
भ्रष्टाचार करणाऱ्यांना चपराक! राज्यात गत ११ महिन्यांत ९१८ लाचखोर जाळ्यात, एसीबीची धडक कारवाई
जवळपास सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये भ्रष्टाचार चांगलाच बोकाळला आहे. राज्यात गेल्या ११ महिन्यांत एसीबीने ६२२ सापळे रचून यशस्वी केले. यात ९१८ लाचखोरांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहे. गंभीर माणजे या कारवाईतील लाचेची रक्कम तब्बल ३ कोटी ८२ लाख ३ हजार १९५ रुपये एवढी प्रचंड मोठी आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून केल्या जाणाऱ्या सापळा कारवाईत नेहमीच महसूल, पोलिस हे विभाग अग्रस्थानी दिसतात. यंदाही या दोन्ही विभागांनी लाचखोरीचा रेकॉर्ड कायम ठेवला आहे. एसीबीने सर्वाधिक १५८ सापळे महसूल, तर ११४ सापळे पोलिस विभागात यशस्वी केले. त्यापाठोपाठ पंचायत समित्यांमध्ये ६३ सापळा कारवाया करण्यात आल्या. लाचखोरीत वर्ग तीनचे कर्मचारी सर्वाधिक असल्याचे पुढे आले आहे. त्यांची आकडेवारी ४४७ आहे.
दरम्यान गेल्या ११ महिन्यांत अपसंपदेची ९ प्रकरणे पुढे आली. यात १७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात मुंबई, पुणे प्रत्येकी दोन, ठाणे एक, नदिड येथील चार गुन्ह्यांचा समावेश आहे. अपसंपदेची रक्कम ३५ कोटी ६६ लाख १३ हजार ८६२ रुपये एवढी आहे. अन्या भ्रष्टाचारप्रकरणी चार गुन्हे नोंद झाले. त्याता मुंबई, पुणे प्रत्येकी एक आणि अमरावती येथील दोन गुन्ह्यांचा समावेश आहे.
दरम्यान दोन वर्षांपूर्वी २०२३ मध्ये एसीबीने यशस्वी केले, २०२४ मध्ये ६८३ आणि यावर्षी ६२२ सापळे यशस्वी केले आहेत. त्यामुळे लावखोरी कमी झाली की सापळे फसत आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, यंदा पकडलेल्या लाचखोरांमध्ये कलास वनचे ६३ अधिकारी, कलासा दूचे ११३, कलास श्रीचे ४४७ कर्मचारी, कलास फोरचो ३५ कर्मचारी, इतर लोकसेवक ८५ तर खासगी व्यक्ती १७५, अशा ९१८ आरोपीचा समावेश आहे.