Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime: सख्ख्या भावाचा क्रूर अंत! गाढ झोपेत असताना डोक्यात दगडी पाटा घालून हत्या

सोलापूर जिल्ह्यातील निंबर्गी येथे 15 दिवसांपूर्वी झालेल्या कुऱ्हाडीच्या हल्ल्याचा बदला घेत लहान भावाने सख्ख्या मोठ्या भावाची हत्या केली. पहाटे झोपेत असताना दळणाच्या जात्याचा दगडी पाटा डोक्यात घालून त्याने भावाला ठार मारले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 01, 2026 | 08:11 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 15 दिवसांपूर्वीच्या भांडण आणि कुऱ्हाडीच्या हल्ल्याचा सूड म्हणून हत्या.
  • झोपेत असलेल्या मोठ्या भावाच्या डोक्यात दगडी पाटा घालून खून.
  • आरोपी संतोष ऐवळेला पोलिसांनी पळून जाण्यापूर्वी अटक केली.
सोलापूर: सोलापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सख्या भावानेच आपल्या मोठ्या भावाची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा आणि कुर्हाडीचा वाराचा बदला घेण्यासाठी त्याने हत्या केल्याचे समोर आले आहे. शनिवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास मोठा भाऊ गाढ झोपेत असतांना लहान भावाने दळणाच्या जात्याचा जड दगड (पाटा) त्याच्या डोक्यात घालून त्याला ठार मारलं. एवढेच नाही तर त्याने हत्या केल्यानंतर आईला ‘मी भावाला ठार मारलंय’ असं सांगितलं. या घटनेने खळबळ उडाली आहे. ही घटना सोलापूर तालुक्यातील निंबर्गी येथे घडली.

स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; अट्टल घरफोड्या आरोपी जेरबंद, ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त

काय घडलं नेमकं?

या प्रकरणात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव रेवणसिद्ध उर्फ महांतेश सूर्यकांत ऐवळे (वय 45, रा. निंबर्गी, ता. दक्षिण सोलापूर) असे आहे. तर आरोपी लहान भावाचे नाव संतोष सूर्यकांत ऐवळे (वय 36, रा. निंबर्गी) असे आहे. दोन्ही भावना प्रचंड दारूचे व्यसन होते. दारूच्या नशेत त्यांच्यात नेहमी घरगुती कारणावरून वाद होत होता. गेल्या १५ दिवसांपूर्वी अश्यात एका वादात मोठा भाऊ रेवणसिद्ध याने संतोष याच्यावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला करून त्याला गंभीर जखमी केलं होतं. त्या हल्ल्यात संतोषच्या छातीला आणि पोटाला गंभीर जखमा झाल्याने टाके पडले होते. रुग्णालयातील उपचारानंतर तो घरी परतला होता, मात्र भावाने आपल्याला मारल्याचा तीव्र राग त्याच्या मनात धुमसत होता.

पुन्हा वाद झाला आणि…

शनिवारी रात्री रेवणसिद्धची पत्नी माहेरी गेल्यामुळे त्याने स्वतः रात्री जेवणासाठी भाजी केली होती. जेवत असताना ‘भाजी चांगली झाली नाही’ असं म्हणून आरोपी संतोषने रागारागात ती भाजी थेट स्वतःच्या आईच्या अंगावर फेकली. यावरून दोन्ही भावांमध्ये रात्री पुन्हा एकदा जोरदार भांडण झाले. मुलांमधील वाढता वाद पाहून घाबरलेले आई-वडील रात्री शेजारी राहणाऱ्या मल्लिकार्जुन गेजगे यांच्या घरी झोपण्यासाठी निघून गेले. दोन्ही भाऊ रात्री घरासमोरील अंगणात वेगवेळ्या खाटेवर झोपले होते. पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास संतोषने झोपलेल्या रेवणसिद्धच्या डोक्यावर आणि तोंडावर जात्याचा दगडी पाटा घालून त्याला ठार केले. त्यांनतर लहान भावाने आईला ‘मी भावाला ठार मारलंय’ असं सांगितलं. आईने अंगणात मुलाला रक्ताच्या थारोळ्यात बघत एकच हंबरडा फोडला.

पोलीस तपास सुरु

या थरारक घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा रीतसर पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी मंद्रुपच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी दिपाली ऐवळे हिने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस पुढील कायदेशीर तपास करत आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

बीसीच्या पैशांच्या वादातून व्यक्तीचा खून; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या का करण्यात आली?

    Ans: 15 दिवसांपूर्वी मोठ्या भावाने कुऱ्हाडीने केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी हत्या करण्यात आली.

  • Que: हत्येसाठी कोणत्या वस्तूचा वापर करण्यात आला?

    Ans: दळणाच्या जात्याचा जड दगडी पाटा वापरून हल्ला करण्यात आला.

  • Que: या प्रकरणात पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: मंद्रुप पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी संतोष ऐवळेला अटक केली आहे.

Web Title: Solapur crime cruel end of sakhya bhavacha murder with a crowbar while sleeping

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 08:11 AM

Topics:  

  • crime
  • Solapur
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

येडशीजवळ गळा चिरून खून; अनैतिक संबंधाच्या संशयातून ४० वर्षीय व्यक्तीची हत्या! बार्शीच्या संशयितावर गुन्हा दाखल
1

येडशीजवळ गळा चिरून खून; अनैतिक संबंधाच्या संशयातून ४० वर्षीय व्यक्तीची हत्या! बार्शीच्या संशयितावर गुन्हा दाखल

Ratnagiri Crime: सकाळी लवकर उठवल्याचा राग… सुनेने सासूला लाकडी फळीने केली बेदम मारहाण, गुन्हा दाखल
2

Ratnagiri Crime: सकाळी लवकर उठवल्याचा राग… सुनेने सासूला लाकडी फळीने केली बेदम मारहाण, गुन्हा दाखल

Nagpur Crime: ‘सोबत जगू शकलो नाही तर सोबत मरू…’; मोकळ्या मैदानात जाऊन प्रेमीयुगुलाने घेतला टोकाचा निर्णय
3

Nagpur Crime: ‘सोबत जगू शकलो नाही तर सोबत मरू…’; मोकळ्या मैदानात जाऊन प्रेमीयुगुलाने घेतला टोकाचा निर्णय

New Delhi: दिल्ली दंगल प्रकरणात मोठा निर्णय! आयबी अधिकारी अंकित शर्मा हत्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी
4

New Delhi: दिल्ली दंगल प्रकरणात मोठा निर्णय! आयबी अधिकारी अंकित शर्मा हत्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.