Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रभारी शिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे अडचणीत? मुख्याध्यापक महांतेश्वर कट्टीमनी यांच्या तक्रारीची शिक्षणाधिकाऱ्यांकडून दखल

Teacher Complaint against Prashant Arbale: अक्कलकोटचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे यांच्या कथित मनमानी कारभाराविरोधात मुख्याध्यापक महांतेश्वर कट्टीमनी यांनी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी विशाल मुळे यांच्याकडे तक्रार केली.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 31, 2026 | 08:42 PM
Complaint against Prashant Arbale

Complaint against Prashant Arbale

Follow Us
Follow Us:
  • शिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे अडचणीत?
  • महांतेश्वर कट्टीमनी यांच्या तक्रारीची शिक्षणाधिकाऱ्यांकडून दखल
  • मनमानी कारभार आणि शिक्षकांशी उद्धट वागण्याची तक्रार
सोलापूर: अक्कलकोटचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे यांच्या मनमानी कारभाराला आणि शिक्षकांशी उद्धट वागण्याच्या प्रकारांना आळा घालावा, अशी मागणी मुख्याध्यापक महांतेश्वर कट्टीमनी यांनी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी विशाल मुळे यांची भेट घेऊन केली. आरबाळे यांच्या कारभाराची चौकशी करून त्यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. या तक्रारीची दखल घेत तत्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्याने आता आरबाळे अडचणीत येणार का, याकडे अक्कलकोट तालुक्यातील शिक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.

ST Bus News : ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी महत्त्वाची बातमी; १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य, जाणून घ्या नियम

प्रभारी गटशिक्षणाधिकारी आरबाळे शिक्षकांना विनाकारण त्रास देत असून, त्यांच्या मनमानी कारभारामुळे अक्कलकोटच्या शिक्षण क्षेत्रात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. आरबाळे यांच्याविरोधातील फाईल दोन वर्षांपासून प्रलंबित असून, त्यांच्यावर वरिष्ठांचा वरदहस्त असल्यामुळे त्यांचे धाडस वाढत आहे. त्यांची वर्तणूक अक्कलकोटच्या शिक्षण क्षेत्रासाठी ही धोक्याची घंटा ठरत आहे. शाळांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही कट्टीमनी यांनी उपस्थित केला. आरबाळे यांच्या कार्यकाळात बबलाद शाळेची दुर्घटना घडून विद्यार्थी व शिक्षक जखमी झाले आहेत. अनेक शाळांच्या इमारती आजही धोकादायक स्थितीत असल्याच्या तक्रारी शिक्षकांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे केल्या आहेत. मात्र, त्यावर अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने भविष्यात विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याऐवजी दुर्घटनांना सामोरे जावे लागू शकते, असा इशाराही त्यांनी दिला.

कट्टीमनींच्या शैक्षणिक कार्याने शिक्षणाधिकारी प्रभावित

आरबाळे यांच्या विरोधातील तक्रार ऐकून घेत असतानाच प्राथमिक शिक्षणाधिकारी विशाल मुळे यांनी मुख्याध्यापक महांतेश्वर कट्टीमनी यांच्या शैक्षणिक कार्याची माहितीही जाणून घेतली. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद कन्नड शाळेतील मुलींना स्वतःचा आणि शिक्षिका पत्नीचा पीएफ काढून विमान प्रवास घडवून आणणे, स्वच्छ व सुंदर शाळा उपक्रम, प्रज्ञाशोध व शिष्यवृत्ती परीक्षांसह विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना यश मिळवून देणे, असे विविध उपक्रम कट्टीमनी यांनी राबविल्याचे समोर आले. नागणसूर व मैंदर्गी येथील शाळांमध्ये स्वखर्चाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवून देणे, बोअर घेऊन शाळेच्या परिसरात बाग फुलविणे, मोफत शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक मदत करणे, अशा विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांची माहितीही त्यांनी दिली.

तक्रार करायला गेले आणि कौतुकही झाले

प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांविरोधात तक्रार करण्यासाठी आलेल्या मुख्याध्यापक कट्टीमनी यांच्या शैक्षणिक कार्याची माहिती ऐकून शिक्षणाधिकारी विशाल मुळे यांनी समाधान व्यक्त केले. त्यांच्या कार्याचे कौतुक करत शिक्षण क्षेत्रात अशा उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. मुख्याध्यापक महांतेश्वर कट्टीमनी यांनी मांडलेल्या तक्रारी शिक्षणाधिकारी विशाल मुळे यांनी सविस्तर ऐकून घेतल्या. आरबाळे यांच्या कारभाराबाबत तसेच शाळांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नाबाबत तत्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. आरबाळे यांच्या विरोधात यापूर्वी शिक्षकांनी आंदोलन करून प्रशासन व पदाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्याची आठवणही कट्टीमनी यांनी करून दिली.

यंदा गणेशोत्सवात डीजे बंदी होणार? मुख्यमंत्री फडणवीसांचे पुण्यातून मोठे वक्तव्य; ‘सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा’

Web Title: Solapur akkalkot prashant arbale teacher complaint education officer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 08:42 PM

Topics:  

  • Education Department
  • Solapur
  • Teacher

संबंधित बातम्या

Solapur : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपचाच विजय होणार, जयकुमार गोरे
1

Solapur : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपचाच विजय होणार, जयकुमार गोरे

Solapur Water Crisis : सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा तालुक्यात पाणी नसल्यामुळे मनसेचे पुणे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन 
2

Solapur Water Crisis : सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा तालुक्यात पाणी नसल्यामुळे मनसेचे पुणे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन 

“महागाई आणि भ्रष्टाचाराविरोधातील रोष मतपेटीतून व्यक्त करा”; महाविकास आघाडीच्या मेळाव्यातून जयंत पाटलांचे आवाहन
3

“महागाई आणि भ्रष्टाचाराविरोधातील रोष मतपेटीतून व्यक्त करा”; महाविकास आघाडीच्या मेळाव्यातून जयंत पाटलांचे आवाहन

Solapur Navratri 2026: सोलापुरातील रूपा भवानी देवी मंदिर विद्युत रोषणाईने उजळले; नवरात्रोत्सवात भक्तांची मांदियाळी
4

Solapur Navratri 2026: सोलापुरातील रूपा भवानी देवी मंदिर विद्युत रोषणाईने उजळले; नवरात्रोत्सवात भक्तांची मांदियाळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.