नायगाव: नायगावच्या बीच कॉम्प्लेक्समध्ये एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. सोसायटीत बँडमिंटन खेळात असतांना एका मुलाचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शुक्रवारी संध्याकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. मृत्यू झालेल्या मुलाचा नाव आकाश संतोष साहू आहे. या घटनेने साहू कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, शुक्रवारी (११ जुलै) संध्याकाळी सातच्या सुमारास आकाश आपल्या मित्रांसोबत सोसायटीच्या आवारात बॅडमिंटन खेळत होता. खेळादरम्यान शटल कॉक पहिल्या मजल्यावरून एका फ्लॅटजवळील खिडकीत गेला. तो शटल काढण्यासाठी आकाश वर गेला असता, तिथल्या खिडकीतून एसीच्या विद्युतप्रवाहाचा जोरदार शॉक लागून आकाश जागीच कोसळला आणि मृत झाला.
ज्यांच्या फ्लॅटमध्ये आकाश गेला होता तिथे राहणाऱ्या महिला ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर सोसायटीतील नागरिकांमध्ये संतापाचा भडका उडाला असून. अनेकांनी त्या महिलेविरोधात तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही रहिवाश्यांनी तिला सोसायटीतून बाहेर करण्याची मागणी देखील केली आहे. घटनेचा संपूर्ण तपशील सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी तपास सुरु केला आहे. एसीमधून बाहेर पडणारा विद्युतप्रवाह इतका तीव्र कसा झाला, याबाबत चौकशी केली जात आहे. मात्र या दुर्दैवी घटनेने परिसरात एकाच शोककळा पसरली आहे.
धक्कादायक ! पत्नीने पतीला फेकून मारलेले त्रिशूल चिमुकल्याच्या डोक्यात घुसले; तडफडून झाला मृत्यू
एकीकडे नायगाव मध्ये विजेचा शॉक लागून झटका लागला ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला तर, दुसरीकडे पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.पती-पत्नीमधील वाद हा कधी क्षणिक असतो तर काहीवेळा जीवघेणाही ठरतो. मात्र, पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवरा-बायकोच्या भांडणात 11 बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. दीर आणि भावजयीचे भांडण सोडवायला गेलेल्या महिलेच्या चिमुकल्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
दीर आणि भावजयीचे भांडण सुरु होते. हे भांडण सोडवण्यासाठी महिला गेली असता जावेच्या कडेवर असलेल्या बाळाच्या डोक्यात त्रिशूळ घुसला. यामध्ये बाळाचा तडफडून जागीच मृत्यू झाला. ही महिला नवऱ्याला त्रिशूळ फेकून मारत होती. पण हा त्रिशूळ नवऱ्याला न लागता बाळाच्या डोक्यात घुसला. या घटनेत ११ महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला. या प्रकरणी यवत पोलिस ठाण्यामध्ये नवरा-बायकोच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातील कडेगावच्या आंबेगाव पुनर्वसन भागात ही धक्कादायक घटना घडली. नवरा-बायकोच्या भांडणात चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला, डोक्यात त्रिशूळ घुसल्यामुळे ११ महिन्याच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. अवधूत मेंगवडे असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.