crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
पुणे: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमीयुगुलाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील खडकवासला धरणाजवळ असलेल्या जंगलामध्ये या प्रेमीयुगलांचा मृत्यूदेह सापडला. आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगुलांचे तीन वर्षांपासून प्रेम संबंध असल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी आत्महत्या केलेल्या तरुणीच्या बहिणीने काल पोलिसात फिर्याद दिली होती. तरुणी ही १६ वर्षांची असून तरुणाचा नाव संतोष कळसाईत असे आहे. हा अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्याचा असल्याची माहिती आहे.
धक्कादायक ! पत्नीने पतीला फेकून मारलेले त्रिशूल चिमुकल्याच्या डोक्यात घुसले; तडफडून झाला मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी फिर्यादी यांनी त्यांच्या बहिणीला क्लाससाठी सोडलं होतं. मात्र क्लास संपल्यानंतर ती परत न आल्याने त्यांनी वानवडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी एका संशयित मुलाचा तपास देखील करायला सुरुवात केली. तरुणीचा शोध घेण्यासाठी त्यांनी तिच्या मित्र मैत्रिणीशी संपर्क केला. तरुण संतोष कळसाईत यालाही संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा मोबाइल बंद लागला. तो मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्याचा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याच्या मूळ गावीही पोलिसांनी संपर्क केला. त्याचा मोबाईल सायंकाळी साडेपाचपासून बंद असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
दरम्यान खडकवासला धरणाजवळ असलेल्या जंगलात २ मृतदेह मिळून आल्याची माहिती समोर आली. उत्तमनगर पोलिसांनी धाव घेत याबाबतची माहिती वानवडी पोलिसांना कळवली. त्यावेळी या दोन्ही मृतदेहांची ओळख पटली या दोघांनी विषप्राशन करून आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. या दोघांचे एकमेकांशी प्रेमसंबंध असल्याने व त्याला घरातून विरोध झाल्याने त्यांनी गुरुवारी रात्रीच्या सुमारास खडकवासला परिसरात येऊन विष घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मात्र मुलाच्या मृतदेह पाहिल्यावर त्यांची जीभ बाहेर आली होती. त्यामुळे विष घेतल्यावर जीभ बाहेर येते का? हि आत्महत्या आहे कि घातपात अशी चर्चा सुरु आहे. या प्रश्नांचे उत्तर शवविच्छेदन अहवालानंतरच समोर येणार आहे.
फेसबुकवर व्यवसायाचं आमिष दाखवत लाखो रुपयांची फसवणूक; नैराश्यात एकाने संपवलं आयुष्य
नाशिक: फेसबुकवर व्यवसायाचे आमिष दाखवत लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात तणावात आणि नैराश्यात असलेल्या व्यक्तीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव प्रशांत पाटील असेल आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांनी फेसबुकवर https://www.facebook. com/padma.v.chikte या लिंकवरून संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या सांगण्यावरून हापको ऑइलचा व्यवसाय सुरु करण्यासाठी पैसे गुंतवले होते. या संधार्बत संबंधिताने मेल आयडी padmavchikte@gmail.com व मोबाईल क्रमांक 9156097805 चा वापर केला आहे. एकूण ५५ लाख 79 हजार 300 रुपयांनी रक्कम विविध विविध बँक खात्यांमध्ये जमा केली. पैसे परत न मिळाल्याने आणि संपूर्ण रक्कम कर्जावर घेतल्याने आर्थिक तणावात आलेल्या प्रशांत पाटील यांनी आत्महत्या केली.
सोसायटीत बॅडमिंटन खेळतांना विजेचा लागला शॉक; १५ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू