
crime(फोटो सौजन्य- social media)
डोक्यात गोळी घातली आणि मृतदेह पुलाखाली टाकला
विशाल चव्हाण या तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह हा एका पुलाखाली टाकून देण्यात आला होता. हवेली पोलिसांना जेव्हा त्याची माहिती मिळाली तेव्हा तातडीने पोलीस दाखल झाले होते. हत्या करून फेकून देण्यात आल्याने ओळख पटवणे पोलीसांना अवघड गेल मात्र पोलीसांनी त्याची ओळख पटवली आहे. त्याचा मृतदेह हा सध्या पीएम साठी पुण्यातील ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा सध्या शोध घेत आहेत.
बाजूला कॅमेरे नसल्याने तपासात अडचण
पोलीसांनी जेव्हा या घटनेचा शोध घ्यायला सुरुवात केली तेव्हा आजूबाजूला कुठे कॅमेरे आढळून आले नाहीत. पोलीस तपास करत आहेत. कुटुंबियांकडून माहिती जाणून घेत आहेत. या आधी कोणाशी भांडण झाल होत का? आर्थिक व्यवहार झाले होते का? हत्या करण्याच नक्की कारण पोलीस शोधत आहेत. हवेली पोलिसांनी यासाठी एक पथक नियुक्त केल असून सध्या आरोपींचा शोध घेतला जात आहे. मात्र मृतदेह हा डोक्यात गोळी घालून पुलाखाली टाकून दिल्याने कोणालाच याची माहिती नव्हती. सध्या पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पुणे महापालिका निवडणुकीसाठी उद्या मतदान पार पडत आहे. त्याची तयारी सुरू असतानाच शहराच्या हद्दीला लागून खुनाची घटना घडली आहे.
Ans: पुणे शहराजवळील डोनजे गावात ही हत्या घडली.
Ans: मृत व्यक्तीचे नाव विशाल चव्हाण असून वय २५ आहे.
Ans: पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला आहे आणि आरोपींचा शोध घेत आहेत.