Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime: इंजिनिअरिंग कॉलेजच्या बॉईज हॉस्टेलमध्ये 20 वर्षीय विद्यार्थ्याने संपवले जीवन; वडिलांचा फोन आला आणि…

सोलापूरमधील नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजच्या बॉईज हॉस्टेलमध्ये 20 वर्षीय ई अँड टीसी विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. वडिलांचा फोन न आल्याने प्रकार उघडकीस आला; कारण अस्पष्ट.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 20, 2025 | 11:58 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • बॉईज हॉस्टेलच्या खोलीत २० वर्षीय तरुणाचा गळफास
  • वडिलांच्या संशयामुळे प्रकरण समोर
  • आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नाही
सोलापूर: सोलापूर शहरातील नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमधील बॉईज हॉस्टेलमध्ये एका २० वर्षीय विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.
आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव विद्याधर प्रकाश शिंदे (वय 20, रा. कळंब, जि. धाराशिव) असे आहे. विद्याधरने दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. विद्याधर हा कॉलेजमध्ये ई अँड टीसी (E&TC) शाखेच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता आणि तो कॉलेजच्या बॉईज हॉस्टेलमध्ये वास्तव्यास होता. या घटनेमुळे कॉलेजपरिसरात तसेच कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे.

Sangli Crime: तलवार, कुकरी, दगड… सांगलीत खुनांची मालिका; एकाच दिवशी दोन हत्या

घटना कशी उघडकीस आली?

ही घटना गुरुवारी (दि. 18) रात्री उघडकीस आली. विद्याधर हा दररोज रात्री वडिलांना फोन करून संपर्कात राहत होता. गुरुवारी रात्री नेहमीच्या वेळेत फोन न आल्याने वडील चिंतेत पडले. वडिलांनी साडेआठच्या सुमारास थेट हॉस्टेल प्रशासनाशी संपर्क साधला. त्यानंतर हॉस्टेलमधील कर्मचाऱ्यांनी त्याच्या खोलीकडे जाऊन दरवाजा ठोठावला. दरवाजा उघडला नसल्याने दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळले.

इतर विध्यार्थी गावी गेले आणि…

मिळालेल्या माहितीनुसार, विद्याधरच्या खोलीत राहणारे इतर विध्यार्थी अमावास्येच्या सुट्टीमुळे गावी गेले होते. त्यामुळे तो त्या दिवशी खोलीत एकटाच होता. दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास त्याने आपल्या वडिलांशी फोनवर संवाद साधला होता. त्यानंतर रात्री त्याने आपल्या वडिलांना नेहमी प्रमाणे संपर्क केला नाही. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.

कारण अद्याप स्पष्ट नाही

पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच सोलापूर तालुका पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी विद्याधरला सिव्हिल रुग्णालयात दाखल केले असता वैधकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकारणी सोलापूर तालुका पोलीस अधिक तपास करत असून आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. मृत विद्याधर शिंदे याच्या पश्चात आई-वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे. हसत खेळत राहणारा विध्यार्थी आणि दररोज वडिलांना फोन करणारा मुलगा आज अचानकपने आपल्यात नसल्याने कुटुंबीयांसह मित्रपरिवार आणि कॉलेज परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Chhatrapati Sambhajinagar: पानटपरीवर वडील, शेतात आई…घरातच अज्ञाताचा घात! १८ वर्षीय तरुणीची गळा चिरून निर्घृण हत्या; तपास सुरु

💡

Frequently Asked Questions

  • Que: आत्महत्या कुठे झाली?

    Ans: सोलापूरमधील नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजच्या बॉईज हॉस्टेलमध्ये.

  • Que: मृत विद्यार्थ्याचे नाव व वय काय?

    Ans: विद्याधर प्रकाश शिंदे, वय 20 वर्षे.

  • Que: आत्महत्येचे कारण समोर आले आहे का?

    Ans: नाही, कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस तपास सुरू आहे.

Web Title: Solapur crime a 20 year old student ended his life in the boys hostel of an engineering college

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2025 | 11:58 AM

Topics:  

  • crime
  • Solapur
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या
1

Akola Crime: अकोल्यात कौटुंबिक वादाचा थरार; चुलत भावावर ३-४ गोळ्या झाडून हत्या

Jarange Patil : कॅमेऱ्यासमोर कागदपत्रे दाखवत जरांगे पाटलांनी सरकारला घेरले!
2

Jarange Patil : कॅमेऱ्यासमोर कागदपत्रे दाखवत जरांगे पाटलांनी सरकारला घेरले!

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप
3

AHILYANAGAR : सोनईत कॉलेज कॅम्पसबाहेर तरुणाला मारहाण; पोलिसांवरही विनाकारण मारहाणीचा गंभीर आरोप

Pune Crime: दारूसाठी आईकडे पैसे मागितले, नकार मिळताच मुलाने लोखंडी रॉडने आईची हत्या
4

Pune Crime: दारूसाठी आईकडे पैसे मागितले, नकार मिळताच मुलाने लोखंडी रॉडने आईची हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.