Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रिल्समधून दागिन्यांची माहिती देणे पडले महागात; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या घरातून ११८ तोळे सोने लंपास

सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी आपण दैनंदिन आयुष्यातील अनेक गोष्टी जगासमोर मांडतो. मात्र, हीच माहिती कधी चोरट्यांसाठी ‘रेकी’ ठरू शकते. कन्याकुमारीतील एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला याचा धक्कादायक अनुभव आला असून, तिच्या घरातून तब्बल ११८ तोळे सोने आणि रोख रक्कम चोरीला गेली आहे.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Sep 27, 2026 | 09:48 AM
रिल्समधून दागिन्यांची माहिती देणे पडले महागात; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या घरातून ११८ तोळे सोने लंपास

रिल्समधून दागिन्यांची माहिती देणे पडले महागात; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या घरातून ११८ तोळे सोने लंपास

Follow Us
Follow Us:
  • इन्फ्लुएन्सरच्या घरातून ११८ तोळे सोन्याचे दागिने चोरीला.
  • सोशल मीडिया व्हिडिओंमधून दागिन्यांची माहिती सार्वजनिक होत होती.
  • मागील दरवाजा तोडून घरात प्रवेश; सीसीटीव्ही व मोबाइल रेकॉर्डवरून तपास.
 

Crime News: कन्याकुमारी जिल्ह्यातील नागरकोविलजवळील धम्मधु कोनम परिसरातील व्हीआयपी गार्डनमध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मधुमिता पती विनोदकुमार आणि मुलासोबत राहते. मधुमिता नियमितपणे दागिने परिधान करून त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत होती. ती दर महिन्याला सोने खरेदी करत असल्याचेही व्हिडिओमधून सांगत असे. त्यामुळे तिच्याकडे मोठ्या प्रमाणात सोने असल्याची माहिती अनेकांना होती. काही दिवसांपूर्वी मधुमिता खरेदीसाठी बाहेर गेली होती. परतण्यास उशीर झाल्याने चोरट्यांनी संधी साधत घराच्या मागील बाजूचा दरवाजा तोडून आत प्रवेश केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

हेही वाचा: वृंदावनमध्ये चौथ्या मजल्यावरून पडल्याने २५ वर्षीय रसिक दुलारीचा मृत्यू; खोलीत रक्ताचे डाग असलेले ग्राइंडर, सीसीटीव्ही फुटेज पोलिसा

गुप्त खोलीतील सोन्यावर डल्ला

घरी परतल्यानंतर मधुमिता तिच्या गुप्त खोलीत गेली असता तेथील सोन्याचे दागिने गायब असल्याचे तिच्या लक्षात आले. चोरट्यांनी सुमारे ११८ ते १२० सॉव्हरिन म्हणजेच अंदाजे ९४४ ते ९६० ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच काही रोख रक्कम लंपास केल्याचे सांगण्यात येत आहे. चोरीला गेलेल्या ऐवजाची किंमत सुमारे एक कोटी रुपये असल्याचे प्राथमिक माहितीवरून स्पष्ट झाले आहे. मधुमिताने याबाबत राजाकमंगलम पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून तपास सुरू केला असून, प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथकही नेमण्यात आले आहे.

व्हिडिओतील माहिती ठरली धागा?

मधुमिता सोशल मीडियावरील व्हिडिओंमध्ये तिच्याकडील सोन्याच्या दागिन्यांची माहिती देत असे. तिच्याकडे सोन्याच्या चार थाळ्या असल्याचे, तसेच १५ पाउंडची सोन्याची चेन आणि सुमारे ४० पाउंडची आणखी एक सोन्याची थाळी असल्याचे तिने एका व्हिडिओत सांगितल्याचे वृत्त आहे. ‘मी दर महिन्याला सोने खरेदी करते, तुम्हीही करा,’ असे आवाहनही ती फॉलोअर्सना करत असे.

This Youtuber from KanyaKumari showed off her money & jewelry in the vlog. Thieves broke the house & stole 1 Cr. worth of jewelry.pic.twitter.com/WEebM03dkZ — Vije (@vijeshetty) September 25, 2026

या पार्श्वभूमीवर चोरट्यांनी तिच्या सोशल मीडिया पोस्टवरून घरातील दागिन्यांची माहिती मिळवली का, ती सोने खरेदीसाठी कधी बाहेर पडते याची पाहणी केली का, याचा तपास पोलिस करीत आहेत. राजाकमंगलम पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज, मोबाइल रेकॉर्ड तसेच अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे. सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती, घरातील मौल्यवान वस्तू, बाहेर जाण्याची वेळ किंवा दागिन्यांचे तपशील सार्वजनिक करताना सावधगिरी बाळगण्याची गरज या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Web Title: Social media influencer gold theft kanyakumari

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 09:48 AM

Topics:  

  • Gold Jewelry
  • Gold Theft
  • Influencers
  • Social Media

संबंधित बातम्या

‘Rent a Garba Partner’ अॅपवर कारवाईची मागणी, आमदार मेहतांचे पोलीस आयुक्तांना निवेदन
1

‘Rent a Garba Partner’ अॅपवर कारवाईची मागणी, आमदार मेहतांचे पोलीस आयुक्तांना निवेदन

Social Media: आली का पंचाईत! Facebook-Instagram झालं Down, अमेरिकेनंतर आता भारतातही युजर्सची वाढली डोकेदुखी
2

Social Media: आली का पंचाईत! Facebook-Instagram झालं Down, अमेरिकेनंतर आता भारतातही युजर्सची वाढली डोकेदुखी

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे
3

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.