Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganesh Festival : बाप्पाच्या उत्सवातून माणुसकीची सेवा! १२१ नागरिकांची आरोग्य तपासणी, रक्तदानाचा संदेश

Ganesh Festival : सोलापूरातील कुंभारी येथे मानाचा राजा गणपती मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. अश्विनी हॉस्पिटलच्या सहकार्याने झालेल्या या उपक्रमात १२१ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

  • By Sanman Jadhav
Updated On: Sep 22, 2026 | 10:07 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • रक्तदानातून जीवनदानाचा संदेश
  • नागरिकांचे आरोग्य हाच खरा विकास
  • उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Ganesh Festival : गणेशोत्सव म्हणजे केवळ ढोल-ताशांचा गजर आणि धार्मिक उत्सव नव्हे, तर माणुसकीची सेवा करण्याची संधीही आहे, सोलापूरात असा सुंदर संदेश कुंभारी येथील मानाचा राजा गणपती मंडळाने दिला. मंडळाच्या वतीने आयोजित आरोग्य व रक्तदान शिबिरातून उत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड देण्यात आली. या उपक्रमाचे उद्घाटन कुंभारी पंचायत समितीचे सदस्य सूरज संजय पाटील यांच्या हस्ते झाले. शिबिरात तब्बल १२१ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. कुंभारी येथील अश्विनी हॉस्पिटलच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.

रक्तदानातून जीवनदानाचा संदेश

रक्त पेढ्यात जाणवत असलेल्या रक्ताच्या तुटवड्याची दखल घेत मंडळाने रक्तदान शिबिराचेही आयोजन केले. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या उद्देशाने युवक आणि नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. यावेळी सूरज पाटील यांनी गणेशोत्सवातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन केले. गणेशोत्सव हा समाजाला एकत्र आणण्याबरोबरच सेवा करण्याचे मोठे माध्यम आहे. उत्सवाच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेता आली आणि गरजू व्यक्तींना मदत करता आली, तर त्यातून मिळणारे समाधान वेगळेच असते, असे त्यांनी सांगितले. रक्तदानाबाबत बोलताना ते म्हणाले की, रक्ताची गरज कोणाला आणि कधी भासेल, हे सांगता येत नाही. गरजू रुग्णाला वेळेवर रक्त मिळणे म्हणजे त्याच्यासाठी जीवनदान ठरू शकते. त्यामुळे रक्तदान ही केवळ मदत नसून सामाजिक जबाबदारी आहे. युवकांनी आणि नागरिकांनी अशा उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

Ganeshotsav 2026: साताऱ्याची प्रसिद्ध बावधन बगाड यात्रा थेट …

नागरिकांचे आरोग्य हाच खरा विकास

गावातील नागरिकांचे आरोग्य हा विकासाचाच महत्त्वाचा भाग आहे. विकासकामांसोबतच नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारे उपक्रम सातत्याने झाले पाहिजेत. गणेश मंडळे, युवक आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतल्यास त्याचा थेट फायदा सर्वसामान्यांना होतो, असेही सुरज संजय पाटील यांनी स्पष्ट केले. धार्मिक उत्सवाला आरोग्य तपासणी आणि रक्तदानासारख्या समाजोपयोगी उपक्रमांची जोड देत मंडळाने ‘उत्सवातून सेवा’चा संदेश दिला.

उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गावातील ग्रामस्थांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मंडळाचे पदाधिकारी, स्वयंसेवक, ग्रामस्थ, आरोग्य कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अश्विनी हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाने सहकार्य केले. बाप्पाच्या उत्सवातून माणुसकीची ज्योत पेटविणाऱ्या या उपक्रमाचे कुंभारीसह परिसरातून कौतुक होत आहे.

Solapur News : अष्टविनायकांच्या दर्शनाने कुंभारी उजळली! स्वामी …

Web Title: Ganesh festival kumbhari health blood donation camp 121 citizens

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 10:02 PM

Topics:  

  • Ganesh Festival
  • Solapur
  • Solapur News

संबंधित बातम्या

Solapur News : मुख्यमंत्र्यांच्या आधी अधिकारी बांधावर! करंब्यात करपलेल्या पिकांची पाहणी; मदतीच्या घोषणेची प्रतीक्षा
1

Solapur News : मुख्यमंत्र्यांच्या आधी अधिकारी बांधावर! करंब्यात करपलेल्या पिकांची पाहणी; मदतीच्या घोषणेची प्रतीक्षा

श्रीगणेशाच्या कृपेसाठी गणेशयाग का करतात? जाणून घ्या महत्त्व आणि विधी
2

श्रीगणेशाच्या कृपेसाठी गणेशयाग का करतात? जाणून घ्या महत्त्व आणि विधी

Solapur Viral Video : ९ एकर जमीन नावावर करूनही मुलाकडून आई-वडिलांचा छळ; सोलापुरात धक्कादायक प्रकार
3

Solapur Viral Video : ९ एकर जमीन नावावर करूनही मुलाकडून आई-वडिलांचा छळ; सोलापुरात धक्कादायक प्रकार

देखणे हे रूप दिसे! ‘श्रीमंतां’च्या दर्शनासाठी गर्दीचा महापूर; पुण्यनगरीत भविकांचा उत्साह
4

देखणे हे रूप दिसे! ‘श्रीमंतां’च्या दर्शनासाठी गर्दीचा महापूर; पुण्यनगरीत भविकांचा उत्साह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.