
crime (फोटो सौजन्य: social media)
काय नेमकं प्रकरण?
याप्रकरणी पीडित शिक्षिकेचे नाव वासंती सूर्यकांत येळे (वय 50) असे आहे. या विजापूर रोड येथील सदिच्छा हौसिंग सोसायटी, माशाळ वस्ती परिसरात कुटुंबीयांसह राहतात. त्यांचे पती मुंबई येथे लोहमार्ग पोलीस दलात हवालदार म्हणून कार्यरत आहेत. २०२० साली पोलीस बॉईज संघटनेने सोलापूर शहरात कार्यक्रम घेतले होते. या कार्यक्रमात पीडित शिक्षिका आणि त्यांचा पती मिळून गेले होते. याच कार्यक्रमांमध्ये आरोपी स्वप्नील बाबुराव काळे यांची ओळख झाली होती.
ओळखी नंतर स्वप्नील काळे नेहमी पीडित शिक्षिकेच्या घरी ये जा करू लागला. डिसेंबर २०२० मध्ये स्वप्नील घरी आला. त्यांना सांगू लागला की वडिलांची मृत्यू झाली आहे. कविता नगर पोलीस लाईन मधील घर सोडण्यास सांगितले आहे. राहण्यासाठी घर घ्यायचे आहे त्यासाठी मदत करा. वडिलांचे पैसे आल्यानंतर तुम्हाला तुमचे पैसे परत देतो. वासंती यांच्या घरी स्वप्नील नेहमी ये-जा करत असल्याने त्याच्यावर विश्वास ठेवला. त्यांच्या जवळ पैसे नसल्याने त्याला सोन्याचे दागिने दिले.
त्यानंतर त्याने पुन्हा पैसे मागितले. सोलापूर रेल्वे स्थानकातील टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं टेंडर मिळालं आहे. या व्यवसायासाठी गाड्या लागणार आहेत. त्यातून जास्त पैसा मिळवून देतो, असे आमिष दाखवून स्वप्नीलने वासंती यांच्या नावावर 3 कार घेतल्या आणि हप्तेच भरले नाहीत. तसेच त्या गाड्या खाजगी सावकाराकडे गहाण ठेवल्या. पीडितेने वारंवार पैश्यांची मागणी केली, परंतु स्वप्नील उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला.
पोलीस पुत्राने अश्याप्रकारे एका शिक्षिकेची एकूण 74 लाख 67 हजार 654 रुपयांची फसवणूक केली. आता पीडितेने याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शितल कुमार गायकवाड हे करत आहेत.
Nagpur Crime: काका-पुतण्यांच्या मालमत्ता वादात गोळीबार; निष्पाप व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू
Ans: पोलीस पुत्र स्वप्निल बाबुराव काळे.
Ans: शिक्षिका वासंती सूर्यकांत येळे (वय 50).
Ans: सुमारे 74 लाख 67 हजार 654 रुपये.