परिसरात भीतीचे वातावरण
घरात अंधश्रद्धेचा प्रकार घडल्याने ही चोरी लपवण्यासाठी मुद्दाम अंधश्रद्धेचा आधार घेतला जातोय का? असा प्रश्न उपस्थित केले जात आहे. या प्रकारामुळे अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात असल्याचे चित्र दिसत आहे. या घटनेने जकातवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
पोलीस तपास सुरु
या घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा तपास केला. पोलीस अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पत्नीच्या डिलिव्हरीसाठी घरी आलेल्या जवानावर काळाचा घाला; आठ तासांच्या बाळाचा वडिलांना भावनिक निरोप
साताऱ्यामध्ये ह्रदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. पत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टी काढून गावी आलेल्या भारतीय जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाला. साताऱ्यामध्ये (Satara News) ही घटना घडली असून यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. भारतीय सैन्य दलात (Indian Army) कार्यरत असलेले जवान प्रमोद परशुराम जाधव यांचा सुट्टीवर आलेले असताना रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे दरे गावावर शोककळा पसरली. एकीकडे बाळाला जन्म देत असताना दुसरीकडे वडिलांचा मृत्यू झाला आहे. अवघ्या आठ तासांमध्ये बाळाने वडिलांना भावनिक निरोप दिल्याची घटना समोर आली आहे.
सातारा तालुक्यातील दरे गावचे सुपुत्र प्रमोद परशुराम जाधव हे भारतीय सैन्य दलात सिकंदराबाद (श्रीनगर) येथे कार्यरत होते. प्रमोद यांना आई नाहीये. काही वर्षे आधी आईचं निधन झालं होतं. त्यामुळे पत्नीच्या प्रसूतीच्या (डिलिव्हरी) काळात सोबत राहण्यासाठी ते आठ दिवसांपूर्वी सुट्टी घेऊन गावी आले होते. शनिवारी काही कामानिमित्त ते आपल्या दुचाकीवरून वाढे फाट्याकडे जात होते. यावेळी पुरुष भिक्षेकरी गृहाजवळ एका आयशर टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, प्रमोद जाधव यांचा जागीच मृत्यू झाला..
Ans: ही चोरी सातारा तालुक्यातील जकातवाडी गावात घडली.
Ans: नारळ, हळदी-कुंकू, पान आणि बाहुली असा अघोरी उतारा घटनास्थळी सोडला.
Ans: सातारा तालुका पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला असून अज्ञात आरोपींचा शोध सुरु आहे.






