाली 50 एकर जागा
4

8 वर्षांची प्रतीक्षा संपली; पिंपरी-चिंचवड पोलिसांना मुख्यालयासाठी मिळाली 50 एकर जागा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.